Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पुन्हा चार सदस्य पद्धत होणार ? महापालिका निवडणुका लांबणीवर जाण्याची शक्यता
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारणसोलापूर

पुन्हा चार सदस्य पद्धत होणार ? महापालिका निवडणुका लांबणीवर जाण्याची शक्यता

Surajya Digital
Last updated: 2022/07/02 at 1:40 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…》 महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यांच्या अंतर्गत बदल्या

सोलापूर (अजित उंब्रजकर)

शिवसेनेतील आघाडीचे सरकार कोसळेल की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. ते झाल्यास निश्चित भाजप सत्तेत येणार आहे. त्यामुळे राज्यात सत्तांतर घडल्यास राज्याबरोबर त्याचे स्थानिक राजकारणावर मोठा परिणाम होईल. आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकीची गणिते देखील बदलणार आहेत. चार सदस्यीय प्रभागरचना केली जाण्याची शक्यता असून निवडणूक आणखी लांबणीवर जाण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. Will there be a four member system again? Solapur municipal elections likely to be postponed

 

एकनाथ शिंदे यांनी 39 आमदारांसह बंड पुकारल्यानंतर राज्यामध्ये सत्तांतर झाले शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे महाआघाडी सरकार काय उत्तर होऊन शिवसेना आणि भाजपचे सरकार आले आहे यामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले आहेत या सत्तांतराचे राज्यात उमटणार आहेत.

आगामी 16 ते 17 महापालिकेसाठी महाविकास आघाडीने तीन सदस्य प्रभाग पद्धत केली. ती त्यांना सोयीची होती. परंतु, २०१७ मधील महापालिका निवडणुकीत भाजपने चार सदस्यीय पध्दतीचा अवलंब केला होता. यामुळे भाजपाला अनेक महापालिकेत यश मिळाले. आता सत्तांतर झाल्याने पुन्हा भाजपकडून तीन सदस्यीय ऐवजी चार सदस्यी पध्दती करण्याची शक्यता आहे. प्रभाग पध्दतीत बदल झाल्यास प्रभागाची रचना, आरक्षण आणि मतदार याद्या या सगळ्यात बदल होईल. संपूर्ण यंत्रणाच नव्याने राबवावी लागणार आहे. त्यामुळे पुन्हा पालिका निवडणूक लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

□ ओबीसी आरक्षणासह होतील निवडणुका

 

सद्यस्थितीत ओबीसी आरक्षणाचा प्रश्न कायद्याच्या कचाट्यात अडकला. त्यावर न्यायालयीन लढा सुरू आहे. राज्यातील सत्ताबदल आणि स्थिती बघता या कालावधीत ओबीसी आरक्षणावर निर्णय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रात देखील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण लागू होईल. त्यामुळे पालिका निवडणुका ओबीसी आरक्षणासह होतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

□ शहरातील राजकीय समीकरणे बदलतील

 

महापालिका निवडणूक तोंडावर असताना आघाडी सरकार जाऊन भाजप सत्तेवर आले. त्यामुळे महापालिका निवडणुकीची गणिते बदलतील. त्यासोबत राजकीय समीकरणेही बदलणार आहेत. दिग्गज नगरसेवक, पदाधिकारी राष्ट्रवादी, काँग्रेसच्या संपर्कात आहेत. राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छूक आहेत. मात्र, सत्ताबदल झाल्याने ही परिस्थिती बदलणार आहे. भाजपची शहरातील ताकद वाढून त्यांची पुन्हा सत्तेवर येण्याची शक्यता वाढेल. पालिकेपाठोपाठ लोकसभा, विधानसभा निवडणुका होतील.

 

 

》 महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यांच्या अंतर्गत बदल्या

 

सोलापूर : गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू असलेल्या महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. यात दोन सहाय्यक अभियंत्यांसह कायम २१ कनिष्ठ अभियंता आणि मानधनवरील ४१ असे एकूण -६२ कनिष्ठ अभियंत्यांचा समावेश आहे. महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी याबाबत आदेश काढले आहेत.

