टेंभुर्णी : भीमा नदी पात्रातून अवैधरित्या वाळू चोरून घेऊन जाणाऱ्या ट्रक्टरला थांबायला सांगणा-या पोलीस कर्मचा-यालाच धडक देऊन ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रकार मंगळवारी (ता. २४) मध्यरात्री १२.०५ वाजण्याचा सुमारास घडला. हा प्रकार टाकळी (ता. माढा) येथे घडला असून याप्रकरणी ट्रॕक्टर चालक, मालकासह तिघांवर टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. चालकाला ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणात मोटारसायकलसह एका बोलेरो जीपचे नुकसान झाले आहे. सुधीर सोरटे या चालकाला ताब्यात घेतले असून महादेव लक्ष्मण शेळके, समाधान जरक ( सर्व रा. टाकळी ता. माढा ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत मंगळवार दि. २४ रोजी भीमा नदी पात्रातून अवैधरित्या वाळू चोरून घेऊन जात असल्याची माहिती टेंभुर्णी पोलीसांना मिळाली होती. पोलीस कॉन्स्टेबल तुकाराम शिवाजी माने-देशमुख व घाडगे हे कारवाई करण्याकरिता गेले. मध्यरात्री १२ वाजण्याचा सुमारास ट्रॕक्टर क्रमांक एम. एच. ४३ क्यु ३३९४ चालक सुधीर सोरटे थांबवून ट्रॕक्टर टेंभुर्णी पोलीस ठाण्यात कारवाईसाठी घ्यायला सांगितले असता ट्रक्टरमध्ये बसलेले सुधीर सोरटे यांनी हातात टॉमी घेऊन पोलीसांच्या अंगावर धावून आला व धक्काबुक्की करू लागला.
ट्रॕक्टर मालक समाधान जरक याने ट्रॕक्टर चालकास ट्रॕक्टर पोलिसांचे अंगावर घालण्यास सांगितले. चालकानेही ट्रॕक्टर अंगावर घालण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलीस कर्मचारी यांनी बाजूला उड्या मारल्याने बचावले. ट्रॕक्टर मोटार सायकल क्रमांक एम. एच. ४५ एम. ७२७० या गाडीलवरून घातल्याने मोटारसायकलचे नुकसान झाले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
गावातील बाजूला उभ्या असलेल्या बोलेरो गाडी क्रमांक एम. एच. २१ व्ही. ९३६३ गाडीला धडक देऊन गाडीचे नुकसान केले. पोलीस कॉन्स्टेबल तुकाराम माने-देशमुख यांना किरकोळ मार लागला आहे. पोलीसांच्या अंगावर ट्रॕक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी या तीघांच्या विरोधात टेंभुर्णी पोलीस ठाण्यात कलम 307,353,332,379,188,427,34, पर्यावरण कायदा कलम 9,15 नुसार गुन्हा दाखल केला आहे. अवैधरित्या धंदे करणाऱ्यावर मोक्का सारखे गंभीर गुन्हे दाखल करण्याच इशारा नुतन पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी दिला आहे.
* तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या