मुंबई : भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्यामुळेच क्लीनचिट मिळाली, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला. Prakash Ambedkar’s serious allegations against Jayant Patil from Bhide Guruji’s clean chit
प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे संभाजी भिडे यांच्या पाया पडतानाचे छायाचित्र आहे. त्यामुळे लक्षात घेतले जावे की सूत्रं कुठून हलत असतील. तर हा सगळा घोटाळा आहे आणि त्याची कागदपत्रे माझ्याकडे आहेत, असे शरद पवारांनी म्हटले होते. यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसमधील दुफळी बाहेर येत आहे, असेही आंबेडकर यांनी म्हटले.
तपास अधिकाऱ्याने भिडेंना क्लीन चिट दिली. त्याने सर्वोच्च न्यायालयात जे प्रतिज्ञापत्र दिले ते वाचले नाही. यामुळे कोर्टाला कळाले की, संभाजी भिडे आणि मिलींद एकबोटे दोषी आहेत. कोणाच्यातरी सांगण्यावरुन तपास अधिकाऱ्याने क्लीनचिट दिली आहे. संभाजी भिडेंच्या पाया पडत असताना जयंत पाटील यांचा फोटो व्हायरल झाला होता यावरुन सगळं काही लक्षात घेतलं पाहिजे असे वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ही सगळी साखळी आहे. सुप्रीम कोर्ट दोषी मानतं आणि तुम्ही त्यांना निर्दोष म्हणता. मात्र नाव वगळल्यानं हे प्रकरण मिटणार नाही. त्या 39 जणांनी कुणाच्या सांगण्यावरुन केलं. कुठल्याही गुन्ह्याला मायबाप असतो. हे सगळं समोर येणार आहे. या निकषावर तपास अधिकारी आले कसे हा महत्वाचा भाग आहे. कोर्टात अजून यांचं नाव डिलिट करावं अशी कायदेशीर प्रक्रिया केलेली नाही, तिथं विरोध केला जाणार आहे. तपासासंदर्भातील कागदपत्रे तिथं मागवली जातील.
दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांच्या आरोपास जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. झालेले आरोप अत्यंत हास्यास्पद आहे. माझा संभाजी भिडेंशी माझा कोणताही संपर्क नाही. गेल्या काही वर्षांपासून ते माझ्या संपर्कातसुद्धा नाहीत. त्यामुळे त्यांना कोणत्या प्रकरणात क्लीनचिट मिळाली आहे. याबाबत मला काही माहिती नाही. तसेच संभाडी भिडेंनी माझ्याकडे कधी कोणतीही मदत मागितली नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी अशी खोटी आरोप करणं योग्य नाही. काही पुरावा असेल तर त्यांनी पुरावा द्यावा असा पलटवार जयंत पाटील यांनी केला आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/534485841562483/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
■ शरद पवारांचे आरोप ठरले खोटे; पोलिसांची संभाजी भिडेंना क्लीन चिट
पुणे : भीमा कोरेगाव दंगली प्रकरणी शरद पवारांचे आरोप खोटे ठरले आहे. पोलिसांनी शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संभाजी भिडेंना क्लीन चिट दिली आहे. संभाजी भिडे यांचा या प्रकरणात सहभाग आढळला नसल्याचे पुणे पोलिसांनी आता न्यायालयात सांगितले आहे. यामुळे पवारांचा या दंगलीप्रकरणी गंभीर आरोप करण्यामागे उद्देश नक्की काय होता?, असा प्रश्न आता विचारला जातोय.
“शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान’चे संस्थापक संभाजी भिडे यांचे नाव कोरेगाव भीमा दंगलीच्या खटल्यातून वगळण्यात आल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांनी राज्य मानवी हक्क आयोगाला दिली आहे. या दंगलीमध्ये संभाज भिडे यांचा हात असल्याची तक्रार शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आली होती.
या प्रकरणात एकूण २२ गुन्हे दाखल असून ४१ आरोपींवर वर्षभरापूर्वीच आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यामध्ये संभाजी भिडे यांचे नाव नसल्याची माहिती पोलिसांनी
राज्य मानवी हक्क आयोगासमोर असलेल्य सुनावणीदरम्यान दिली आहे.
1 जानेवारी 2018 रोजी रोजी कोरेगाव भीमा तेथे दगडफेक, जाळपोळ झाली होती. ही दंगल घडवून आणल्याचा आरोप करत शिक्रापूर पोलीस ठाण्यात ऍट्रॉसिटी, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, जाळपोळ, सार्वजनिक नुकसान, सशस्त्र हल्ला, बेकायदेशीर जमाव, संघटीत गुन्हेगारी या कलमानुसार गुन्हा दाखल आहे.
या प्रकरणात चाळीसहून अधिक जणांवर गुन्हे असून, काही महिन्यांपूर्वी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, “या तक्रारीनुसार पोलिसांनी तपास केला. यामध्ये संभाजी भिडे यांच्याविरोधात कोणताही पुरावा मिळून आला नाही. त्यामुळे त्यांच्यावर दोषारोप ठेवण्यात आलेला नाही. इतर आरोपींच्या विरोधात शिवाजीनगर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे,’ असे ऍड. पुष्कर दुर्गे यांनी सांगितले.
संभाजी भिडे हे गुन्हा घडल्याच्या वेळी सांगली जिल्ह्यात उपस्थित होते. त्यामुळे त्यांच्या विरोधात कोणतेही दोषारोपपत्र दाखल करण्यात आले नसल्याची माहिती ग्रामीण पोलिसांनी न्यायालयात दिली असल्याचे भिडे यांचे वकील ॲड. पुष्कर दुर्गे यांनी दिली आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/534484684895932/