महापालिकेच्या नगर रचना विभागाअंतर्गत बांधकाम परवाना साठी तज्ञ आणि माहिती असणाऱ्या कनिष्ठ अभियंत्यांची गरज असल्याने या विभागातील १० कनिष्ठ अभियंत्यांच्या नियुक्तीसाठी महापालिका प्रशासनाने महापालिकेतील ४० कनिष्ठ अभियंत्यांची परीक्षा घेतली होती. यामधील गुणांनुसार १० कनिष्ठ अभियंत्यांची निवड करण्यात आली आहे.

गेल्या तीन वर्षांपासून एकाच विभागात व एकाच टेबलवर असलेल्या कनिष्ठ अभियंत्यांच्या इतर विभागात बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये नगर अभियंता, अतिक्रमण, घनकचरा व्यवस्थापन, नगर रचना कार्यालय, झोन क्रमांक एक ते आठ, सार्वजनिक आरोग्य अभियंता कार्यालय या विभागातील स्थापत्य कनिष्ठ अभियंत्यांचा समावेश आहे.

महापालिकेतील सार्वजनिक आरोग्य अभियंता कार्यालयातील एका कनिष्ठ अभियंत्याची स्मार्ट सिटी योजनेकडे बदली करण्यात आली होती त्या कनिष्ठ अभियंत्याला पुन्हा महापालिकेत नियुक्ती देण्यात आली आहे. दरम्यान, या बदल्यांसाठी अनेकांनी आपापल्या पध्दतीने विभाग मिळण्यासाठी प्रयत्न केल्याची चर्चा आता होत आहे.

 

 

You Might Also Like

शिवसेना पक्ष-चिन्ह वाद : ऑगस्टमध्ये अंतिम सुनावणी

सोलापूर : लक्ष्मण हाके समाजात जातीय विष पेरतात – उमेश पाटील

शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देणार – खा प्रणिती शिंदे

गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करावेत – डॉ. नीलम गोऱ्हे

सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत तारण ठेवलेले सोने निघाले बनावट

TAGGED: #four #member #system #again #Solapur #municipal #elections #likely #postponed, #पुन्हा #चारसदस्य #पद्धत #महापालिका #निवडणुका #लांबणीवर #शक्यता
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article snake bite उंची वाढवण्यासाठी लोंबकळताना पाच वर्षाच्या चिमुकल्याचा सर्पदंशाने मृत्यू
Next Article हिरेहब्बू वाड्यातून ग्रंथ व भांड्यांची चोरी, दोघे संशयित पोलिसांच्या ताब्यात

Latest News

शिवसेना पक्ष-चिन्ह वाद : ऑगस्टमध्ये अंतिम सुनावणी
राजकारण July 14, 2025
मालवणमधील ‘उबाठा’ च्या 4 माजी नगरसेवकांचा समर्थकांसह भाजपामध्ये प्रवेश
महाराष्ट्र July 14, 2025
राज ठाकरेंच्या विरोधात पोलीस महासंचालकांकडे तक्रार
देश - विदेश July 14, 2025
विमानात कोणतीही यांत्रिक समस्या नव्हती – कॅम्पबेल विल्सन
देश - विदेश July 14, 2025
चिनी उपराष्ट्रपतींसोबतच्या भेटीतून सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होईल – एस. जयशंकर
देश - विदेश July 14, 2025
ज्येष्ठ कन्नड अभिनेत्री बी. सरोजा देवी यांचे निधन
देश - विदेश July 14, 2025
प्रवासी सुरक्षा वाढविण्यासाठी रेल्वे डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार
देश - विदेश July 14, 2025
लंडनमध्ये उड्डाणानंतर विमान कोसळण्याची दुर्घटना
Top News July 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?