Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: राजीनामा देण्यासाठी महिला सरपंचाच्या पतीस मारहाण
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

राजीनामा देण्यासाठी महिला सरपंचाच्या पतीस मारहाण

Surajya Digital
Last updated: 2022/03/06 at 4:12 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

सोलापूर – महिला सरपंच यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा या करण्यासाठी त्यांच्या पतीला मारहाण करण्यात आली. ही घटना तिर्थ (ता.दक्षिण) सोलापूर येथे आज शनिवारी (ता. ५) दुपारच्या सुमारास घडली.

मलिक विठ्ठल वाघमारे (वय ३९ रा. तिर्थ) असे जखमीचे नाव आहे. त्यांना वळसंग येथे प्राथमिक उपचार करुन शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मलिक वाघमारे यांच्या पत्नी गावच्या सरपंच आहेत. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा यासाठी एकनाथ उर्फ हिरालाल गायकवाड आणि अन्य ५ जणांनी त्यांना लाथाबुक्क्याने मारहाण केली. अशी प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे.

● टाकळी सिकंदर येथे चोरट्यांकडून कोयत्याने मारहाण; एक जखमी

सोलापूर – बंद घराचा दरवाजा तोडताना पाहण्यास गेल्यानंतर चौघा चोरट्यांनी कोयत्याने मारहाण करून एकास जखमी केले. ही घटना टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथे आज शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली.

ज्ञानेश्वर उत्तम जानकर (वय ३६ रा. टाकळी सिकंदर) असे जखमीचे नाव आहे. त्यांना मोहोळ येथे प्राथमिक उपचार करुन सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज पहाटे दीड ते दोन वाजेच्या सुमारास जानकर यांच्या घराजवळील एका बंद घराचा दरवाजा तोडत असल्याचा आवाज आला. जानकर हे त्या ठिकाणी गेले असता अंधारात लपलेल्या चौघा चोरट्यांनी त्यांच्या डोक्यावर कोयत्याने हल्ला केला. अशी प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे. Husband of a woman sarpanch beaten for resigning

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

● महुद येथे ड्रायव्हरला मारहाण करून चोरट्यांनी पिकअप पळविली

सोलापूर – मोटारीतून आलेल्या तिघा दरोडेखोरांनी पिकप चालकास मारहाण करून त्याची पिकअप आणि खिशातील पाकीट असा चोरून नेला. ही घटना महूद (ता.सांगोला) येथे काल शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली.

यासंदर्भात बाळू अप्पा सायकर (वय ३६ रा.कर्जत जि.अहमदनगर) याने सांगोला पोलिसात फिर्याद दाखल केली. काल पहाटे ३ वाजेच्या सुमारास तो आपल्या वाहनातून महूदच्या पुढे १०कि.मी. अंतरावरून निघाला होता. त्यावेळी दुसर्‍या एका मोटारीतून आलेल्या तिघा दरोडेखोरांनी त्याच्या पिकअप मध्ये चढून त्याला काठीने मारहाण केली. आणि त्याला जंगलात नेले. त्यानंतर त्याचे वाहन घेऊन पोबारा केला अशी नोंद पोलिसात झाली आहे.

कुंभारी घरकुल येथे दुकानाचे शटर उचकटून चोरी

सोलापूर – विडी घरकुल कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) येथील श्रीनिवास गुंडेटी यांच्या बंद दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी ३ हजार रुपये रोख, नवीन साड्या, मोबाईल आणि इतर साहित्य असा २४ हजाराचा माल पळविला. ही चोरी आज शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. वळसंग पोलिस ठाण्यात याची नोंद झाली. फौजदार हंचाटे पुढील तपास करीत आहेत .

You Might Also Like

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले

संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट

सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा

TAGGED: #Husband #woman #sarpanch #beaten #resigning, #राजीनामा #महिला #सरपंच #पतीस #मारहाण
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article महिला विश्वचषक : भारताने पाकिस्तानचा 107 धावांनी केला पराभव, पाकिस्तानला नमवण्याची ही दहावी वेळ
Next Article छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे मोदींच्या हस्ते उद्घाटन

Latest News

माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत ‘ब’ वर्गातुन उपमुख्यमंत्रील अजित पवार विजयी
देश - विदेश June 25, 2025
केडगाव हत्येचा लागला छडा , 3 अटकेत
महाराष्ट्र June 25, 2025
विंग कमांडर अभिनंदन यांना पकडल्याचा दावा करणारा पाकिस्तानी मेजर टीटीपी हल्ल्यात ठार
देश - विदेश June 25, 2025
अंतराळातील ऐतिहासिक उड्डाणानंतर शुभांशू शुक्लांची आई भावुक
देश - विदेश June 25, 2025
कोल्हापूर जिल्हा म्हणजे कुस्तीची पंढरी – रविंद्र चव्हाण
महाराष्ट्र June 25, 2025
आणीबाणीच्या ५० व्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल
देश - विदेश June 25, 2025
ऑपरेशन सिंधू : इराणमधून 282 भारतीय मायदेशी परतले
देश - विदेश June 25, 2025
जम्मू-काश्मिरात घुसखोरीचा प्रयत्न उधळला, दहशतवादी ठार
देश - विदेश June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?