मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार म्युकरमायकोसिसच्या उपचार पद्धतीची दिशा ठरवण्यासाठी एका खास व्हीसीचे आयोजन करण्यात आले होते. म्युकरमायकोसिसचा सामना करण्यासाठी डॉ. आशिष भुमकर यांच्यासोबत एक खास टीम तयार करण्यात आली आहे. यात डेंटिस्ट, ईएनटी सर्जन आणि आय स्पेशालिस्ट, भूलतज्ज्ञ अशा डॉक्टरांची टीम एकत्र करण्यात आली आहे. 100 दिवसांच्या आत हा आजार नियंत्रणात आणू, असं तज्ञांनी म्हटलं.
भारतीय तटरक्षक दलात 75 पदांसाठी भरती, तयारीला लागा https://t.co/mgCkpYBRgH
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 16, 2021
म्युकोरमायकोसिसचा डोंबिवलीत पहिला बळी म्युकोरमायकोसिसची लागण झालेल्या डोंबिवलीतील वृद्धाचा मृत्यू झाला आहे. बाजीराव काटकर असं त्यांचं नाव आहे.. राज्यात म्युकोरमायकोसिसमुळे झालेला हा पहिला मृत्यू आहे. ही घटना राज्यासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. दरम्यान, डोंबिवलीतील एका खासगी रुग्णालयात म्युकोरमायकोसिसची लागण झालेल्या सात रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे समजते. परंतू यावर रुग्णालय बोलण्यास नकार देत आहे. त्यानंतर यात वाढ होत गेली.
भयंकर चक्रीवादळ ! मुसळधार पाऊस सुरू, आज घरातच राहा; केरळ, तामिळनाडू, गुजरातसह महाराष्ट्राला सतर्कतेचा इशारा #तौक्ते #चक्रीवादळ #इशारा #पाऊस #surajyadigital #भयंकर #Denger #maharashtra #Gujarat #गुजरात #महाराष्ट्र pic.twitter.com/kjkZTIDOvf
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 16, 2021
म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य रोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी राज्य सरकार आणि राज्यातील वैद्यकीय क्षेत्रातील प्रमुख तज्ज्ञांनी कंबर कसलीय. येत्या 100 दिवसांच्या आत म्युकरमायकोसिस नियंत्रणात आणण्याचा निर्धार वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार म्युकरमायकोसिसच्या उपचार पद्धतीची दिशा ठरवण्यासाठी एका खास व्हीसीचे आयोजन करण्यात आले होते.
जळगावमध्ये केमिकल्सच्या टाकीत बुडून तिघांचा मृत्यू, एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात गेला तिघांचा बळी https://t.co/QD4uq9V1Xd
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 15, 2021
म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य रोगावर चर्चा करण्यासोबतच डॉ. भूमकर यांनी या व्हीसीमध्ये आशा रुग्णाच्या सर्जरीचं लाईव्ह प्रात्यक्षिक देखील आयोजित केल होत. या व्हीसी मध्ये सहभागी झालेले नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ही सर्जरी नक्की कशी होणार याबाबत डॉक्टरांकडून सारी माहिती जाणून घेतली. त्यासोबतच या रोगावरील उपचारामधील अवघड बाबी देखील डॉक्टरांच्या टीमने त्यांच्या लक्षात आणून दिली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
डॉ. आशिष भुमकर यांच्यासोबत एक खास टीम तयार करण्यात आली आहे. यात डेंटिस्ट, ईएनटी सर्जन आणि आय स्पेशालिस्ट, भूलतज्ज्ञ अशा डॉक्टरांची टीम एकत्र करण्यात आली आहे. आपल्या सगळ्यांच्या पुढाकाराने हे संकट आपण सगळे मिळून नक्की परतवून लावू, असा विश्वास डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला, पाच जणांचा मृत्यू, ११ जणांची झाली सुटका, ५ लाखांची मदत जाहीर https://t.co/htvwNvQ7Op
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 15, 2021
म्युकरमायकोसिस या आजाराची लक्षणे प्रामुख्याने मधुमेहग्रस्त व्यक्तीला कोरोना होऊन गेल्यानंतर काही दिवसांनी दिसून येतात. त्यामुळे हा आजार वेळीच टाळायचा असेल तर अशा रुग्णाची वेळच्या वेळी साखरेची पातळी चेक करायला हवी, असं मत राज्याचे कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी व्यक्त केलं. तसेच जे रुग्ण 21 दिवसांहून जास्त काळ रुग्णालयात राहून गेले आहेत, अशा रुग्णांच्या नाकाची एंडोस्कोपी करावी, अशी सूचना त्यांनी मांडली.
खा.राजीव सातव यांना भावपूर्ण श्रध्दांजली!💐💐💐
Rajiv Satav… pic.twitter.com/9F6D6YE70f
— mipranavkharjule (MODI KA PARIVAR) (@pranavkharjule) May 16, 2021
रोगाचे पहिले लक्षण हे दातदुखी असल्याने अशी तक्रार घेऊन येणाऱ्या रुग्णांचा त्वरित एक्सरे काढायला हवा, अशी सूचना डॉ. संदेश मयेकर यांनी व्यक्त केली. म्युकरमायकोसिस आजार बळावल्यानंतर राज्य टास्क फोर्समध्ये नियुक्त झालेल्या डॉ. आशिष भूमकर यांनी मधुमेहग्रस्त रुग्णांची साखर पातळी नियंत्रणात ठेवणे हाच यावरचा सोपा उपाय असल्याचे सांगितले. त्यासोबत कोविड झालेल्या रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी असते. अशा रुग्णांवर उपचार करताना त्यांना भूल देणे हे देखील एक मोठं आव्हान असल्याचं डॉ. भूमकर यांनी सांगितले.