भोपाळ : आठ वर्षांपूर्वीच्या एका रॅगिंग प्रकरणात खासगी महाविद्यालयाच्या चार विद्यार्थिनींना प्रत्येकी पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. भोपाळमधील RKDF कॉलेजमधील अनिता शर्मा या विद्यार्थीनीनं 2013 साली रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केली होती. याप्रकरणी निधी, दिप्ती, किर्ती आणि देवांशी या चार मुली दोषी आढळल्या. दरम्यान, भोपाळमध्ये रॅगिंग प्रकरणात पहिल्यांदाच एखाद्या व्यक्तीला शिक्षा सुनावण्यात आली आहे.
रॅगिंगच्या वाढत्या घटना पाहता या प्रकरणात कडक शिक्षा असायला हवी’ असं मत कोर्टानं यावेळी व्यक्त केलं. या प्रकरणात कडक शिक्षा असेल तर हा गुन्हा करण्याची हिंमत भविष्यात कुणाची होणार नाही. तसंच एखाद्या विद्यार्थ्यावर आत्महत्या करण्याची वेळ देखील येणार नाही, असं मत कोर्टानं मांडलं आहे.
महाविद्यालयातील सोनेरी जीवनाला लागलेली कीड म्हणजे रॅगिंग कॉलेजातील ज्युनिअर मुलांची त्यांच्या नव्या दिवसात थट्टा करण्यासाठी सुरु झालेला हा प्रकार अनेकदा त्रासदायक आणि हिंसक बनतो. हा सर्व त्रास सहन न झाल्यानं आत्महत्या केल्याच्या दुर्दैवी घटना देखील अनेकदा घडल्या आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आठ वर्षांपूर्वीच्या एका रॅगिंग प्रकरणात खासगी महाविद्यालयाच्या चार विद्यार्थिनींना प्रत्येकी पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या सर्व जणी रॅगिंग करणे आणि आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा गुन्ह्यात दोषी आढळल्या आहेत.
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील RKDF कॉलेजमधील अनिता शर्मा या विद्यार्थीनीनं 2013 साली रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केली होती. कोर्टानं या प्रकरणात निधी, दिप्ती, किर्ती आणि देवांशी या चार मुलींना दोषी ठरवून त्यांची रवानगी जेलमध्ये केली आहे. मात्र या प्रकरणातील अपुऱ्या पुराव्यामुळे त्यांचे शिक्षक मनिष यांची मुक्तता करण्यात आली आहे. भोपाळमध्ये रॅगिंग प्रकरणात पहिल्यांदाच एखाद्या व्यक्तीला शिक्षा सुनावण्यात आल्याची माहिती सरकारी वकील खालिद कुरेशी यांनी दिली आहे.
अनिता शर्माच्या घरी पोलिसांना तिनं आत्महत्येपूर्वी लिहलेली चिठ्ठी सापडली. यामध्ये अनितानं तिला कॉलेजमध्ये होत असलेला त्रास लिहून ठेवला होता. ‘निधी, दिप्ती, किर्ती आणि देवांशी या चौघींनी मला खूप त्रास दिला. या सर्व खूप घाणेरड्या आहेत. त्यांचा त्रास एक वर्ष कसा सहन केला हे माझं मलाच माहिती आहे. त्यांनी माझ्याकडून मिड सेमिस्टरचे पेपरही लिहून घेतले. मी मनिष सरांकडं याची तक्रार केली होती. त्यावेळी त्यांनी मला सिनियर्सनं सांगितलेलं ऐकलं पाहिजे, असा सल्ला दिला होता.’’
* गुलाबी ड्रेसमध्ये अग्नी देण्याची मागणी
अनितानं तिच्या सुसाईड नोटमध्ये घरच्यांनाही उद्देशून भावना मांडल्या होत्या. “आई -बाबा माझी फार आठवण करु नका. बाबा मी तुमची खूप आवडती होते. चांगलं शिकून खूप पैसा कमावणं आणि मोठं घर घेणं हे माझं स्वप्न होतं. भावा, तुझी बेस्ट फ्रेंड गेल्यावर तू खूप रडशील हे मला माहिती आहे. पण तुझी बहिण घाणेरडी बनू शकत नाही, तसंच ती स्ट्राँगही नाही. मला गुलाबी कपड्यांमध्ये अग्नी द्यावा,’’ अशी भावुक चिठ्ठी तिनं लिहिली होती.