मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित करण्यात आला आहे. राज ठाकरे यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. याविषयी पुण्यातील सभेत सविस्तर बोलू, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. तब्येतीच्या कारणाने हा दौरा स्थगित केल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय अयोध्येत पाय ठेऊ देणार नाही, असा इशारा याआधी भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी दिला होता. Raj Thackeray’s ‘Turtas Ayodhya tour postponed!’ Will speak in detail at Sunday’s meeting
राज ठाकरे ५ जून रोजी अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार होते. परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे राज ठाकरेंचा दौरा काही काळासाठी स्थगित केला गेल्याची माहिती समोर आली आहे. राज ठाकरे यांच्या पायाला दुखापत झाली होती. पायाच्या दुखण्यानं पुन्हा एकदा डोकं वर काढल्यामुळे डॉक्टरांचा सल्ल्यानुसार त्यांनी अयोध्या दौरा स्थगित केल्याचं सांगितलं जात आहे.
एक ते दीड वर्षांपूर्वी राज ठाकरे यांच्या पायाला दुखापत झाली होती. तेव्हापासून त्यांना हा त्रास जाणवत आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांना अयोध्येत जाण्यासाठी 10 एक्स्प्रेस रेल्वेगाड्या बूक करण्यासंदर्भातही बोलणी सुरु होती. मात्र, आता राज ठाकरे यांनीच प्रकृतीच्या कारणास्तव दौरा रद्द केला आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/544089737268760/
राज ठाकरेंनी त्यांच्या ट्विटर हँडलवर अयोध्या दौरा स्थगित केल्याची माहिती दिली आहे. यात त्यांनी अयोध्या दौरा स्थगित केला असून रविवारी (ता. 22) पुण्यात होणाऱ्या सभेत याबाबत सविस्तर बोलू असं म्हटलं आहे. पुण्यात २१ मे रोजी नदीपात्रात होणारी मनसेची जाहीर सभा देखील पावसाच्या शक्यतेमुळे रद्द करण्यात आली होती. पण आता ही सभा २२ मे रोजी सकाळी १० वाजता गणेश कला मंच येथे होणार असल्याची माहिती मनसेकडून देण्यात आली आहे. नदीपात्रात जाहीर सभा घेण्याचं आम्ही ठरवलं होतं. पण हवामान खात्यानं त्यादिवशी पावसाची शक्यता वर्तवली आहे आणि कार्यक्रत्यांना चिखलात बसवणं योग्य ठरणार नसल्याचे कारण देत सभा रद्द केली.
राज ठाकरेंनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केल्यानंतर मनसैनिकांनी जय्यत तयारीला सुरुवात केली होती. पण उत्तर प्रदेशातून राज यांच्या दौऱ्याला कडाडून विरोध करण्यात आला. भाजपाचे खासदार बृजभूषण चरण सिंह यांनी राज ठाकरेंनी आधी उत्तर भारतीयांची माफी मागावी त्यानंतरच अयोध्येला यावं अशी मागणी केली.
बृजभूषण सिंह यांनी याच पार्श्वभूमीवर मोठं शक्तीप्रदर्शन देखील केलं. तसंच ५ जून रोजी अयोध्येत राज ठाकरेंना येऊ देणार नाही. त्यासाठी ५ लाख लोक राज ठाकरेंना अडवतील असं म्हणत बृजभूषण सिंह यांनी शड्डू ठोकला आहे. त्यानंतर राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर ठाम होते.
https://www.facebook.com/109399567404448/posts/544363057241428/