Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बलात्कार प्रकरण – सलमान खान, अक्षय कुमारवर गुन्हा दाखल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीटॉलीवुड

बलात्कार प्रकरण – सलमान खान, अक्षय कुमारवर गुन्हा दाखल

Surajya Digital
Last updated: 2021/09/07 at 3:59 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

हैदराबाद : हैदराबादमध्ये 2019 ला पशुवैद्यक तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पीडितेचे नाव जाहीर केल्याबद्दल 38 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलमान खान, अक्षय कुमार, अनुपम खेर, फरहान अख्तर, अजय देवगण यांचं नाव आरोपींमध्ये आहे. त्यांनी या प्रकरणात ट्विट केले होते. त्यात पीडितेचे नाव समोर आले होते. दिल्लीचे वकील गौरव गुलाटी यांनी यासंदर्भात तक्रार केली.

याप्रकरणी तीस हजारी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. आपल्या याचिकेत तक्रारदार वकिलानं म्हटलं की, सामान्यांसाठी उदाहरण बनण्याऐवजी भारतीय सेलिब्रिटी नियम मोडत आहेत. त्यांनी पीडितेची ओळख उघड केली आहे. संबंधित सर्व सेलिब्रिटींना तातडीनं अटक करण्यात यावं, अशी मागणी याचिकाकर्त्या वकीलानं केली आहे. त्यामुळे अक्षय कुमार, सलमान खान, अजय देवगण सहित 38 कलाकारांवर अटकेची टांगती तलवार आहे.

2019 साली हैदराबादमध्ये एक बलात्काराचं धक्कादायक प्रकरण समोर आले होते. ज्यामध्ये 4 जणांनी एका मुलीवर सामूहिक बलात्कार केला होता. त्यानंतर नराधमांनी तिला जिवंत जाळलं होतं. या संतापजनक घटनेनं सर्वांना धक्का बसला होता.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

अनेकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करत निषेध नोंदवला होता. सामान्य लोकांसोबतच बॉलिवुडच्या कलाकारांनी देखील या घटनेबाबत दुःख आणि नाराजी व्यक्त केली होती.

पण पीडितेबद्दल दु: ख व्यक्त करताना काही सेलिब्रिटींनी पीडित मुलीची ओळख उघड केली होती. बलात्कार पीडित मुलीची ओळख उघड करणं हा कायद्यानं गुन्हा असल्यानं याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  हाती आलेल्या वृत्तानुसार, अजय देवगण , अक्षय कुमार, सलमान खान, रकुलप्रीत सिंग यांच्यासह 38 भारतीय सेलिब्रिटींवर बलात्कार पीडितेची ओळख सोशल मीडियावर उघड केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बॉलिवूड कलाकरांव्यतिरिक्त या सेलिब्रिटींमध्ये साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील काही कलाकारांचा देखील समावेश आहे. कायद्यानुसार कोणत्याही बलात्कार पीडितेचं नाव, छायाचित्र किंवा खरी ओळख कुठेही उघड करणं हा गुन्हा आहे. दिल्लीतील वकील गौरव गुलाटी यांनी बॉलिवूड सेलिब्रिटींविरोधात हा गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी दिल्लीतील सबजी मंडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 228A अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

You Might Also Like

आयुष कोमकर हत्या : आजीसह आणखी तिघांना गुजरातमधून अटक

मोर्शी एसडीओंच्या खाजगी कारमधून पिस्तूल चोरी; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

दिल्लीमध्ये अभिनेत्री हुमा कुरेशीच्या चुलत भावाची पार्किंग वादातून हत्या

तमिळ अभिनेते माधन बॉब यांचे निधन

लग्राच्या दोन दिवस आधी दारु पाजून केला गेम वरातीऐवजी अंत्ययात्रा, प्रेयसीच्या भावी पतीची हत्या

TAGGED: #Rape #case #SalmanKhan #AkshayKumar #charged, #बलात्कार #प्रकरण #सलमानखान #अक्षयकुमारवर #गुन्हा #दाखल
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पोलीस भरतीत कमी मार्क दिले म्हणून फौजदाराला मारहाण, क्रेनच्या धडकेत तरुण ठार
Next Article काळवीटचे शिकारी पोलिसांना बघताच पळाले, पाय बांधून घेऊन जात होते काळवीट

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?