Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शिवाजी महाराजांच्या कधीही न पाहिलेल्या फोटोंचा शोध
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

शिवाजी महाराजांच्या कधीही न पाहिलेल्या फोटोंचा शोध

Surajya Digital
Last updated: 2021/06/16 at 5:30 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

पुणे : शिवप्रेमींसाठी अभिमानाची बातमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीन ऐतिहासिक चित्रांचा शोध लागला आहे. जर्मनी, फ्रान्स आणि अमेरिकेतल्या म्युझियममध्ये ही चित्रं असल्याची माहिती इतिहास अभ्यासक प्रसाद तारे यांनी दिली. गोवळकोंडा शैलीतील ही चित्रं सतराव्या शतकातील आहेत. यातील दोन चित्रांवर पर्शियन आणि रोमन लिपीत महाराजांचं नाव लिहिलेलं दिसतं.

ट्रक उलटला; लोकांनी लंपास केले मोबाइल फोन, कॉम्प्युटर, एलईडी टीव्ही https://t.co/gVfqJIdmpm

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 16, 2021

जगभरातील तमाम शिवप्रेमींसाठी अभिमानाची बातमी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीन ऐतिहासिक चित्रांचा शोध लागलाय. परदेशातील संग्रहालयांमध्ये महाराजांची ही चित्रं जतन करण्यात आलीय.

महाराष्ट्राची छाती अभिमानानं फुलून यावी, असा छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास… हिंदवी स्वराज्याचा इतिहास घडवणा-या शिवाजी महाराजांच्या तीन ऐतिहासिक, पुरातन, दुर्मीळ चित्रांचा आता शोध लागलाय… जर्मनी, फ्रान्स आणि अमेरिकेतल्या म्युझियममध्ये ही चित्रं असल्याची माहिती इतिहास अभ्यासक प्रसाद तारे यांनी समोर आणलीय.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

गोवळकोंडा शैलीतली ही चित्रं सतराव्या शतकातील आहेत. दोन चित्रांवर पर्शियन आणि रोमन लिपीत महाराजांचं नाव लिहिलंय… या चित्रांमध्ये महाराजांच्या पेहरावात डौलदार शिरोभूषण, त्यावर खोवलेला तुरा, पायघोळ अंगरखा, सुरवार, पायात मोजडी आहे. कानात मोत्याचा चौकडा, बोटात अंगठी व गळ्यात दोन मोत्यांच्या माळा असे अलंकार दिसतायत. करारी मुद्रा, बोलके डोळे आणि चेह-यावरची स्मितहास्ययुक्त प्रसन्नता ही महाराजांच्या तत्कालीन वर्णनात आढळणारी वैशिष्ट्यं चित्रात उतरलीय.

आंदोलन सुरूच राहणार, पुणे ते मंत्रालय लाँगमार्च शेवटचे अस्त्र – संभाजी छत्रपती, पंतप्रधानांनी ठरवलं तर मराठा आरक्षण मिळू शकतं – छत्रपती शाहू महाराजhttps://t.co/tcQwWuKja4

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 16, 2021

गोवळकोंडा ही कुतुबशहाची राजधानी.. तिथली ही प्रचलित चित्रशैली असल्यानं तिला गोवळकोंडा चित्रशैली म्हणतात. महाराज दक्षिण भारताच्या मोहिमेवर असताना ही चित्रे काढलेली असावीत किंवा त्यावेळी काढलेल्या त्यांच्या अन्य चित्रांच्या आधाराने इ. स. १७०० पर्यंत काढलेली असावीत, असा अंदाज आहे. चित्रांमध्ये नैसर्गिक जलरंग आणि सोन्याचा वापर करण्यात आलाय..

ही तिन्ही चित्रं समकालीन म्हणजे एकाच कालखंडातील असल्यानं त्यांचं ऐतिहासिक मूल्य अधिक आहे. शिवछत्रपतींचा वैभवशाली इतिहास जतन करणारी ही चित्रं निश्चितच प्रेरणादायी आहेत.

मोठा बँक घोटाळा, माजी आमदाराला अटक https://t.co/9ZCHnvlOZN

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 16, 2021

* चित्र क्र. १ जर्मनी येथील स्टेट आर्ट वस्तुसंग्रहालयातील आहे. त्यात केशरी म्यानात सरळ पात्याची तलवार महाराजांच्या हातात दाखवलीय…

* चित्र क्र. २ पॅरिसच्या खासगी वस्तुसंग्रहालयातील आहे. त्यात महाराजांच्या हातात पट्टा हे शस्त्र आहे. संग्रहालयातील नोंदीनुसार डाव्या हातात मोरपिसाप्रमाणे कोणत्या तरी पक्ष्याचं शोभेचे पीस आहे.

* चित्र क्र. ३ अमेरिका येथील फिलाडेल्फिया संग्रहालयातील आहे. चित्रात महाराजांच्या हातात पट्टा हे शस्त्र आणि कमरेला कट्यार दाखवलीय. युरोपमधून हे चित्र पुढं अमेरिकेत हस्तांतरित झाले.

चिमुकल्या वेदिकाला मिळालं 16 कोटीचं इंजेक्शन https://t.co/zeYHCtF1yh

— Surajya Digital (@SurajyaDigital) June 16, 2021

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #Search #never #seen #photos #ShivajiMaharaj, #शिवाजीमहाराजांच्या #कधीही #न #पाहिलेल्या #फोटोंचा #शोध
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ट्रक उलटला; लोकांनी लंपास केले मोबाइल फोन, कॉम्प्युटर, एलईडी टीव्ही
Next Article पाकिस्तानच्या संसदेत राडा; शिवीगाळ करत झाली हाणामारी

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?