मुंबई : विधानभवनात विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी मतदान झाले. यात भाजपच्या राहुल नार्वेकर यांनी बाजी मारली आहे. त्यांना 164 आमदारांची मतं मिळाली. नार्वेकर यांनी बहुमताचा आकडा पार केला आहे. विधानसभेत मोठ्या गदारोळात मतदान पार पडलं. भाजपकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजन साळवी मैदानात होते. Rahul Narvekar, the youngest breakaway from Shiv Sena, as the Speaker of the Assembly
चंद्रकांत पाटील यांनी राहुल नार्वेकर यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता. राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे. राहुल नार्वेकर यांनी बहुमताचा आकडा पार केला आहे. राहुल नार्वेकर यांनी 164 मतं मिळाली आहेत. त्यानंतर उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. दरम्यान, महाविकास आघाडीच्या राजन साळवींना 107 मतं मिळाली. निवड होताच भाजपकडून जय श्री रामाच्या घोषणा दिल्या. बंडखोर आमदारांकडून जय भवानी, जय शिवाजी..भारत माता की जय..अशा घोषणा देण्यात आल्या.
राज्याच्या इतिहासातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष ठरले आहेत. शिरगणती केल्यानंतर नार्वेकर यांना बहुमतापेक्षा जास्त 164 मत मिळाली. या राजकीय गदारोळात अध्यक्षांची भूमिका आता महत्वाची असणार आहे. कारण उद्या शिंदे-फडणवीस सरकारची बहुमत चाचणी देखील पार पडणार आहे.
राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड करावी असा प्रस्ताव चंद्रकांत पाटील यांनी मांडला त्याला गिरीश महाजन यांनी अनुमोदन दिलं. तर चेतन तुपे यांनी साळवी यांचा प्रस्ताव मांडला, तर संग्राम थोपटे यांनी अनुमोदन दिलं. नव्याने स्थापन झालेल्या शिंदे सरकारला बहुमत चाचणीला सामोरं जावे लागणार आहे. विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अध्यक्षांची निवड झाली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…
https://www.facebook.com/109399567404448/posts/573784707632596/
शिंदे सरकारकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं होतं तर महाविकास आघाडीकडून शेवटच्या क्षणाला राजन साळवी यांना मैदानात उतरवलं होतं. एकनाथ शिंदे गट आणि भाजपचं संख्याबळ पाहता राहुल नार्वेकर हेच विधानसभा अध्यक्ष होतील हे जवळपास निश्चित होतं.
२०१४ मध्ये शिवसेनेकडून राहुल नार्वेकर यांना लोकसभेची उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्यामुळे राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत २०१४ मध्येच अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. २०१४ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मावळ लोकसभेतून निवडणूक लढवली. ते ३ वर्ष राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य देखील राहिले आहेत.
राहुल नार्वेकर पुढे या पक्षात थांबले नाही तर, ‘ज्याचे ‘पारडे’ जड तिथे राहुल नार्वेकर’ असे म्हणत त्यांनी भाजपचा मार्ग स्वीकारला. एकंदरीतच शिवसेनेकडून उमेदवारी न मिळाल्याने राहुल नार्वेकर यांनी सुद्धा शिवसेनेसोबत गद्दारी केली. आज विधानसभेच्या अध्यक्ष पदासाठी माजी शिवसैनिक राहुल नार्वेकर आणि एकनिष्ठ शिवसैनिक राजन साळवी यांच्यात थेट लढत झाली. यात त्यांचा विजय झाला.
https://www.facebook.com/109399567404448/posts/573774427633624/