मुंबई : उद्या कार्तिक शुक्ल पौर्णिमेला (19 नोव्हेंबर) खंडग्रास चंद्रग्रहण आहे. भारतीय वेळेनुसार चंद्रग्रहण दुपारी 12.48 वाजता सुरू होईल व 4.17 वाजता संपेल. भारतीय वेळेनुसार हे ग्रहण दिवसा होणार असून त्यामुळे ते भारतात दिसणार नाही.
आसाम, अरुणाचल प्रदेशच्या काही भागात काही मिनिटांसाठी हे ग्रहण पाहता येईल. तर पश्चिम आफ्रिका, पश्चिम युरोप, उत्तर व दक्षिण अमेरिका येथे चंद्रग्रहण दिसणार आहे. या वर्षातील हे शेवटचे आणि 580 वर्षातील सर्वात मोठे खंडग्रास चंद्रग्रहण आहे.
अरुणाचल प्रदेशातील फक्त काही डोंगराळ भागात एक मिनिटापेक्षा कमी काळ ग्रहण दिसेल. नासाच्या वेबसाइटनुसार, हे आंशिक चंद्रग्रहण 3 तास 28 मिनिटे चालणार आहे. जे 580 वर्षातील सर्वात मोठे खंडग्रास चंद्रग्रहण आहे. भारतीय वेळेनुसार ग्रहण दुपारी 12.48 वाजता सुरू होईल आणि 4.17 वाजता संपेल.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी शुक्रवार, 19 नोव्हेंबर रोजी होणारे खंडग्रास चंद्रग्रहण भारतातून दिसणार नसल्याचे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. याविषयी अधिक माहिती देतांना सोमण म्हणाले की हे खंडग्रास चंद्रग्रहण शुक्रवार 19 नोव्हेंबर रोजी भारतीय प्रमाण वेळेप्रमाणे दुपारी 12-38 ते सायं. 4-17 यावेळेत होणार आहे. परंतु त्यावेळी चंद्र आपल्या दृश्य आकाशात नसल्याने हे खंडग्रास चंद्रग्रहण आपणास दिसणार नाही.
हे खंडग्रास चंद्रग्रहण आशिया खंडाचा अतिपूर्वेकडील प्रदेश, उत्तर पश्चिम यूरोप, आफ्रिका खंडाचा वायव्येकडील प्रदेश, संपूर्ण अमेरिका आणि ॲास्ट्रेलिया येथून दिसेल. मात्र पुढच्यावर्षी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी मंगळवार, 8 नोव्हेंबर 2022 रोजी होणारे चंद्रग्रहण भारतातून दिसणार असल्याचे दा, कृ. सोमण यांनी सांगितले.
सध्या गुरू-शनि मकर राशीत असून खंडग्रास चंद्रग्रहण आहे. मकर आणि चंद्रग्रहणातील गुरु-शनिचा योग 2021 च्या 59 वर्षांपूर्वी 19 फेब्रुवारी 1962 रोजी झाला होता. 19 नोव्हेंबरला ग्रहण वृषभ राशीत होत आहे, चंद्र या राशीत राहील.