नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची 4 कोटी 20 लाखांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. 100 कोटी वसुलीप्रकरणात ईडीने ही कारवाई केली. ईडीने अनिल देशमुखांच्या नागपुरातील मालमत्तेवर टाच आणल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, देशमुख यांच्या दोन सचिवांना ईडीने अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून समोर आलेल्या माहितीच्या आधारे ईडीने अनिल देशमुख यांची मालमत्ता जप्त केली आहे.
20 लाख भारतीयांचे व्हॉट्सअॅप बंद; नवीन फीचर, इंटरनेटशिवायही करता येणार चॅटिंग https://t.co/abIgZ2eV3P
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 16, 2021
ईडीनं अनिल देशमुखांना चौकशीसाठी वारंवार कार्यालयात बोलावलं. परंतु आरोग्याच्या कारणास्तव देशमुख यांनी हजेरी लावली नाही. त्यासाठी समन्स जारी करण्यात आलं. मात्र तीन समन्सनंतरही देशमुख ईडीच्या कार्यालयात उपस्थित राहिले नाहीत. देशमुख यांच्या पत्नी आणि मुलगा यांनादेखील ईडीनं समन्स बजावलं होतं. मात्र हे दोघेही ईडीच्या कार्यालयात हजर राहिले नाहीत. मात्र, नंतर ईडीने देशमुखाच्या दोन सचिवांना अटक केली. या चौकशीतून ईडीला महत्त्वाची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे ईडीने देशमुखांवर जप्तीची कारवाई केली आहे.
दहावीचा निकाल जाहीर, खालील साईटवर पहा निकाल, सर्वात कमी निकाल नागपूरचा तर कोकण विभागाचा १०० टक्के निकाल #निकाल #10th #results #surajyadigital #दहावी #सुराज्यडिजिटल #kokan #Nagpur pic.twitter.com/dLu5sEKTIg
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 16, 2021
अनिल देशमुख यांचे वैयक्तिक सहाय्यक कुंदन शिंदे आणि संजीव पलांडे यांना अटक करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ही कारवाई केली आहे. शिंदे आणि पलांडे यांना मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये (पीएमएलए) अटक करण्यात आली आहे.
भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानं अनिल देशमुखांना एप्रिलमध्ये गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर ईडीनं देशमुख यांच्याशी संबंधित मालमत्तांवर धाडी घातल्या. देशमुख यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आली. या कारवाईवरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये आरोप – प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या गेल्या.
ईडीने 100 कोटींची वसुली प्रकरणात माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्याविरूद्ध मोठी कारवाई केली आहे. ईडीने देशमुख यांच्याकडे दोन कोटींची मालमत्ता जोडली आहे. देशमुख यांच्याकडे 1 कोटींची संपत्ती असून त्यापैकी 4 कोटी रुपये ईडीने जप्त केले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
ब्रेकिंग – दहावीत किती विद्यार्थी नापास झाले ? 957 विद्यार्थ्यांना 100 टक्के https://t.co/gx41i6AtoA
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 16, 2021
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर वसुलीचा आरोप केला होता. सिंग यांनी हे प्रकरण न्यायालयात नेले. यानंतर ईडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला. आज ईडीने अनिल देशमुख यांच्याकडे दोन कोटींची मालमत्ता जोडली आहे. पीएमएलए अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. देशमुख यांची संपत्तीही नागपुरात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
देशमुख यांच्याविरूद्ध केलेल्या कारवाईवर काँग्रेसचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाष्य केले. थोरात यांनी स्पष्ट केले की, सुरुवातीपासूनच राजकीय हेतूंतून ईडीचा वापर होत आहे.
दहावीचा 99.95 टक्के निकाल; साइट क्रॅश, निकाल मिळेना https://t.co/u82sj5NisQ
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 16, 2021
* निवडणूक आयोगाला मालमत्तांविषयी दिलेली माहिती
अनिल देशमुख यांनी नागपूरच्या काटोल विधानसभा मतदार संघातून 2019 ची निवडणूक लढविली होती. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाला आपल्या मालमत्तांविषयी माहिती दिली होती. निवडणूक आयोगाला देण्यात आलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे एकूण 14 कोटी 6 लाख रुपयांची संपत्ती आहे. यात 12.9 कोटी रुपयांची अचल मालमत्ता आणि 1.7 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे. याशिवाय त्यांच्यावर 6.6 कोटी रुपयांचे कर्ज आहे. त्यांनी 2018-19 मध्ये कर म्हणून 16 लाख रुपये भरले होते. 2017-18 मध्ये त्यांनी कर म्हणून 32 लाख रुपये भरले होते. त्यांची पत्नी आरती देशमुख यांनी 2018-19 मध्ये 14 लाख रुपये आणि 2017-18 मध्ये 11 लाख रुपये भरले होते.
देशमुख यांनी दागिन्यांमध्ये 29 लाख 26 हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे. एलआयसीने 2 लाख 97 हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे. बॉन्ड्स, शेअर्स आणि डिबेंचरमध्येही त्यांनी 3.86 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
* ईडीनं सोमय्यांना वकिलपत्र दिलंय का ?
आता केवळ 4 कोटी 20 लाख रुपये जप्त झाले आहेत. लवकरच 100 कोटी जप्त होतील आणि देशमुखांवरदेखील जप्ती येईल’, असा दावा करत भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी देशमुखांच्या अटकेचे संकेत दिले. त्याला राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं. ईडी स्वायत्त संस्था आहे ना? मग त्यांच्या कारवाईची माहिती सोमय्यांना आधीच कशी मिळते? ते इतक्या विश्वासानं दावे कसे काय करतात? असे प्रश्न शिंदेंनी उपस्थित केले. ईडीनं सोमय्यांना वकिलपत्र दिलंय का असा सवालदेखील त्यांनी विचारला.