सोलापूर : उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या,दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूरात भक्तांसाठी युगानुयुगे विटेवर उभ्या असलेल्या पांडुरंगाच्या चरणी अधूनमधून सोन्या-चांदीच्या वस्तू आणि दागिने भाविक अर्पण करत असतात. पण नांदेडमधील व्यापा-याने दोन किलो सोन्याचे आकर्षक मुकुट बनवून दिले आहेत. Two kg gold crown for Shri Vitthal-Rukmini mother from Nanded trader Uttarwar family
उमरी (जि.नांदेड) येथील प्रसिध्द व्यापारी विजय पंढरीनाथ उत्तरवार यांनी श्री विठ्ठल रुक्मिणीसाठी सुमारे दोन किलो सोन्याचे (किंमत सुमारे एक कोटी तीन लाख) अत्यंत आकर्षक मुकुट बनवून घेतले आहेत. विठ्ठल रखुमाईसाठी त्यांनी 1 कोटी रुपयांचे शुद्ध सोन्याचे मुकुट बनवले आहेत. आषाढी एकादशीला उत्तरवार कुटुंब पंढरपुरात जाऊन हे मुकुट अर्पण करणार आहेत.
आई-वडिलांच्या इच्छेनुसार बनवलेले हे मुकुट आषाढी एकादशी दिवशी श्री व सौ. उत्तरवार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडे सुपूर्त करणार आहेत, अशी माहिती येथील प्रसिध्द व्यापारी विठ्ठल कटकमवार यांनी ही माहिती दिली.
पंढरपुरातील प्रसिद्ध व्यापारी विठ्ठल कटकमवार यांचे मामा विजय उत्तरवार हे उमरी (जि. नांदेड) येथील सोन्याचे प्रसिध्द व्यापारी आहेत. त्यांच्या आई-वडिलांची श्री विठ्ठल रुक्मिणीसाठी सोन्याचे मुकुट अर्पण करण्याची इच्छा होती. त्यानुसार विजय उत्तरवार आणि त्यांच्या मुलांनी इच्छा पूर्ण करण्याचे ठरवले होते.
खामगाव येथून खास कारागीर बोलावून त्यांनी विठुरायासाठी आणि श्री रुक्मिणीमातेसाठी अत्यंत आकर्षक असे दोन मुकुट बनवून घेतले आहेत. विठुरायासाठीच्या मुकुटासाठी सुमारे ११८४ ग्रॅम तर श्री रुक्मिणीमातेच्या मुकुटासाठी सुमारे ७८४ ग्रॅम, असे दोन्ही मिळून १९६८ ग्रॅम सोन्याचा वापर केला आहे. हे मुकुट आषाढी एकादशी दिवशी सौ. उत्तरवार दांम्पत्य श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडे सुपुर्त करणार आहेत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/577884637222603/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणी सकवारबाई, संभाजीपुत्र छत्रपती शाहू महाराज, बाजीराव पेशवे, माधवराव पेशवे, शिंदे सरकार, अहिल्याबाई होळकर, नाना फडणवीस यांनी अनेकदा श्री विठ्ठल-रुक्मिणीला हे मौल्यवान दागिने अर्पण केले आहेत.
आतापर्यंत पांडुरंगाला दिलेल्या मुकुटांची संख्याही जास्त आहे. मुकुंटांची एकूण संख्या सहा सोन्याचे मुकुट आहेत आणि तीन-चार चांदीचे, सोन्याचे पाणी दिलेले मुकुट आहेत. सगळ्या मुकुटांत अमूल्य असा हिऱ्यांचा मुकुट आहे. त्याला सूर्यकिरणांचा मुकुट म्हणतात.
