Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मुंबईत 30 ते 40 कुत्र्यांवर बलात्कार; आरोपी म्हणतो तो गुन्हा कसा ?
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारी

मुंबईत 30 ते 40 कुत्र्यांवर बलात्कार; आरोपी म्हणतो तो गुन्हा कसा ?

Surajya Digital
Last updated: 2021/03/16 at 6:20 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मुंबई : मुंबईतील जुहू गल्ली भागातील अहमद शाही याने आतापर्यंत 30 ते 40 कुत्र्यांना आपल्या विकृतीचे शिकार केल्याची भीती आहे. जर मुक्या प्राण्यांना काही आक्षेप नसेल, तर तो गुन्हा होत नाही, असे निर्लज्ज उत्तर त्याने दिले. 68 वर्षांचा अहमद हा भाजी विक्रेता आहे. पहाटे 3-4 वाजता तो हे कृत्य करत असे. कुत्र्यांना खाण्याच्या बहाण्याने तो जवळ बोलवत असे. त्यानंतर मुक्या प्राण्यांवर लैंगिक अत्याचार करत असे.

राज्याची राजधानी मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली असून मादी कुत्र्यावर बलात्कार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अहमद शाह या 68 वर्षांच्या वृद्धाला अटक केली आहे.परंतु या वृद्धाने धक्कादायक दावे केले आहे. डीएन नगरच्या पोलिसांना तो म्हणाला की, जर मुक्या प्राण्यांना काही आक्षेप नसेल, तर तो गुन्हा होत नाही, असं बेशरम उत्तर या वृद्ध अहमद शाहीने दिलं आहे.

अहमद शाह (वय 68) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी बॉम्बे अ‍ॅनिमल राईट्स संस्थेच्या विजय मोहन यांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे. आरोपीने आतापर्यंत अनेक मुक्या प्राण्यांवर बलात्कार केला आहे, असा आरोप फिर्यादीने केला आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

डीएन नगरच्या पोलिसांनी या वृद्धाला काल बुधवारी अटक केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 68 वर्षीय अहमद शाह नावाच्या वयोवृद्धाने अनेक पाळीव तसंच भटक्या कुत्र्यांवर बलात्कार केला आहे. आरोपीने आतापर्यंत 30 ते 40 कुत्र्यांना आपल्या विकृतीचे शिकार केल्याची भीती आहे.

अहमद हा मुंबईतील जुहू गल्ली भागातील रहिवासी आहे. पहाटे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास तो हे भयंकर कृत्य करत असे. अहमद भाजी विक्रेता आहे. कुत्र्या-मांजरांना खाण्याच्या बहाण्याने तो जवळ बोलवत असे. त्यानंतर मुक्या प्राण्यांवर लैंगिक अत्याचार करत असे. ही घटना 2020 सालच्या डिसेंबरमध्ये घडली होती. बॉम्बे अँनिमल राईट्स’ या एनजीओतील 45 वर्षीय प्राणी हक्क कार्यकर्ते विजय मोहनानी यांनी व्हिडीओ डिसेंबर 2020 डीएन नगर पोलिसांना दिला होता.

प्राण्यांना खायला देऊन त्यांच्यावर बलात्कार केल्याची कबुली आरोपी अहमदने चौकशीदरम्यान दिली. जर मुक्या प्राण्यांना काही आक्षेप नसेल, तर तो गुन्हा होत नाही, असं लंगडं समर्थन अहमदने दिलं असल्याचं पोलीस सांगत आहे.

याप्रकरणी माहिती देताना पोलिस म्हणाले की, आरोपीला अशा प्रकारची दुष्कर्म करण्याची सवय लागली होती. त्याला स्थानिक लोकांनी अनेकदा समज दिली होती. पण त्याने आपलं कृत्य थांबवले नाही. त्यानंतर मोहन यांनी दिलेली तक्रार आणि व्हायरल व्हिडीओच्या आधारे डीएन शहर पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपी वृद्धाला अटक केली आहे.

You Might Also Like

आयुष कोमकर हत्या : आजीसह आणखी तिघांना गुजरातमधून अटक

मोर्शी एसडीओंच्या खाजगी कारमधून पिस्तूल चोरी; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

दिल्लीमध्ये अभिनेत्री हुमा कुरेशीच्या चुलत भावाची पार्किंग वादातून हत्या

लग्राच्या दोन दिवस आधी दारु पाजून केला गेम वरातीऐवजी अंत्ययात्रा, प्रेयसीच्या भावी पतीची हत्या

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

TAGGED: #30to40dogs #raped #Mumbai #Howdoes #accused #saythecrime?, #मुंबईत #कुत्र्यांवर #बलात्कार #आरोपीम्हणतो #तोगुन्हाकसा?
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भाजप नगरसेविकेचे पद रद्द; भाजपात माजली खळबळ
Next Article अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपीस 20 वर्षे सक्तमजुरी

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?