सोलापूर : सोलापूर शहरातील काँग्रेस भवनाच्या बाहेरील बाजूस लावण्यात आलेल्या वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांच्या बॅनरवर काळी शाई फेकण्याचा धक्कादायक प्रकार आज शनिवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास उघडकीस आला. यामुळे काँग्रेस भवनात खळबळ माजली आहे. याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत. घटना समजताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
मात्र नेमकी शाई कुणी फेकली हे मात्र अद्याप समजू शकले नाही, शाई फेकून संबंधित इसम फरार झाले, शाई फेकण्याचे कळताच कार्यालयीन कर्मचारी राजू नीलगंठी यांनी सर्व बॅनर साफ करून घेतले. भिंतीवर मात्र तशीच शाही दिसत होती. ही माहिती मिळताच काँग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वाले काँग्रेस भवनात दाखल झाले.
काँग्रेस भवनाच्या बाहेर शहराध्यक्ष प्रकाश वाले, युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंबादास करगुळे, एनएसयुआय विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष गणेश डोंगरे यांची फलक आहेत. या तिन्ही फलकावर काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांचे फोटो आहेत. त्या फोटोवर काळी शाई फेकून मारण्यात आली आहे.
* शहराध्यक्ष आणि सरचिटणीसमध्ये झाली होती हमरी तुमरी
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ३१ ऑगस्ट रोजी सोलापुरात येत आहेत. या दौऱ्याच्या तयारीबाबत काँग्रेस भवनमध्ये आयोजित बैठकीत बुधवारी (ता. २५) शहराध्यक्ष प्रकाश वाले व सरचिटणीस केशव आहे. इंगळे यांच्या जोरदार हमरीतुमरी झाली. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करीत मतभेद मिटवले होते. काँग्रेस भवनमध्ये शहराध्यक्ष प्रकाश वाले आणि माजी परिवार सभापती केशव इंगळे यांच्या मध्ये हमरीतुमरी होऊन प्रसंग हाणामारीपर्यंत गेला होता. त्यानंतर प्रकाश वाले यांनी थेट राजीनामा देतो, अशी घोषणा केली. या वादामुळे केशव पिंगळे यांच्यावर निश्चित कारवाई केली जाईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या पार्श्वभूमीवर काँग्रेस भवनाच्या बाहेरील असलेल्या फलकांवर काळी शाई फेकण्याचा प्रकार घडला. त्या वादातून तर हा प्रकार घडला नाही ना असे तर्क वितर्क काढले जात आहेत. काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले व ज्येष्ठ नेते सुनील रसाळे यांनी या घटनेचा निषेध नोंदवत काँग्रेस पक्षाचे सोलापूर शहरांमध्ये सध्या चांगले काम सुरू आहे. त्यामुळे अनेकांना ते बघवत नाही , हिम्मत असेल तर समोर येऊन लढा, लपून नाही, असे आव्हान दिले.