नवी दिल्ली : माहिती तंत्रज्ञानाविषयी संसदेच्या स्थायी संसदीय समितीने फेसबुक आणि गुगल इंडियाच्या प्रतिनिधींची 29 जूनला बैठक होणार आहे. नागरिकांच्या अधिकारांची सुरक्षा, ऑनलाईन न्यूज मीडिया प्लॅटफॉर्मच्या चुकीच्या वापरावर बंदी घालण्यासंदर्भात चर्चा होणार आहे. यावेळी दोन्ही कंपन्यांची मते ऐकून घेतली जातील. दरम्यान, येत्या काही दिवसात YouTube व इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या प्रतिनिधींनाही बैठकीला बोलावण्यात येईल.
नेमबाजी विश्वचषक: राही सरनोबतने पटकावले सुवर्णपदक https://t.co/iotsVIVU9O
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 28, 2021
फेसबुक इंडिया आणि गुगल इंडिया यांना संसदेच्या माहिती तंत्रज्ञान विषयक स्थायी समितीने 29 जुलै रोजी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करणे आणि सोशल मिडीयाच्या गैरवापराला रोखण्याबाबतच्या उपाययोजनांबाबत या कंपन्यांना विचारणा करण्यात येणार आहे. यादरस्यान डिजीटल माध्यमांवर महिलांच्या सुरक्षिततेवर विशेष भर देण्यात येणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
भारताच्या नवीन माहिती तंत्रज्ञान विषयक कायद्यांबाबत चर्चा करण्यासाठी ट्विटरचे काही अधिकारी संसदीय समितीसमोर उपस्थित झाले होते. त्यानंतर 10 दिवसांनी हे समन्स बजावण्यात आले आहे. सोशल मिडीयाचे गैरवापर रोखणे आणि ऑनलाईन बातम्यांवर नियंत्रण ठेवण्याबाबत चर्चा करण्यासाठी 18 जुलैला संसदीय समितीने ट्विटरला पाचारण केले होते.
मोदी सरकारची मोठी घोषणा; आरोग्य क्षेत्रासाठी 50 हजार कोटींचं पॅकेज, 8 महत्त्वाच्या घोषणाhttps://t.co/E8Fvz3o6o4
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 28, 2021
भारतातील माहिती तंत्रज्ञानविषक नवीन कायदे हे सर्वसामान्य ग्राहकांचे हित लक्षात घेऊन बनवण्यात आले आहेत. या ग्राहकांना आपल्या अधिकारांबाबत अधिक सक्षम करण्यासाठीच केले गेले आहेत आणि यासंदर्भात 2018 मध्ये सर्व संबंधितांशी व्यापक चर्चा केल्यानंतरच हे नियम करण्यात आले आहेत, असे संयुक्त राष्ट्रातील भारताच्या कायम प्रतिनिधींनी 20 जून रोजी स्पष्ट केले आहे.
ओबीसी आरक्षणावरुन देवेंद्र फडणवीसांचे विधान, त्यास जयंत पाटील यांनी दिलेले प्रत्युत्तर #surajyadigital #OBC #OBCReservation #jayantpatil #DevendraFadnavis #NCP #भाजपा #राष्ट्रवादीhttps://t.co/MQC9Adv0oD
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 28, 2021