□ ग्रंथाचे मूल्य जाणणाऱ्याकडूनच चोरीचा संशय
सोलापूर – कवी राघवन यांनी लिहिलेला ग्रामदैवत श्री सिध्देश्वरांवरील ग्रंथ व पूजेच्या भांड्यांची चोरी उत्तर कसब्यातील राजशेखर हिरेहब्बू यांच्या वाड्यात गुरुवारी (ता. 30) रात्री झाली. या प्रकरणी फौजदार चावडी पोलिसांनी दोघा संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. Theft of books and utensils from Hirehabbu Wadya, two suspects arrested by police in Solapur
ग्रामदैवत श्री सिध्देश्वरांच्या कार्याविषयी कवी राघवन यांचा नऊ अध्याय असलेला सुमारे ४० पानांचा ग्रंथ हिरेहब्बू वाड्यात एका सागवानी पेटीमध्ये पूजेसाठी ठेवण्यात आला होता. गुरुवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास चोरट्यांनी वाड्यात प्रवेश करुन हा ग्रंथ तसेच पितळी दिवा, तांबा धातूच्या तांब्या असा ऐवज पळवून नेला. शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास सागर हिरेहब्बू हे पूजा करीत असताना चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या घटनेची माहिती हिरेहब्बू यांनी फौजदार चावडी पोलिसांना दिली.
हत्तीवरून चरित्रग्रंथाची मिरवणूक काढली होती. ११४० ला कवी राघवाक यांनी श्री सिद्धेश्वर महाराज यांचे आत्मचरित्र कच्चकन्नड भाषेत लिहिले. हा ग्रंथ ५० पानांचा असून यामध्ये नऊ अध्याय आहेत. या अध्यायामध्ये श्री सिद्धेश्वर महाराज यांच्या जन्मापासून ते समाधीपर्यंतच्या नोंदी घेतल्या आहेत. त्याकाळी या ग्रंथाची हत्तीवरून मिरवणूक काढली होती असे सांगण्यात आले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/573256397685427/
गुरुवारी रात्रीच ग्रंथाची चोरी झाली असावी, असा संशयही हिरेहब्बू यांनी व्यक्त केला. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पांढऱ्या रंगाच्या कपड्यात दोघेजण काहीतरी लपवून घेऊन जात असल्याचे दिसून येते. मात्र, त्यांनीच चरित्रग्रंथ चोरल्याचे अद्याप तरी नक्की सांगता येणार नाही, असेही सांगण्यात आले. सागवानी पेटीला लोखंडी पट्टी लावून ग्रंथ ठेवला होता. कटावणीच्या सहाय्याने लोखंडी पट्टी उचकटून ग्रंथ चोरल्याचे दिसून येते.
सिद्धेश्वर महाराज यांच्या जीवनचरित्राचा अभ्यास करण्यासाठी ग्रंथाची मागणी होत होती. परंतु हिरेहब्बू यांनी ग्रंथ देण्यास नकार दिला होता. आता तोच अमूल्य ग्रंथ चोरी झाला असल्याने ग्रंथाचे मूल्य जाणणाऱ्याकडूनच जाणून बुजून ग्रंथाची चोरी केली असावी, असाही संशय व्यक्त करण्यात येत आहे.
पोलीस आयुक्त राजेंद्र माने, पोलीस उपायुक्त बापू बांगर, डॉ. वैशाली कडूकर, सहायक पोलीस आयुक्त डॉ. प्रीती टिपरे पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांनी घटनास्थळाला भेट दिली पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फूटेजवरुन दोघा संशयितांन ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी सुरु असल्याचे पोलीस निरीक्षक पाटील यांनी सांगितले.
https://www.facebook.com/109399567404448/posts/573145297696537/