नवी दिल्ली : बुल्ली बाई ॲपच्या (Bully Bai app) मुख्य सूत्रधारास दिल्ली (Delhi police) पोलिसांनी आसाममधून (assam) अटक (arrested) केली आहे. नीरज बिश्नोई असे आरोपीचे नाव आहे. त्याचे वय 21 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी यापूर्वी मुंबई पोलिसांनी (mumbai police) 3 जणांना अटक केली होती. दरम्यान, बुल्ली बाई ॲपवरुन मुस्लिम महिलांची बदनामी ( Defamation) करण्यात आली होती. सोशल मीडियावरील मुस्लिम महिलांचे फोटो ॲपवर (photo aap) अपलोड करून त्याखाली आक्षेपार्ह पोस्ट नमूद करण्यात आल्या होत्या.
बुल्ली बाईॲपच्या मुख्य ट्विटर ( Main Twitter) खातेदाराला दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकातीलइंटेलिजन्स फ्यूजन आणि स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्स युनिट ( IFSO) ने आसाममधून अटक केली आहे. दुपारी 3:30 वाजता दिल्ली विमानतळावर (airport) या आरोपीला घेऊन टीम (team) पोहोचेल. इनपुट मिळाल्यानंतर दिल्ली पोलिस आसाममध्ये पोहोचले होते, तेथून बुल्ली बाईच्या निर्मात्याला अटक करण्यात आली आहे.
नीरज बिश्नोई असे आरोपीचे नाव आहे. त्याचे वय 21 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी यापूर्वी मुंबई पोलिसांनी तीन जणांना अटक केली होती. यामध्ये श्वेता सिंग, विशाल कुमार आणि मयंक रावत यांना अटक करण्यात आली. श्वेता सिंगला उत्तराखंडमधून अटक करण्यात आली.
मुस्लिम महिला (muslim women) बदनामी प्रकरणी इंटरनेटवर (internet) बुली बाई ॲपवरून सोशल मीडियावरील महिलांचे फोटो अपलोड करून त्याखाली आक्षेपार्ह पोस्ट नमूद करण्यात आल्या होत्या. 31 डिसेंबरला ॲप डेव्हलप करण्यात आलं. त्यानंतर बुली बाई ॲपचे ट्विटर हँडल (handl) तयार करण्यात आले होते. बंगळुरुचा विशाल कुमार झा इंजिनियरिंगच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थीसह तिघांना अटक करण्यात आली आहे.
प्रत्यक्षात असा कोणताही ‘लिलाव’ किंवा ‘विक्री’ झाली नव्हती परंतु या ॲपच्या माध्यातून महिलांना अपमानित करणे आणि त्यांना धमकावण्याचा हेतू या ॲपचा असल्याचे समोर आले होते. यातील अनेक महिला सोशल मीडियावर (social media) खूप सक्रिय आहेत.
Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
* आता टेलिग्राम चॅनलला ब्लॉक
आता सरकारने एका हिंदू महिलांचे अश्लील फोटो शेअर करणाऱ्या एका टेलिग्राम चॅनलला (Telegram Channel) ब्लॉक (block) केले आहे, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली आहे.
बुली बाई ॲपचा वाद सोशल मीडियावर पसरल्यानंतर आणि लोकांनी मुस्लिम महिलांना लक्ष्य (target) केल्याबद्दल देशातील उजव्या विचारसरणीच्या गटांवर टीका सुरू केल्यानंतर, सोशल मीडिया वर हिंदू महिलांना (hindu women) टार्गेट करणारे ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल हायलाइट (highlights) करण्यास सुरुवात केली. बुल्लीबाई प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी केलेल्या झटपट अटकेनंतर लोकांनी हिंदू महिलांचा ऑनलाइन छळ (Online harassment) रोखण्यासाठी कोणतीही पावले का उचलली जात नाहीत, असा सवाल (question) विचारला जात आहे.
महिलांचे अश्लील फोटो ( Pornographic photos) आणि द्वेषपूर्ण मेसेज ( Hateful message) पसरवल्याबद्दल ‘हिंदू रंडीया’ नावाच्या चॅनलसंबंधी राग व्यक्त केला गेल्यानंतर आता हे टेलिग्राम चॅनल ब्लॉक करण्यात आले आहे. दरम्यान चॅनेल ब्लॉक केले असून, भारत सरकार (india Government) कारवाईसाठी राज्यांच्या पोलिस अधिकाऱ्यांशी समन्वय साधत आहे, असे ट्विट आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केले. हे टेलिग्राम चॅनल कोणी तयार केले आणि पोलिसांनी काय कारवाई केली याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती ( Official information) मिळालेली नाही.
* गीतकार जावेद अख्तर यांची प्रतिक्रिया
बुली बाई ॲपच्या वादग्रस्त प्रकरणात मुंबई पोलिसांनी 18 वर्षीय तरुणीला अटक केली आहे. अटकेनंतर काही वेळातच ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर ( Senior lyricist Javed Akhtar) यांनी सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून आपले मत (opnian) व्यक्त केले आहे. त्यांनी लोकांना मुलीला माफ (sorry) आवाहन केले आहे.
ट्विटर हँडलवर नेटिझन्सना दया दाखवून मुलीला माफ करण्यास सांगितले. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलयं की, “जर “बुल्ली बाई” अॅप 18 वर्षीय मुलीद्वारा बनविण्यात आले असून जिने नुकतेच कर्करोग (cancer) आणि कोरोनामुळे (corona) आपले पालक गमावले आहेत. तर मला वाटते की, महिलांनी तिला भेटले पाहिजे आणि वडिलधाऱ्यांप्रमाणे तिला समजून घेतले पाहिजे. मात्र जे ही तिने केलं ते अगदी चुकीचं केलं. तिच्याप्रतील दया दाखवा आणि तिला क्षमा करा.”