Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आर्यन खान केस – मुनमुनने सॅनिटरी पॅड्समध्ये लपवले ड्रग्स, व्हिडिओ व्हायरल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीटॉलीवुड

आर्यन खान केस – मुनमुनने सॅनिटरी पॅड्समध्ये लपवले ड्रग्स, व्हिडिओ व्हायरल

Surajya Digital
Last updated: 2021/10/10 at 12:22 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मुंबई : क्रूझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणी ज्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी ड्रग्ज कुठे लपवले होते, याची माहिती समोर आली आहे. आरोपी मुनमुन धामेचाने ड्रग्ज लपवण्यासाठी सॅनिटरी पॅड्सचा वापर केला, असा एनसीबीचा दावा आहे. मुनमुन धामेचा क्रुझवर ज्या खोलीत होती, तिथल्या झडतीचा एक व्हिडिओ एनसीबीने जारी केला आहे. तिथे सॅनिटरी पॅड्समध्ये ड्रग्ज लपवल्याचं आढळून आलं आहे, असा दावा एनसीबीकडून करण्यात आला आहे.

मुनमुन धामेचा क्रुझवर ज्या खोलीत होती, तिथल्या झडतीचा एक व्हिडीओ एनसीबीने जारी केला आहे. तिथे सॅनिटरी पॅड्समध्ये ड्रग्ज लपवल्याचं आढळून आलं आहे, असा दावा एनसीबीकडून करण्यात आला आहे. या प्रकरणात ज्या तरुणींना अटक करण्यात आली आहे, त्यांनीही ड्रग्ज लपवण्यासाठी सॅनिटरी पॅड्सचा वापर केला होता, तर तरुणांनी शूजमध्ये ड्रग्ज लपवले होते, असाही एनसीबीचा दावा आहे.

#AryanKhanDrugCase Drugs being recovered from sanitary pad from ship room of accused munmun
(Exclusive footage) #DrugsParty pic.twitter.com/V2gcZktVLT

— Gyanendra Shukla (@gyanu999) October 9, 2021

ट्वीटर हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. क्रूझवरील मुनमुन धमेचाच्या रूममधून ड्रग्ज सापडल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका अधिकाऱ्याने सॅनिटरी पॅड रुममधील कार्पेटवर ठेवून त्यातून ड्रगची गोळी बाहेर काढताना दिसत आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

मुनमुन एक मॉडल आहे. ती ३९ वर्षांची आहे. ‘एनसीबी’ने ३ ऑक्टोबरला दुपारी दोन वाजता तिला अटक केली होती. ही मूळची मध्य प्रदेशमधील आहेत. सागर जिल्ह्यातील तिचे वडील उद्योजक होते. त्‍यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. मुनमुन धामेचा हिच्या आईचे गेल्या वर्षी निधन झाले. तिचा भाऊ प्रिन्स धमेचा हा दिल्‍लीत वास्‍तव्‍याला आहे.

मुनमुनने आपले शालेय शिक्षण सागर जिल्ह्यात पूर्ण केले. सागर जिल्ह्यात फार कमी लोकांना तिच्याबद्दल माहिती आहे. कारण मागील काही वर्ष ती आपल्‍या भावासोबत दिल्लीत आणि त्याआधी भोपाळमध्ये राहिली आहे. ती नेहमी सोशल मीडियावर सक्रीय असते.

तिचे १० हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, विकी कौशल आणि अन्‍य अभिनेत्‍यांना फॉलो करते. मुनमुनच्या वकिलांनी तिच्याकडे ड्रग्स नसल्याचे सांगितले होते. अधिकाऱ्यांच्या तपासादरम्यान मुनमुन त्या खोलीत जाण्याआधी काही जण तिथे होते. यावेळी एनसीबीचे अधिकारी आले, त्यांनी त्या खोलीतील कार्पेटवर पडलेले ड्रग मुनमुनचे असल्याचे सांगत तिला अटक केल्याचा आरोप केला.

मुंबई ड्रग्ज केस प्रकरणात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा जामीन अर्ज किल्ला कोर्टाने पुन्हा एकदा फेटाळून लावला. दोन दिवसांपूर्वी आर्यन खानच्या जामीन अर्जावर कोर्टात प्रचंड युक्तिवाद रंगला. पण अखेर कोर्टाने आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला. कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला. पण किला कोर्टात जामीन अर्ज दाखल करता येऊ शकत नाही, या मुद्द्यावर बोट ठेवून कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

You Might Also Like

आयुष कोमकर हत्या : आजीसह आणखी तिघांना गुजरातमधून अटक

मोर्शी एसडीओंच्या खाजगी कारमधून पिस्तूल चोरी; प्रशासकीय वर्तुळात खळबळ

दिल्लीमध्ये अभिनेत्री हुमा कुरेशीच्या चुलत भावाची पार्किंग वादातून हत्या

तमिळ अभिनेते माधन बॉब यांचे निधन

लग्राच्या दोन दिवस आधी दारु पाजून केला गेम वरातीऐवजी अंत्ययात्रा, प्रेयसीच्या भावी पतीची हत्या

TAGGED: #AryanKhan #case #Moonmoon #hides #drugs #sanitarypads #video #viral, #आर्यनखान #केस #मुनमुन #सॅनिटरी #पॅड्स #लपवले #ड्रग्स #व्हिडिओ #व्हायरल
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ‘त्या’ क्रूझवर पार्थ पवारही होते का ? समीर वानखेडे म्हणाले…देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
Next Article बुधवारी पुण्यात येऊन आणखी एक पोलखोल करणार – किरीट सोमय्या

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?