नवी दिल्ली : कोरोनाच्या या संकटानंतरही देशाला डॉक्टर आणि परिचारिकांच्या कमतरतेचा सामना करावा लागू शकतो, असाही अंदाज वर्तवला जात आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैद्यकीय वैकर्मचाऱ्यांची उपलब्धता वाढविण्याचा एक मोठा निर्णय घेतलाय. NEET-PG परीक्षा कमीत कमी ४ महिने पुढे ढकलली जावी. तसेच कोविड ड्युटीचे १०० दिवस पूर्ण करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना नियमित सरकारी भरतीत प्राधान्य दिले जाणार आहे.
Postponement of NEETPG by a total of 8 months (4+4) is disheartening and discouraging to the medical aspirants. No amount of samman medal can make up for this loss. Should have done in Jan2021. Highest level of administrative failure. @MoHFW_INDIA @PMOIndia @drharshvardhan
— Dr. Vaibhav Bharat (@vaibhavbharat07) May 3, 2021
कोविड रुग्णांच्या सेवेत १०० दिवस काम पूर्ण करणारे वैद्यकीय कर्मचारी यांना पंतप्रधानांचा प्रतिष्ठित कोविड राष्ट्रीय सेवा पुरस्कार देण्यात येईल. याद्वारे त्यांना शासकीय भरतीत प्राधान्य दिले जाईल. नुकतेच हृदयरोग सर्जन डॉ. देवी शेट्टी यांचे एक विधान समोर आले होते. ते म्हणाले की, ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे पुढचे मोठे संकट हे डॉक्टर आणि परिचारिकांवर येणार असून, त्यांची कमतरता भासू शकते. महिन्यात कोरोना जास्त वाढणार आहे. अशा परिस्थितीत कोरोना रुग्णांना डॉक्टर आणि परिचारिकांची भेट घेणे कठीण होईल.
तुमच्या जवळचे कोरोना लसीकरण केंद्र कोणते ? या whatsapp नंबरवर विचारा #coronavirus #Whatsapp_Number #vaccine #WhatsAppNo #विचारा #CoronaVaccine pic.twitter.com/oEaYoWKOXs
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 3, 2021
३१ ऑगस्ट पर्यंत कोणतीही परिक्षा घेण्यात येणार नाही. त्यामुळे या काळात कोरोनाच्या परिस्थितीत कोविड ड्युटी करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इंटर्नशिपचा एक भाग म्हणून प्राध्यापकांच्या देखरेखीखाली कोविड मॅनेजमेंट ड्युटीमध्ये मेडिकल इंटर्नस घेण्याची परवानगी देण्यात आली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
महत्त्वाची बाब म्हणजे १०० दिवसांची कोविड ड्युटी करणाऱ्या विद्यार्थ्यांला सरकारी नोकरीत प्राधान्य दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे भारत सरकारकडून पंतप्रधान विशिष्ट कोविड राष्ट्रीय सेवा सन्मानाने देखिल सन्मानीत करण्यात येणार आहे. इंटर्नसमुळे कोरोनाच्या काळात सतत काम करणाऱ्या डॉक्टर नर्सेस यांच्या डोक्यावरील ओझे थोडे हलके होण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे नवीन विद्यार्थ्यांना नवीन गोष्टी शिकण्यासाठी प्रोत्साहन देता येईल.
सोनिया गांधी, पवारांसह विरोधी पक्षांच्या १३ नेत्यांची मागणी; केंद्राने मोफत लसीकरण सुरु करावे, तरतूद करण्यात आलेला ३५ हजार कोटींचा निधी वापरावाhttps://t.co/nrjyC1e4R6
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 3, 2021
देशात NEET PG च्या परिक्षा पुढील चार महिने पुढे ढकलण्यात आल्याने ३१ ऑगस्ट पर्यंत कोणतीही परिक्षा घेण्यात येणार नाही. मात्र परिक्षा देण्याच्या एक महिना आधी विद्यार्थ्यांना एक महिन्याचा कालवधी देण्यात येणार आहे. अंतिम वर्षांच्या MBBSच्या विद्यार्थ्यांचा उपयोग टेले कन्सल्टेशन म्हणून करता येऊ शकतो. त्याचप्रमाणे कोरोनाची सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांची काळजी घेण्यासाठीही या विद्यार्थ्यांचा वापर होऊ शकतो. B.SC किंवा GNM करणाऱ्या नर्सेस वरिष्ठ डॉक्टरांच्या हाताखाली पूर्ण वेळ कोविड नर्सेस म्हणून काम करु शकतात.
कोरोनाच्या या कामात सहभागी होणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना योग्य लसी देण्यात येईल. कोरोनाच्या काळात आरोग्य सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी विमा योजना देखिल लागू करण्यात येईल. त्याचप्रमाणे आरोग्य, वैद्यकीय विभागातील डॉक्टर, नर्सेस, संबंधित व्यावसायिक आणि इतर आरोग्यसेवा कर्मचार्यांची रिक्त पदे ४५ दिवसांच्या आत NHM निकषांवर कॉनट्रॅक्ट बेसिसवर प्रवेश प्रक्रिया केली जाईल. देशातील कोरोना महामारीशी लढण्यासाठी जास्तीत जास्त मनुष्यबळ वाढविण्यासाठी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना विनंती करण्यात आली आहे.
लग्नात कोरोनाची भीती, नवरदेव-नवरीने काठीने घातल्या वरमाला https://t.co/VEz8lzXG7y
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 3, 2021