Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पतीने पत्नीला दिला ‘ताजमहाल’ गिफ्ट
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

पतीने पत्नीला दिला ‘ताजमहाल’ गिफ्ट

Surajya Digital
Last updated: 2021/11/22 at 6:24 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

भोपाळ : मध्य प्रदेशातील बुरहानपूर येथे एका व्यक्तीने (आनंद प्रकाश चौक्से) आपल्या पत्नीला (मंजुषा) ‘ताजमहाल’ सारखे दिसणारे घर गिफ्ट दिले आहे. याचे फोटो व्हायरल झाले आहेत.

४ बेडरुमचे हे घर आहे. हे घर तयार करण्यासाठी ३ वर्षे लागली. या घरामध्ये एक ग्रंथालय आहे. सोबतच मेडिटेशन करण्यासाठी एक स्वतंत्र खोली आहे. या घरात मकराना मार्बल्सचा वापर करण्यात आला आहे. ताजमहाल हे निखळ प्रेमाचे प्रतीक आहे. या प्रेमाची निशाणी म्हणून ताजमहालची प्रतिकृती भेट दिली जाते.

हे ताजमहालसारखे घर बांधण्यासाठी आणि सजवण्यासाठी तब्बल तीन वर्षे लागली. मिळालेल्या माहितीनुसार, या घरात चार बेडरूम, एक मोठा हॉल, एक किचन, लायब्ररी, मेडिटेशन रुम आहे. या आलिशान ताजमहाल प्रमाणे दिसणाऱ्या घराचे क्षेत्रफळ ९० बाय ९० चौरस मीटर इतके आहे. हे घर मध्य प्रदेशचे शिक्षणतज्ज्ञ आनंद प्रकाश चौकसे यांनी बनवले आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

याविषयी अधिक माहिती देताना आनंद चौकसे म्हणाले, ताजमहालासारखे घर बांधताना चौकसे यांना अनेक अडचणी आल्या. मात्र त्यांनी अतूट प्रेम आणि विश्वासाच्या जोरावर आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने ताजमहालाप्रमाणे दिसणारे घर यशस्वीरित्या तयार केले आहे. या अवघड घराचे काम पूर्ण करण्यासाठी तब्बल तीन वर्षे लागली, असे घर बांधणारे अभियंता प्रवीण चौकसे सांगतात.

* असे आहे ताजमहालसारखे घर

ताजमहालासारखे दिसणाऱ्या या घराचे क्षेत्रफळ ९० बाय ९० चौरस मीटर इतके आहे.  घराची उंची २९ फूट ठेवण्यात आली आहे. यामध्ये ताजमहालसारख्या टॉवरची हुबेहूब प्रतिकृती बनवण्यात आली आहे. याशिवाय घराची फरशी राजस्थानच्या मकराना येथील कामगिरांकडून बनवण्यात आली आहे. घरातील नक्षीकाम हे बंगाल आणि इंदूर येथील कारागिरांनी केले आहे. तर फर्निचर सुरत आणि मुंबईतील कारागिरांनी बनवले आहे. या घरात एक मोठा हॉल, खाली दोन बेडरूम आणि वरच्या मजल्यावर फक्त दोन बेडरूम आहेत. या घराला अनेक पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांसाठी हे घर आता आकर्षणाचा विषय ठरले आहे.

You Might Also Like

राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली

नवीन वेळापत्रकानुसार कंपनीने ई-बसेसचा पुरवठा करावा – प्रताप सरनाईक

नव्या भारताने प्रतिशोधाची नवी ताकद दाखवली – पंतप्रधान

पाकिस्तानी मुस्लिमांनी धर्म विचारून हुिंदुंना मारले- प्रज्ञा ठाकूर

TAGGED: #Husband #gives #wife #TajMahal #gift, #पतीने #पत्नीला #ताजमहाल #गिफ्ट #चौकसे
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article केंद्र सरकारचा नव्या वर्षात वस्त्रोद्योगाला हादरा, 5 वरुन थेट 12 टक्के जीएसटीत वाढ
Next Article माजी पोलीस आयुक्तांना मुंबईत राहायला वाटते भीती, सिंग यांना अटकेपासून संरक्षण

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?