नागपूर : कोरोनामुळे सध्या राज्यातील बहुतांश शाळा बंद आहेत. यामुळे अनेक शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. याचमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या तेलंगणातील एक शिक्षकाने गांजाची तस्करी केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याच्याकडून जवळपास एक क्विटंल गांजा जप्त करण्यात आला. या गांजाची किंमत १३ लाख रुपये इतकी आहे.
या तस्कर शिक्षकाला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर तस्करी करणाऱ्या बड्या रॅकेटचा पर्दाफाश झाला. पोलिसांना नागपूरमार्गे गांजाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. वाहतुकीचा वारंगल ते दिल्ली असा मार्ग असल्याने बेलतरोडी पोलिसांनी नागपूरच्या वर्धा मार्गावर सापळा रचला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
एका गाडीवर पोलिसांना संशय आला आणि त्यांनी गाडी थांबवायला सांगितली. पण गाडी चालकाने थांबवली नाही. अखेर पोलिसांनी पाठलाग करून काही अंतरावर गाडी थांबवत कारवाई केली.
शिवशंकर इस्मपल्ली हा तेलंगणाच्या वारांगना येथे एका शाळेत शिक्षक म्हणून काम करायचा. मात्र, कोरोना संकटामुळे शाळाच बंद पडली. त्यामुळे या शिक्षकावर आर्थिक संकट ओढावले. यामधून मार्ग काढण्यासाठी त्याने गांजा तस्करीचा पर्याय निवडला. आरोपी शिक्षक वारंगल ते दिल्ली अशा रॅकेटमध्ये सामील झाला. रस्तेमार्गे खेप पोचवत असताना तो नागपूरच्या वर्धा मार्गावर बेलतरोडी पोलिसांच्या हाती लागला.