मुंबई : मुंबईत वेब सीरिजच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा मुंबई पोलिसांनी भांडाफोड केला आहे. मुंबईतील वर्सोवा परिसरातील एका हॉटेलमध्ये वेबसीरिजच्या नावाखाली सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर धाड टाकून एका महिलेला अटक केली आहे. तर 3 मॉडेल्सची सुटका केली आहे. दरम्यान, या प्रकरणात अटक करण्यात आलेली महिला वेब सीरिजमध्ये कास्टिंग डायरेक्टर आहे, तसेच ब्युटीशियन सुद्धा आहे.
खासगी रुग्णालयांसाठी कोरोना लसीसाठी केंद्राकडून दर जाहीर https://t.co/OVkX5DzHOw
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 9, 2021
मुंबईतील वर्सोवा परिसरातील एका हॉटेलमध्ये वेबसीरिजच्या नावाखाली सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेला मिळाली होती. या माहितीची खातरजमा केल्यावर पोलिसांनी सापळा रचला. मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने वर्सोव्यातील या हॉटेलवर धाड टाकून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे तर 3 मॉडेल्सची सूटका केली आहे. मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून एकूण 3 जणांची सुटका केली आहे. यापैकी दोन मॉडेल्स असून त्यांचे वय 22 वर्षे आणि 25 वर्षे असे आहेत. तर तिसरी महिला ही मॉडेल नसून तिचे वय 35 वर्षे असल्याची माहिती समोर आली आहे.
मी भारतात पाऊल ठेवताच कोरोना नष्ट होणार – नित्यानंद https://t.co/xvyhtokwLG
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 9, 2021
या प्रकरणात अटक करण्यात आलेली महिला ही वेब सीरिजमध्ये कास्टिंग डायरेक्टर आहे तसेच ब्युटीशियन सुद्धा आहे. पोलिसांना या रॅकेटची माहिती मिळाल्यावर बनावट ग्राहक पाठवून पोलिसांनी सापळा रचला. त्यानंतर हा ग्राहक घटनास्थळावर पोहोचल्यावर रॅकेट चालवणाऱ्या महिलेने मुलींना बोलावले. त्याचवेळी पोलिसांनी धाड टाकत रॅकेटचा पर्दाफाश केला.
पुणे : १८ कामगारांच्या मृत्यूप्रकरणी निकुंज शहाला १३ जूनपर्यंत पोलीस कोठडी https://t.co/d3u7lPyEMp
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 9, 2021