मुंबई : ठाण्याच्या मीरा- भाईंदर येथे एक धक्कादायक घटना घडली. एका स्वयंघोषित धर्मगुरूनं 16 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला आहे. वेश्या व्यवसाय सुरू असलेल्या हॉटेलवर पोलिसांनी छापा मारला. यात तीन मुलींची सुटका करण्यात आली. त्यामध्ये एका 16 वर्षाच्या मुलीचाही समावेश होता. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर अल्पवयीन मुलीने ही माहिती दिली. दरम्यान, धर्मगुरू मुळचा गुजरातचा आहे. मात्र सध्या तो मीरा भाईंदरमध्ये राहत होता.
नया नगर पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह संबंधित कायदे कलमानुसार या धर्मगुरुवर गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या धर्मगुरुची कसून चौकशी करत आहेत. यामधून आणखी काही माहिती समोर येणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
मीरा-भाईंदर परिसरात एका स्वयंघोषित धर्मगुरूने 16 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, हा धर्मगुरू मूळचा गुजरातमधील आहे. मात्र, तो सध्या मीरा-भाईंदरमध्ये वास्तव्याला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पोलिसांनी वेश्या व्यवसाय सुरु असणाऱ्या हॉटेलवर धाड टाकल्यानंतर हा सारा प्रकार समोर आला.
मीरारोड पूर्वेकडील महामार्गालगत असणाऱ्या पय्याडे हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेने पय्याडे हॉटेलवर धाड टाकली. त्यावेळी वेश्यागमनासाठी आणलेल्या तीन मुली हॉटेलमध्ये सापडल्या. यामध्ये एका 16 वर्षांच्या मुलीचाही समावेश होता.
पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर अल्पवयीन मुलीने धक्कादायक कबुली दिली. मीरा-भाईंदर परिसरातील एक धर्मगुरू तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार करत होता. या पीडित मुलीची विचारपूस करुन तिच्याकडून सर्व माहिती काढून घेण्यात आली. त्यानंतर नया नगर पोलिसांनी या 60 वर्षीय धर्मगुरुला बेड्या ठोकल्या आहेत.