बार्शी : गणेश उत्सवात आरतीसाठी परवानगी पेक्षा अधिक लोक जमविल्यावरुन आणि रस्त्यावर वाढदिवस साजरा केल्याबाबत कोरोना नियमपालनाचा आग्रह धरल्यामुळे शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास शेळके आणि आमदार राजेंद्र राऊत यांच्यात रात्रीच्या सुमारास शाब्दिक चकमक झाली.
पो.नि. शेळके हे आपल्या सहकार्यांसमवेत शहरात फिरत होते. तेव्हा त्यांना भोसले चौक येथील गणेश मंडळासमोर गर्दी दिसली. त्यामुळे गर्दीला पांगवण्याच्या सूचना देवून ते पुढे गेले. त्यानंतर तिथे फटाके फोडल्याचे आवाज आले. त्यामुळे पुढील चौकातून फिरुन ते माघारी आले. त्यावेळी तिथे वाढदिवस साजरा करणारे त्यांना पाहून पळून गेले.
त्यानंतर तिथे आलेल्या आमदार राऊत यांनी सर्व गणेश मंडळांनी खाजगी जागेतच उत्सव साजरा केला आहे. रस्त्यावर गर्दी नाही. आरतीला जास्त माणसे नाहीत. त्यामुळे कोरोना नियम पालनाबाबत अतिरेक करु नये. तसेच रस्त्यावर गेल्या 50-70 वर्षापासून फळ विक्रेते आपले गाडी लावतात. त्यांना प्रतिबंध करु नये. त्रास देवू नये. गुन्हा दाखल केल्याने काही फरक पडणार नाही, फटाके फक्त बार्शीतच उडत नाहीत, असे सांगण्यास सुरुवात केली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यावर शेळके यांनी गणेश मंडळांना चार पेक्षा जास्त लोकांना परवानगी नाही. हा शासनाचा आदेश आहे. वाढदिवसासाठी 25 पेक्षा जास्त लोक होते. वाजंत्री होते. रस्त्यावर फटाके उडविले. हे योग्य नाही. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. नियमांचे पालन सर्वांनी केले पाहिजे. व्यापार्यांनी नियमाने वागावे. रस्त्यावर लोकप्रतिनिधींनी वाद घालू नये. सार्वजनिक ठिकाणी कर्तव्यावर असणार्यांबरोबर मुद्दा करु नये, असे सांगितले.
* पाठीमागे बसलेल्या इसमाने केला चाकूने वार, दुचाकीवरील तरुण जखमी