यामध्ये सोन्याची शिंदेशाही पगडीही आहे. पाडव्याला चांदीची काठी, खांद्यावर घोंगडी, धोतर, पगडी असा विठ्ठलाचा पोशाख असतो. पगडीवर बसवण्यासाठी रत्नजडित शिरपेच आहेत. अतिशय पुरातन आणि मौल्यवान पाचू, हिऱ्यांनी मढवलेले आहेत. सोन्या-मोत्यांचे तुरे आहेत. देवाची ओळख ज्या मकरकुंडलांमुळे होते ती कानात घालण्याची सोन्याची मकरकुंडले आहेत. यामध्ये माणिक आणि पाचू जडवलेले आहेत. कपाळावर किमती नील आणि हिरे बसवलेला नाम म्हणजे सोन्याचा गंध आहे.
》 आषाढी वारी : ‘वारी’ अभंगरूपी रचनेमधून वारकऱ्यांची भावनिक स्थिती
सोलापूर : उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या,दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूरात भक्तांसाठी युगानुयुगे विटेवर उभ्या असलेल्या पांडुरंगाला पाहण्यासाठी दरवर्षी ऊन-वारा-पाऊस याची तमा न बाळगता, हजारो किलोमीटरची पायपीट करून मोठ्या भक्तिभावाने व श्रद्धेने असंख्य वारकरी पंढरपूरला येतात.
पंढरपूरला नित्यनेमाने येणाऱ्या वारकऱ्यांच्या मनात मागील दोन वर्षापासून चुकत असलेल्या वारीबद्दल हुरहूर होती. त्यांच्या ठिकाणी अस्वस्थता होती. आषाढी वारीला येता न आल्याने लाखो वारकऱ्यांच्या भावनिक स्थितीगतीचे शब्दांकन आषाढी वारीच्या निमित्ताने ” वारी ” या अभंगरूपी रचनेमध्ये रोजी केले आहे.
” देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा!!💐💐
” वारी .……”
भक्ताच्या योगे | अठ्ठावीस युगे |
विटेवरी उभे | प्ररब्रम्ह || १ ||
गेले कैसे दिस | देखिले रूपास |
जीव कासावीस | भेटीसाठी || २ ||
आम्ही तुझे दास | दर्शनाची आस |
लागली आम्हांस | पांडुरंगा || ३ ||
हरपे तहान | विसरे हे भान |
आसुसले मन | गाभाऱ्याशी || ४ ||
दर्शना मी येतो | क्षीण हा जातो |
मुख हे पाहतो | विठ्ठलाचे || ५ ||
आम्ही वारकरी | चुकू नये वारी |
दुमुदे पंढरी | नामघोषी || ६ ||
आमचा तू वाली | कृपेची सावली |
भेटू दे माऊली | वारीमध्ये || ७ ||
पाहावी पंढरी | घडावी ही वारी |
चंद्रभागे तिरी | वैष्णवांच्या || ८ ||
संतांचा हा संग | टाळ नि मृदंग |
भजनात दंग | वारकरी || ९ ||
संपुदे कोरोना | हीच हो कामना |
येऊदे दर्शना | कृपाघना || १० ||
□ डॉ. शिवाजी नारायणराव शिंदे,
– सहायक कुलसचिव तथा
मराठी भाषा दक्षता अधिकारी
(पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
सोलापूर विद्यापीठ,सोलापूर)
□ उपवास करणाऱ्यांच्या खिशाला कात्री
आषाढी एकादशी दिवशी महाराष्ट्रात बरेच भाविक उपवास करतात. पण आता उपवासाच्या पदार्थांच्या दरात वाढ झाली आहे. गतवर्षाच्या तुलनेत बटाटा यंदा 15 रूपये महाग आहे.
* आधी किती रूपये किलो- ( भगर – 50 ते 75, साबुदाणा – 45 ते 50, पेंडखजूर- 70 ते 90, साखर- 31 ते 33, रताळी – 20 ते 45
* आता किती रूपये किलो ( भगर – 55 ते 120, साबुदाणा – 55 ते 75, पेंडखजूर- 70 ते 120, साखर- 42, रताळी- 25 ते 55 )
https://www.facebook.com/109399567404448/posts/578028610541539/