□ फडणवीसांच्या आरोपांवर शरद पवार म्हणाले…
मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या व्हिडिओविषयी शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. एखाद्या शासकीय कार्यालयात जाऊन 125 तासांचं रेकॉर्डिंग करणं हे खरोखरच कौतुकास्पद आहे. यासाठी शक्तीशाली एजन्सीचा वापर केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं ते म्हणाले. तसेच या संपूर्ण प्रकरणाची राज्य सरकार चौकशी करेल. त्याची सत्यता असत्यता तपासेल, असंही ते म्हणाले.
शरद पवार मुंबईत पत्रकाराशी बोलत होते. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत महाविकास आघाडीतर्फे भाजप नेत्यांविरोधात कुभांड रचले जात असल्याचा गंभीर आरोप काल केला. यासाठी त्यांनी तब्बल 125 तासांचं व्हिडिओ फुटेजदेखील सादर केलं. या व्हिडिओतील काही धक्कादायक संवाद त्यांनी विधानसभेत सादर केले. या सर्व प्रकाराची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. या व्हिडिओत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचंही नाव आहे.
फडणवीसांनी केलेल्या या आरोपांनी राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली. या प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. देवेंद्र फडणीस यांनी केलेल्या आरोपांचा काही भाग समजला नसल्याचेही शरद पवार म्हणाले. “It’s really admirable to go to a government office and record 125 hours.”
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
सरकार गेल्यामुळे भाजप सध्या अस्वस्थ आहे सत्तेचा गैरवापर करून चौकशी कशी केली जाते याचं अनिल देशमुख हे उत्तम उदाहरण आहे सरकारला कोणी धक्का लावू शकत नाही, हे सरकार पाच वर्षे टिकेल असे ते म्हणाले.”
पवार म्हणाले,’मला देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांचा पैकी काही समजले आणि काही समजलेच नाही. सरकारी अधिकाऱ्यांचं 125 तासांचं रेकॉर्डिंग होतं हे कौतुकास्पद आहे. केंद्रीय यंत्रणांचा वापर केल्याशिवाय हे सोपं नाही. फडणवीस यांनी माझे अप्रत्यक्षपणे नाव घेतलं गेलं. पण माझा काही संबंध नाही. रेकॉर्डिंगच्या सत्यतेबाबत पडताळणी करणं गरजेचं आहे. ते पुढे म्हणाले,आरोपांबाबत खोलात गेलो नाही. आरोपांची राज्य सरकारने चौकशी करावी.’ असे म्हटले.
दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल महाविकास आघाडी सरकार विरोधकांना संपवण्यासाठी कट रचत असल्याचे व्हिडीओ विधानसभेत सादर केले. त्यानंतर आज विधीमंडळाच्या पायऱ्यांवर भाजपकडून थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात घोषणाबाजी केली जात आहे. आझाद मैदानावर भाजप नेते, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात एकवटले आहेत.