नवी दिल्ली : राष्ट्रीय कुटंब आरोग्य सर्व्हेक्षणात एक धक्कादायक बाब पुढे आली आहे. या सर्व्हेत सरकारने नागरिकांना अनेक प्रश्न विचारले. त्यामध्ये पतीने पत्नीला मारहाण करणे योग्य आहे का? असा सवाल करण्यात आला. त्यावर तेलंगणातील 83.8 टक्के महिलांनी पतीने आपल्या पत्नीला मारहाण करणे योग्य असल्याचे म्हटले आहे. तर कर्नाटकातील 81.9 टक्के पुरुषांनी मारहाण करणे योग्य असल्याचे म्हटले आहे.
राष्ट्रीय कुटंब आरोग्य सर्व्हेक्षणात
घरगुती हिंसाचाराबाबत धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहे. राष्ट्रीय परिवार आणि आरोग्य सर्वेक्षण म्हणजेच NFHS सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, केंद्रशासित प्रदेशांसह 14 राज्यांमधील सुमारे 30 टक्के महिलांनी काही विशिष्ट परिस्थितीत त्यांना पतीकडून केली जाणारी मारहाण योग्य असल्याचे म्हटले आहे. अहवालानुसार, तीन राज्यांतील 75 टक्क्यांहून अधिक महिलांनी पतीकडून होणाऱ्या घरगुती हिंसाचाराला समर्थनच दिलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
(राष्ट्रीय परिवार आणि आरोग्य सर्वेक्षण) NFHS-5 डेटावरून असे दिसून आले की, या तीन राज्यांमध्ये, तेलंगणातील 84 टक्के, आंध्र प्रदेशात 84 टक्के आणि कर्नाटकातील 77 टक्क्यांहून अधिक महिलांना असे वाटले की, त्यांच्या पतींनी त्यांना मारहाण करणे योग्य आहे. NFHS ने आपल्या सर्वेक्षणात महिलांना असा प्रश्न विचारला होता की, एखाद्या पतीने त्याच्या पत्नीला मारणे योग्य आहे की नाही?
या राज्यांतील महिलांची टक्केवारी जर आपण इतर राज्यांच्या आकडेवारीत बोललो, तर मणिपूरमधील 66 टक्के महिला, केरळमधील 52 टक्के, जम्मू-काश्मीरमधील 49 टक्के महिलांना पुरुषांना त्यांच्या पत्नीला मारहाण करणे योग्य वाटते. दुसरीकडे, महाराष्ट्राबाबत बोलायचे झाले तर येथील 44 टक्के महिलांना तर पश्चिम बंगालमधील 42 टक्के महिलांना नवऱ्याने मारहाण करणे योग्य वाटते. संपूर्ण अहवालाच्या विश्लेषणातून घरगुती हिंसाचारावर हा एक धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे.
* देशात पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या सर्वाधिक
राष्ट्रीय परिवार आणि आरोग्य सर्वेक्षण (NFHS) च्या मते देशात पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या सर्वाधिक आहे. आता दर 1,000 पुरुषांमागे 1,020 महिला आहेत. पुरुषांच्या तुलनेत महिलांची लोकसंख्या 1000 च्या वर पोहोचण्याची स्वातंत्र्यानंतरची ही पहिलीच वेळ आहे. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-5 (NFHS-5) मध्ये ही आकडेवारी समोर आलीय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं बुधवारी ही आकडेवारी जाहीर केली. यापूर्वी 2015-16 मध्ये आयोजित केलेल्या NFHS-4 मध्ये ही संख्या दर 1,000 पुरुषांमागे 991 महिला होती.
या आकडेवारीवरुन स्पष्ट होतं की, भारतात आता महिलांची संख्या सातत्यानं वाढत आहे. 1990 च्या काळात 1000 पुरुषांच्या तुलनेत महिलांची संख्या 927 होती. 2005-06 मध्ये तिसऱ्या NHFS सर्वे मध्ये ते 1000-1000 सोबत बरोबर होते. त्यानंतर 205-16 मध्ये चौथ्या सर्व्हेत या आकडेवारीत पुन्हा घट दिसून आली. 1000 पुरुषांच्या तुलनेत 991 महिला होत्या. परंतु, पहिल्यांदाच आता महिलांची संख्या ही पुरुषांपेक्षा अधिक झालीय. एवढंच नाही, तर लिंग गुणोत्तरातही सुधारणा झालीय. 2015-16 मध्ये 1000 मुलांमागे 919 मुली होत्या, त्या आता 2019-21 मध्ये 1000 मुलांमागे 929 मुलींवर सुधारलं आहे.