Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अक्षता सोहळा : योगदंडाशी कुंभार कन्येचा विवाह – नंदीध्वज मिरवणूक नाही
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

अक्षता सोहळा : योगदंडाशी कुंभार कन्येचा विवाह – नंदीध्वज मिरवणूक नाही

Surajya Digital
Last updated: 2022/01/13 at 5:12 PM
Surajya Digital
Share
5 Min Read
SHARE

सोलापूर – ग्रामदैवत (Village Goddess) सिध्दरामेश्वरांच्या महायात्रेतील अक्षता सोहळा (Akshata ceremony) आज सकाळी ११.३० च्या सुमारास सम्मती कट्ट्यावर पार पडला. या आधी सिध्देश्वर महाराजांचा योगदंड (Yogeshwar of Siddheshwar Maharaj) वाहनातून मिरवणूकीनं सम्मती कट्ट्यावर आणण्यात आला. येथे परंपरेप्रमाणे धार्मिक विधी ( Religious rites) झाल्यानंतर दिड्यम दिड्यम.. सत्यम्.. सत्यम् या सम्मती वाचनानं अक्षता सोहळा पार पडला.

दरवर्षी सातही नंदीध्वजांची (Nandi Dhwaj) मिरवणूक पंचरंगी ध्वज, हलगी-तुताऱ्यांच्या निनादात, घोड्याचा ऑडी नाच अन्‌ आकर्षक नाशिक ढोलपथक, बैलगाडी, श्री सिद्धरामेश्‍वरांची बग्गी, पालखी अन्‌ भक्तांची बाराबंदी अशा भक्तिमय वातावरणात शाही मिरवणुकीने लाखो भाविकांच्या साक्षीने ‘दिड्डम्‌… दिड्डम्‌… सत्यम्‌… सत्यम्‌…’ (Diddm… Diddm… Satyam… Satyam) च्या मंगलाष्टकाने अक्षता सोहळा होत असतो. मात्र यंदा कोरोनामुळे (corona) मंदिर समिती पदाधिकारी, मानकरी, पुजारी अशा मोजक्या मानक-याच्या उपस्थितीत धार्मिक विधी झाले.

९:३० वाजता हिरेहब्बू वाड्यातून पालखी व योगदंडाची मिरवणूक काढण्यात आली. १०:४० वाजता योगदंडाचं सम्मती कट्ट्यावर आगमन झाले. १०:४५ ते ११:२० धार्मिक विधी होऊन ११ : ३० वाजता अक्षता सोहळा पार पडला. यंदा नंदीध्वज मिरवणूक निघाली नाही. यामुळं मार्गावरील रांगोळीच्या पायघड्या, ठिकठिकाणी होणाऱ्या पूजा (pooja) झाल्या नाहीत.

अक्षता सोहळ्यासाठी खासदार (mp) जयसिध्देश्वर महाराज, आमदार विजय देशमुख (vijay deshmukh), प्रणिती शिंदे (praniti shinde) , धर्मराज काडादी (dharmraj kadadi), पोलीस आयुक्त हरिश बैजल त्यांच्या पत्नी छाया बैजल, सुदेश देशमुख, बसवराज शास्त्री, सागर हिरेहब्बू, विकास हिरेहब्बू, संजय हिरेहब्बू, तम्मा शेटे, ॲड. मिलिंद थोबडे (ad. Milind thobade), सोमनाथ मेंगाणे, मल्लिनाथ मसरे, सुधीर थोबडे, संदेश भोगडे, योगीनाथ कुर्ले, सुरेश म्हमाणे, गंगू कल्याणकर, सोमनाथ सरडे, मल्लिकार्जुन कुंभार आदी मानकऱ्यांसह मंदिर समितीचे (tempal commiti) पदाधिकारी उपस्थित होते. Akshata Sohla: Yogdashi Kumbhar Kanyecha Marriage – Nandidhwaj Mirvanuk Nahi

संमत्ती कट्ट्यावर नंदीध्वजांचे आगमन झाल्यानंतर श्री सिद्धरामेश्‍वरांच्या अक्षता सोहळ्यापूर्वी कुंभार कन्येकडून दिलेल्या ११ मातीच्या गाडग्यांमध्ये ज्वारी, बाजरी, ऊस, बोर, पेरू आदी पदार्थ घालून देशमुख व हिरेहब्बू परिवाराच्यावतीने सुगडी पूजन (sugadi pujan) करण्यात आले. त्यानंतर हिरेहब्बूंकडून कुंभार कन्येच्या कुटुंबाला मानाचा विडा देण्यात आला. ६८ लिंगांपैकी संमती कट्ट्यावर असलेल्या १२ व्या श्री उमेश्‍वर लिंगाची पूजा व कुंभारांनी दिलेल्या मातीच्या घागरीत पाणी भरून गंगापूजन (ganga pujan) करण्यात आले. शेटे व हिरेहब्बू परिवाराच्या वतीने विधिवत लिंगपूजा व गंगापूजन करण्यात आले.

