मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून ST कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. या संपावर तोडगा काढण्याच्या दिशेने राज्य सरकारने पाऊले उचलल्याचे दिसत आहे. राज्यात सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरी एक महत्वाची बैठक सुरु आहे. या बैठकीला अनिल परब, बाळासाहेब थोरात, गोपीचंद पडळकर यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत.
प्रत्यक्षात एसाटी संपामध्ये भाग घेतलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या 84, 866 असल्याचे सांगितले आहे.
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, परिवहन मंत्री अनिल परब आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात आज फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी बैठक झाली. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. त्यानंतर अनिल परब यांनी या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्दावर देखील चर्चा झाल्याची माहिती दिली आहे. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्यावर चर्चा झाली असून, देवेंद्र फडणवीस यांनी काही सुचना केल्या आहेत, अशी माहिती यावेळी अनिल परब यांनी दिली. देवेंद्र फडणवीस यांच्याशी यावेळी सकारात्मक चर्चा झाली असून, त्यांनी काही सूचना केल्या आहेत. शासनाचं मत घेऊन त्या सुचनांवर विचार करू असंही परब यांनी यावेळी सांगितलं आहे. त्यामुळे आता मुद्यावर तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
काल नागपुरात रात्री स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना अटक करण्यात आली आहे. कापूस-सोयाबीन प्रश्नावर काल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकरांनी बेमुदत अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन सुरू केलं होतय. सरकारने कोरोना आणि जमावबंदीचं कारण देत तुपकरांच्या आंदोलनाला परवानगी नाकारलीय. आंदोलनादरम्यान काल रात्री 10 वाजून 20 मिनिटांनी तुपकरांना अटक करण्यात आली. प्रकृती खालावलेल्या तुपकरांना जबरदस्तीने उपचारांसाठी नागपुरात दवाखान्यात नेण्यात आलं. मात्र, त्यांनी उपचारास स्पष्ट नकार देत आपलं अन्नत्याग आंदोलन सुरूच ठेवलंय. अखेर सरकारने तुपकरांना रातोरात जबरदस्तीने पोलीस बंदोबस्तात बुलडाण्याकडे रवाना केलं.
दरम्यान राज्यात सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरी एक महत्वाची बैठक झाली. या बैठकीला अनिल परब, बाळासाहेब थोरात, गोपीचंद पडळकर यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत
एसटी महामंडळाने आतापर्यंत 2 हजार 178 कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. दरम्यान मंगळवारी एसटी महामंडळाचे सुमारे साडेसात हजार कर्मचारी कामावर हजर झाले. एसटीची हजेरी पटावरील एकूण कामगारांची संख्या 92 हजार 266 आहे. तर सध्या हजर कर्मचाऱ्यांची संख्या 7 हजार 400 आहे. यामध्ये प्रशासकीय 5224 कर्मचारी, 1773 कार्यशाळा कर्मचारी, 264 चालक आणि 139 वाहक आहेत. प्रत्यक्षात संपामध्ये भाग घेतलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या 84, 866 आहे.