मुंबई : सांगलीत विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. अवकाळी पाऊस पडल्याने पिकांचे नुकसान झाले. या अवकाळी पावसाचा द्राक्ष बागांना मोठा फटका बसणार आहे. उस्मानाबादेतील उपळा गावासह काही भागात पावसाचा शिडकावा झाला. या पावसामुळे ज्वारी, गहू, हरभरा या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. साता-यात अवकाळी पावसामुळे किमान तापमानातही घट झाली.
हवामान खात्यानं दिलेल्या इशाऱ्यानुसार राज्यातल्या पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला मध्यरात्री अवकाळी पावसानं झोडपलं. सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद अकोला, परभणी, भंडारा या जिल्ह्यांसह अनेक भागांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली. सांगलीतील अवकाळीच्या धुमाकुळानं द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात आलाय. अनेक भागांमधील द्राक्षाची निर्यात झाली नाही. त्यामुळे द्राक्ष बागायतदार चिंतेत आहे. तिकडे परभणीतल्या पावसानं ज्वारी, हरभरासारख्या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. वाशिममध्ये पावसाच्या सरी कोसळल्या.
परभणी जिल्ह्यात काल रात्री अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. परभणी, पोखर्णी, दैठणा या परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे ज्वारी, हरभरा पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे.
सांगली जिल्ह्यात मध्यरात्री अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. विजेच्या कडकडाटासह अर्धा तास मुसळधार पाऊस पडला. यामुळे रात्री अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. अवकाळी पाऊस पडल्याने पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या अवकाळी पावसाचा द्राक्ष बागांना मोठा फटका बसणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
उस्मानाबाद तालुक्यातल्या उपळा गावासह काही भागात रात्रीसाडे आठनंतर पावसाचा शिडकावा झाला. उस्मानाबाद शहर आणि परिसरामध्ये काल ढगाळ वातावरण पाहायाला मिळालं. या पावसामुळे ज्वारी, गहू, हरभरा या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
साता-यात काल मुसळधार पाऊस झाला. अवकाळी झालेल्या पावसामुळे किमान तापमानातही घट झाली आहे.अकोल्यात जिल्ह्यातल्या अकोट, तेल्हारा भागात काल अवकाळी पावसानं हजेरी लावली. अवकाळी बरसणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्याची चिंता वाढली आहे. भंडा-यात काल अवकाळी पावसाला सुरुवात झाली. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी, तुमसर तालुक्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली. त्यामुळे सगळ्यांचीच तारांबळ उडाली.
औरंगाबाद परिसरात अचानक झालेल्या गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गहू, ज्वारी, हरभरा, मक्का आदी पिके शेतकऱ्यांच्या हातातून निघून गेले आहे. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास खराब झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
हवामान विभागाच्या पुणे वेधशाळेने मराठवाड्यातील काही भागात अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. बुधवारी दुपार नंतर वातावरणात अचानक बदल जाणवायला सुरूवात झाली होती. सायंकाळी लाडसावंगी आणि परिसरात अचानक गारा पडल्या. त्यामुळे शेतातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले. याचा फटका आंबा, डाळिंब, मोसंबी आदी फळांनाही बसलाय. ऐन बहरात असलेल्या आंब्याचा मोहर यामुळे गळून पडला आहे.
मराठवड्यात अनेक शेतकरी मोसंबी आणि डाळिंब या फळांची लागवड करतात. डाळिंबाला सध्या फुले लागलेली होती. मात्र, अचानक झालेल्या या गारपीटीमुळे डाळिंबाची फुले पडली आहे. आधीच अवकाळी नंतर अतिवृष्टी यामुळे शेतकरी हवालदील झाला होता. त्यानंतर महावितरण वीज कनेक्शन कट करण्याच्या भीतीने शेतकरी त्रस्त होते. त्यात आता या गारपीटीमुळे मोठे नुकसान झाले असून याचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी करण्यात आलीय.