मोहोळ : मोहोळ पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा भारतीय स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला. पोलिसाच्या सायरनच्या आवाजाने चोरट्याने पलायन केल्याची घटना शनिवारी (दि.२३ जुलै) रोजी पहाटे अडीच वाजताच्या दरम्यान घडली. Attempt to break ATM failed due to police vigilance in Solapur
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मोहोळ शहरांमधील मोहोळ- कुरूल रस्त्यावर भारतीय स्टेट बँकेची शाखा आहे. तिथेच भारतीय स्टेट बँकेचे एटीएम आहे. शनिवारी पहाटे अडीच वाजताच्या दरम्यान तोंडाला बांधलेल्या दोन चोरट्यानी एटीएम मध्ये प्रवेश केला. त्यातील एका चोरट्याने त्याच्या हातामधील असलेला कलरचा स्प्रे एटीएम सेंटर मधील सीसीटीव्ही कॅमेरा वर मारला.
त्याच दरम्यान एटीएम सेंटरच्या मुंबई च्या नियंत्रण कक्षाला सेंसर मुळे संदेश प्राप्त झाला. त्यांनी तात्काळ या संदर्भात सोलापूर ग्रामीणच्या नियंत्रण कक्षाला याबाबत कळवले. त्यांनी मोहोळ पोलीस ठाण्याला संपर्क केला. तात्काळ मोहोळ पोलीस स्टेशनच्या रात्रगस्त पथकाचे पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र राठोड, पोलीस हेडकॉन्स्टेबल शरद डावरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लोंढे, पोलीस कॉन्स्टेबल बिराजदार, सचिन पुजारी, समीर पठाण, संतोष कुंभार, श्रीशैल्य शिवणे, आकाश पवार यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या तीन टीम मधील कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांच्या गाड्यांचा सायरन ऐकताच एटीएम सेंटर मधील दोन तर बाहेर उभा राहिलेल्या दुचाकी वरील दोन अशा एकूण चार चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत पलायन केले. मोहोळ पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोहोळ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी चौकामध्ये असलेले एटीएम सेंटर फोडण्याचा चोरट्यांचा यशस्वी प्रयत्न फसला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
https://www.facebook.com/109399567404448/posts/588235349520865/
महिन्यापूर्वी मोहोळ शहरातील एक तर कुरुल येथील एक अशा दोन एटीएम फोडून सुमारे ५० लाखांची रोकड लांबवली होती, दरम्यान या घटनेने पुन्हा एकदा मोहोळ तालुक्यातील एटीएम सेंटर चोरट्यांच्या रडारवर आले असून याबाबत बँकांसह पोलिसांनीही लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
□ पाटील नगरात मारहाण दोघे जखमी
सोलापूर : एमआयडीसी परिसरातील पाटील नगरात असलेल्या पटांगणात खेळताना झालेल्या किरकोळ भांडणातून दगड आणि लाथाबुक्क्याने केलेल्या मारहाणीत राहुल नीलकंठ पसलादि (वय१६) आणि विनायक व्यंकटेश कोनगिरी (वय २१ रा. स्वागतनगर) हे जखमी झाले.
ही घटना शुक्रवारी (ता. 22) सायंकाळच्या सुमारास घडली. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. व्यंकटेश पोशम, आकाश यादगिरी, यासिन बागवान, छोटू कौतम आणि अन्य आठ ते दहा जणांनी मारहाण केली अशी नोंद एमआयडीसी पोलिसात झाली आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/588213706189696/