बुलडाणा : सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. बुलडाणा जिल्ह्यातील सुटाळा बु. येथे गीताबाई रहाटे यांना ऑटोरिक्षा हे चिन्ह मिळालंय. त्यामुळे गीताबाईंच्या मुलाने त्यांच्या घरावर चक्क खराखुरा ऑटोच नेवून ठेवलाय. हा ऑटोरिक्षा छतावर ठेवण्यासाठी मुलाने चक्का क्रेनचा वापर केला आहे. एवढंच नव्हे तर या ऑटोरिक्षावर रोज रात्री ते नेत्रदीपक रोषणाई करतात. मतदारांचं लक्ष वेधण्यासाठी त्यांनी हा फंडा वापरला आहे.
ग्रामीण भागात गुलाबी थंडीत होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमुळे वातावरण चांगलंच गरम झालं आहे. त्यात सरपंचपदाची निवड ही निवडून आलेल्या सदस्यांमधून होणार असल्यामुळे सर्व उमेदवार सरपंच पदावर डोळा ठेऊन सर्व शक्तीनिशी प्रचार मोहिमेत लागलेयत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार नवनवीन फंडे वापरत आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
असाच एक अनोखा फंडा जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या सुटाळा बु. ग्रामपंचायत निवडणूक लढवणाऱ्या एका उमेदवाराने आजमाविला आहे. निवडणूक चिन्ह ऑटोरिक्षा असल्यामुळे या उमेदवाराच्या मुलाने खराखुरा ऑटोरिक्षा चक्क घरावर नेऊन ठेवला आहे.
जास्तीत जास्त ग्रामपंचायतीवर आपल्याच पक्षाचा सरपंच व्हावा असा प्रत्येक पक्षाचा प्रयत्न आहे. त्यातच उमेदवार सुद्धा आपली ताकद पणाला लावून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. ऑटोरिक्षा छतावर ठेवण्यासाठी गीताबाईंच्या मुलाने चक्का क्रेनचा वापर केला आहे. एवढंच नाही तर या ऑटोरिक्षावर रोज रात्री ते नेत्रदीपक रोषणाई करतात. मतदारांचं लक्ष वेधण्यासाठी त्यांनी हा फंडा वापरला आहे. नेत्रदीपक रोषणाई केल्यामुळे त्यांच्या घरासमोर रोज बघ्यांची गर्दी होते. गीताबाई तसेच त्यांच्या मुलाला नागरिकांकडून याबद्दल विचारले जात आहे.