नवी दिल्ली : मोदी सरकारने शेतकऱ्यांना गुडन्यूज दिली आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी 6 रब्बी पिकांची किमान आधारभूत किंमत (MSP) वाढवण्यात आली. या पिकांमध्ये गहू, हरभरा, मसूर, मोहरीचा समावेश आहे. नवीन MSP रब्बी पिकांच्या मार्केटिंग सीझन 2022-23 (आरएमएस 2023) साठी लागू होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
मोदी सरकारने एमएसपी वाढवण्याचा निर्णय अशा वेळी घेतला आहे जेव्हा शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा नवीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन तीव्र केले आहे. अलीकडे, शेतकरी संघटनांनी उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये महापंचायत आयोजित केली आहे. काही महिन्यांनी यूपी, पंजाबसह 5 राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. असे मानले जाते की यूपी आणि पंजाबमध्ये भाजपलाही शेतकऱ्यांच्या नाराजीला सामोरे जावे लागू शकते.
एकीकडे मोदी सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकरी आक्रमक झालेले आहेत. राजधानी दिल्लीच्या विविध सीमांवर हे आंदोलन सुरु असतानाच मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने आज कॅबिनेट बैठकीत महत्वाचा निर्णय घेत, 2022-23 विपणन हंगामासाठी सहा रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किंमती (एमएसपी) जाहीर केल्या आहेत. गव्हाच्या एमएसपीमध्ये (MSP) फक्त 2.03 टक्के वाढ दिसून आली, जी गेल्या 12 वर्षातील सर्वात कमी आहे.
केंद्रीय मंत्रिमंडल ने रबी विपणन मौसम (आरएमएस) 2022-23 के लिए सभी अधिदेशित रबी फसलों के लिए न्यूनतम समर्थन मूल्य (एमएसपी) में वृद्धि को मंजूरी दी#CabinetDecisions #MSPhaiAurRahega pic.twitter.com/isCg8EHEuN
— पीआईबी हिंदी (@PIBHindi) September 8, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मंत्रिमंडळाने गव्हाच्या एमएसपीमध्ये प्रति क्विंटल 40 रुपयांची वाढ केली असून ती आता 2015 रुपये प्रति क्विंटल झाली आहे. याशिवाय हरभऱ्याची MSP 130 रुपयांनी वाढवून 5,100 रुपये प्रति क्विंटल करण्यात आली आहे. या निर्णयात तेलबियांच्या एमएसपीमध्ये जास्तीत जास्त वाढ करण्यात आली असून केंद्र सरकारने मोहरीच्या एमएसपीमध्ये प्रति क्विंटल 400 रुपयांची वाढ केल्याने आता मोहरीची एमएसपी 4,650 रुपये होणार आहे. त्याचबरोबर मसूर 400 रुपयांनी वाढून 5,100 रुपये प्रति क्विंटल, बार्लीची एमएसपी 1600 रुपयांवरून 1635 रुपये प्रति क्विंटल व सूर्यफुलावरील एमएसपी 114 रुपयांनी वाढवून 5,327 रुपये प्रति क्विंटल केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक व्यवहार मंत्रिमंडळ समितीने (सीसीईए) रब्बी विपणन हंगाम (आरएमएस) 2022-23 साठी सर्व रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किंमती (एमएसपी) मध्ये वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. टक्केवारीच्या दृष्टीने, गव्हाच्या एमएसपीमध्ये झालेली वाढ गेल्या 12 वर्षांतील सर्वात कमी आहे. शेवटच्या वेळी जेव्हा गव्हाच्या एमएसपीमध्ये सर्वात कमी वाढ 2009-10 मध्ये झाली होती, जेव्हा 2009-10 मध्ये केवळ 1.85 टक्के 1,100 रुपये प्रति क्विंटल वाढवण्यात आली होती, तर 2008-09 मध्ये 1,080 रुपये होती. खरं तर, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाकडे उपलब्ध असलेली आकडेवारी 2017-18 पासून गव्हाच्या एमएसपीच्या वाढीच्या दरात 6.77 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यात 2018-19 (6.05 %), 2019-20 (4.62 %) आणि 2020-21 (2.60 %) मध्ये कमी वाढ झाली.
रब्बी पिकांच्या एमएसपीमध्ये विपणन वर्ष 2022-23 साठी केलेली वाढ 2018-19 च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात केलेल्या घोषणांनुसार असल्याचे केंद्र सरकारचे मत आहे. 2018-19 मध्ये सरकारने जाहीर केले होते की पिकांसाठी MSP ही खर्चाच्या किमान दीडपट इतकी केली जाईल. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला रास्त भाव मिळू शकेल आणि त्यांच्या उत्पन्नातही वाढ होईल. अंदाजानुसार, एमएसपी वाढवल्यानंतर शेतकऱ्यांना मोहरीसाठी खर्चाच्या तुलनेत 100% लाभ मिळेल. तर, मसूरवर 79 टक्के, हरभऱ्यावर 74 टक्के आणि सूर्यफुलावर 50 टक्के लाभ मिळू शकेल. त्यामुळे केंद्राकडून वाढवण्यात आलेल्या या किमान आधारभूत किंमतीमधून शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.