Happy New Year 2022 – नव्या वर्षात नात्यांची नवीन सुरूवात

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

तलाव परिसरात गंगापूजन, संमतीपूजन करून शंखनादाने परंपरेप्रमाणे तम्मा शेटे (Tamma Shete) यांनी संमतीवाचनास सुरुवात केली. अक्षतासोहळा संपन्न झाला. सोहळ्यानंतर अमृत लिंगास पंचामृताने अभिषेक करून शेटे यांना हिरेहब्बू (Hirehabbu) यांच्याकडून विडा देण्यात आला. त्यानंतर गर्भ मंदिरातील श्री सिद्धरामेश्‍वरांच्या गदगीची मल्लिकार्जुन शिवाचार्य (Mallikarjun Shivacharya) व हिरेहब्बू यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली.

यानंतर “एकदा हर्रभक्त लिंग हर बोला सिध्देश्वर महाराज की जय” Once upon a time, every devotee linga said the glory of Siddheshwar Maharaj चा जयघोष उपस्थित भाविकांनी केला. यंदाही कोरोना पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध असल्यानं नंदीध्वज येथे आणण्यात आले नाहीत. योगदंड पालखीत ठेवण्यात आला होता त्यापुढे पंचरंगी ध्वज, हलगी, तुतारीचा निनाद सुरु होता. कोरोना पार्श्वभूमीवर १०० जणांनाच उपस्थितीची परवानगी (permission) होती. मात्र ऐनवेळी दर्शनासाठी आलेल्या ५०० वर भाविकांना या सोहळ्यात सहभागी होता आलं. पोलीसांची संख्याही पासधारकांपेक्षा अधिक होती.

ग्रामदैवत शिवयोगी श्री सिध्देश्वर यात्रेला काल बुधवारी तैलाभिषेकाने प्रारंभ झाला. त्याच्या पूर्वसंध्येला मंदिरात ‘श्रीं’च्या दर्शनासाठी मंगळवारी भाविकांनी गर्दी केली होती. यात्रा कालावधीत मंदिरात ऑनलाइन (online) पासधारकांनाच प्रवेश मिळणार असल्याने शेकडो भाविकांनी श्री सिध्दरामेश्वरांचे दर्शन घेतले होते.

कोरोना महामारीमुळे यंदाही तैलाभिषेक, अक्षता सोहळा, होमविधी या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होता येणार नसल्याने भाविकांत नाराजी पसरली आहे. शिवाय गड्डा यात्रेतील मनोरंजनाच्या आनंदापासून बच्चे कंपनी दुरावणार आहे.

मात्र, मंदिर परिसरात पार पडणाऱ्या धार्मिक विधींच्या थेट प्रक्षेपणाद्वारे भक्तांना या सोहळ्याचा आनंद लुटता येणार आहे. गड्डा यात्रा म्हटले की, आबालवृध्दांचा उत्साह गगनात मावेनासा होतो. मात्र, गड्डा मैदान परिसर यंदा कोणत्याही मनोरंजनाच्या दालनाविना सुनासुना वाटत आहे. मंदिर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. या परिसरातील काही रस्ते वाहतुकीसाठी बंद (stop) करण्यात आले.

You Might Also Like

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

उजनी धरणातून ३ महिन्यात सोडले २०० टीएमसी पाणी

TAGGED: #AkshataSohla #Yogdashi #Kumbhar #Kanyecha #Marriage #Nandidhwaj #Mirvanuk, #अक्षतासोहळा #योगदंड #कुंभार #कन्येचा #विवाह #नंदीध्वज #मिरवणूक #सोलापूर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शिवसेना भाजपला धडा शिकवणार, योगींविरोधात निवडणूक लढवणार
Next Article धक्कादायक ! महाराष्ट्रात आतापर्यंत 265 पोलीसांचा कोरोनाने मृत्यू

Latest News

पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये पुन्हा संघर्ष : लष्करी चौक्या आणि टँक उद्ध्वस्त
देश - विदेश October 15, 2025
नक्षलवादी वरिष्ठ कमांडरसह ६० सहकाऱ्यांचे मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत आत्मसमर्पण
महाराष्ट्र October 15, 2025
सोनम वांगचुक प्रकरण : २९ ऑक्टोबरला पुढील सुनावणी
देश - विदेश October 15, 2025
अमेरिकेतील भारतीय वंशाचे प्रमुख राष्ट्रीय सुरक्षा तज्ज्ञ एशले टेलिसला अटक
देश - विदेश October 15, 2025
श्री सिद्धेश्वर देवस्थानतर्फे अतिवृष्टीग्रस्तांसाठी 25 लाखाचा निधी
महाराष्ट्र October 15, 2025
बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता
राजकारण October 14, 2025
राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट
देश - विदेश October 14, 2025
चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश October 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?