मुंबई : यंदाच्या वर्षातील पहिले खग्रास चंद्रग्रहण येत्या बुधवारी म्हणजेच 26 मे रोजी लागणार आहे. दुपारी 3.15 ते सायं. 6.23 यावेळेत हे चंद्रग्रहण होणार आहे. परंतू हे चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाही. परंतू या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ येणार असल्याने सुपरमूनचे दर्शन संपूर्ण भारतातून होणार असल्याचे खगोल अभ्यासक पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले आहे.
गोबर, गोमूत्र आणि रामदेव ही थेरपी बंद करा – नवाब मलिक https://t.co/3tEMlz1Ceo
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 23, 2021
हे चंद्रग्रहण अमेरिका, उत्तर युरोप, पूर्व आशिया, ऑस्ट्रेलिया, प्रशांत महासागर आणि हिंद महासागराच्या काही भागात पूर्णपणे दिसून येईल. हे ग्रहण जपान, दक्षिण कोरिया, बांगलादेश, सिंगापूर, बर्मा, फिलिपिन्स आणि उत्तर आणि दक्षिण अमेरिकेत दिसून येईल. हे चंद्रग्रहण वृश्चिक राशी आणि अनुराधा नक्षत्रात लागेल. चंद्र ग्रहण दुपारी 2 वाजून 17 मिनिटांनी प्रारंभ होईल आणि संध्याकाळी 7 वाजून 19 मिनिटांना समाप्त होईल.
'मुस्लीम धर्मात अंग प्रदर्शनास मनाई असल्याने बोल्ड ड्रेस परिधान करत नाही' https://t.co/ETajR1Pvn4
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 23, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
हे चंद्रग्रहण रक्तिम लाल दिसेल. हा योग बऱ्याच वर्षांनंतर येतो. याला ‘सुपर लूनर इव्हेन्ट’ म्हणतात. कारण या दिवशी सुपरमून आणि ग्रहण या दोन्ही स्थिती असतील. सुपरमून चंद्र पृथ्वीच्या जवळ येतो त्यावेळी तो नेहमीपेक्षा 12 टक्के मोठा दिसतो. चंद्र पृथ्वीपासून 4, 06,300 किलोमीटर दूर आहे. सुपरमूनच्या वेळी हे अंतर कमी होऊन 3,56,700 किलोमीटर राहते, त्यामुळे चंद्र मोठा दिसतो; म्हणून त्याला सुपरमून म्हणतात.
एक किलो प्लास्टिकवर भरपेट थाळी, अर्ध्या किलोवर नाश्ता मिळवा https://t.co/091uq1xeAn
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 23, 2021
चंद्र पृथ्वीच्या कक्षेत, पृथ्वीच्या भोवती अंडाकार प्रदक्षिणा करत असतो त्यामुळे एका स्थतीत तो पृथ्वीच्या जवळ येतो. त्यावेळी त्याची चमक वाढते. पृथ्वी, चंद्र आणि सूर्याच्या मध्ये येते त्यावेळी पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि चंद्राला ग्रहण लागते. चंद्र त्याच्या कक्षेत 5 डिग्री झुकला आहे. त्यामुळे चंद्र पृथ्वीच्या सावलीच्या थोडा वर किंवा खाली असतो. पण, वर्षातून दोन वेळा अशी स्थिती निर्माण होते की, चंद्र, पृथ्वी आणि सूर्य एका सरळ रेषेत येतात. त्यावेळी खग्रास (पूर्ण) चंद्र ग्रहण लागते.
राजीव सातव यांच्या मृत्यूची चौकशी होणार ? https://t.co/O3PpI4L81X
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 23, 2021