Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: छोटा राजनला १० वर्षाच्या कारावासाची शिक्षा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारी

छोटा राजनला १० वर्षाच्या कारावासाची शिक्षा

Surajya Digital
Last updated: 2021/03/16 at 8:21 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला आज मंगळवारी १० वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. २०१३ ला अजय गोसालिया यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात छोटा राजनला ही शिक्षा ठोठावण्यात आली. तसेच त्याला पाच लाखांचा दंडही ठोठावण्यात आला. दरम्यान, छोटा राजनसह अन्य आरोपींना मंगळवारी न्यायालयाने दोषी ठरवले होते.

२०१३ साली अजय गोसालिया यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात छोटा राजनला ही दहा वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला ही शिक्षा सुनावली आहे. छोटा राजनसह इतर आरोपींना मंगळवारी न्यायालयाने दोषी ठरवले. सोबतच छोटा राजनला पाच लाखाचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

बांधकाम व्यावसायिक अजय गोसालियावर मालाड येथे २८ ऑगस्ट २०१३ रोजी तिघांनी गोळीबार केला होता. छोटा राजनच्या सांगण्यावरून हा गोळीबार झाल्याचा सीबीआयचा आरोप होता. सतीश कालिया या आपल्या साथीदारामार्फत छोटा राजनने हा हल्ला घडवून आणला. गोसालिया या गोळीबारात गंभीर जखमी झाला होता. सुदैवाने एक गोळी सोन्याच्या पेंडट लागल्याने गोसालिया या जीवघेण्या हल्ल्यातून बचावला होता.

आधी बुकी असलेला अजय गोसालिया नंतर बांधकाम क्षेत्रात उतरला. २८ ऑगस्ट २०१३ रोजी ५२ वर्षीय गोसालियावर तिघांनी गोळीबार केला होता. मालाड पश्चिमेला असलेल्या मॉलमधून बाहेर येताना हा गोळीबार झाला होता. छोटा राजनच्या इशाऱ्यावरुन हा गोळीबार झाल्याचा सीबीआयचा आरोप होता.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

तपास सुरू झाल्यानंतर ऑगस्ट २०१३ साली बांगूर नगर पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली एफआयआर नोंदवण्यात आला. आयपीसीच्या विविध कलमांतर्गत आरोपींविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला. काही दिवसांनी या प्रकरणाचा तपास डीसीबीकडे सोपवण्यात आला. या प्रकरणात मोक्का लावण्यात आला.

स्पेशल युनिटने सात आरोपींविरोधात नोव्हेंबर २०१३ मध्ये आरोपपत्र दाखल केले. प्रकाश निकम, सतीश कालिया आणि छोटा राजन हे तीन आरोपी वाँटेड होते. त्यानंतर पत्रकार जे डे हत्या प्रकरणात निकम आणि कालियाला अटक झाली. छोटा राजनला बालीवरुन भारतात आणल्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले. त्यानंतर आज मंगळवारी कोर्टाने छोटा राजनला दहा वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली.

You Might Also Like

आयुष कोमकर हत्या : आजीसह आणखी तिघांना गुजरातमधून अटक

मोर्शी एसडीओंच्या खाजगी कारमधून पिस्तूल चोरी; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

दिल्लीमध्ये अभिनेत्री हुमा कुरेशीच्या चुलत भावाची पार्किंग वादातून हत्या

लग्राच्या दोन दिवस आधी दारु पाजून केला गेम वरातीऐवजी अंत्ययात्रा, प्रेयसीच्या भावी पतीची हत्या

दिग्दर्शक ओम राऊतने केली डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या बायोपिकची घोषणा

TAGGED: #ChhotaRajan #sentenced #10years #imprisonment, #छोटाराजनला #१०वर्षाच्या #कारावासाची #शिक्षा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपीस 20 वर्षे सक्तमजुरी
Next Article गृहराज्यमंत्री देसाई आणि उदयनराजेंच्या मैत्रीचा आणखी एक ‘किस्सा’

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?