अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील शिरवळ येथे शेतातील बांधावर पडलेल्या वायरचा शॉक लागून एकाचा जागीच मृत्यू झाला. नूरदिन मौला दखणे (वय ५५ रा शिरवळ ता अक्कलकोट ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. In Akkalkot, one person died due to electric shock and a municipal employee committed suicide
याबाबत माहिती अशी की, शनिवारी (दि २३) सकाळी ९ च्या सुमारास नूरदिन मौला दखणे हे शेतातील कामे उरकून बांधावरून घरी येत असताना एमएसईबीच्या तुटलेल्या तारेचा शॉक लागून मयत नूरदिन यांच्या छातीला भाजून मोठी दुखापत झाली. विजेचा धक्का जोरात बसल्याने जागेवरच जोरात कोसळले, अशी तक्रार मुलगा मैनोदीन याने पोलीस ठाण्यात दिली.
त्यानंतर गावातील लोकांच्या मदतीने मयत वडिलांना खाजगी वाहनाने अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल करून तपासणी केले असता उपचारापूर्वीच नूरदिन हे मयत झाले होते. मयत नूरदिन यांच्या पश्चात तीन मुले व मुलगी असा परिवार आहे. पुढील तपास पोलीस हवालदार विपीन सुरवसे हे करीत आहेत.
□ पालिका कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
सोलापूर– भाटेवाडी (ता.उत्तर सोलापूर) येथे राहणाऱ्या एका ४५ वर्षीय पालिका कर्मचार्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (ता. 23) पहाटेच्या सुमारास घडली.
लक्ष्मण मच्छिंद्र कचरे (वय ४५ रा. भाटेवाडी) असे मयताचे नाव आहे. शनिवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह घरातील छताच्या लोखंडी अँगलला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
त्याला फासातून सोडवून शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत जाहीर केले. मयत लक्ष्मण कचरे हा सोरेगाव येथील जलशुद्धीकरण केंद्रात कामाला होता. या घटनेची नोंद सलगरवस्ती पोलिसात झाली असून या मागचे कारण मात्र समजले नाही. हवालदार वाघमारे पुढील तपास करीत आहेत.
https://www.facebook.com/109399567404448/posts/588308476180219/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ कुत्र्याच्या कारणावरून दांपत्यास मारहाण करून विवाहितेचे दागिने लुटले
सोलापूर – आमच्या घरासमोर कुत्र्याला शौचास बसवून घाण का करता अशी विचारणा केल्याच्या कारणावरून महिलेचे केस धरून मारहाण करीत त्यांच्या गळ्यातील दागिने लुटण्यात आले.
ही घटना खेडभोसे (ता.पंढरपूर) येथे १९ जुलै च्या सकाळच्या सुमारास घडली. कमल दत्तात्रय यादव (वय २४) आणि त्यांचे पती दत्तात्रय यादव( दोघे रा. खेडभोसे) अशीहे जखमींची नावे आहेत. या संदर्भात जखमी कमल यादव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून करकंबच्या पोलिसांनी लतिका नवनाथ पवार तिचे पती नवनाथ आणि मुलगा आशिष पवार या तिघां विरुद्ध गुन्हा दाखल केला.
आमच्या घरासमोर कुत्र्याला शौचास का बसविता अशी विचारणा लतिका पवार यांनी केली होती. तेव्हा तिघांनी मिळून त्यांना खाली पाडून लाथा बुक्क्याने मारहाण करीत गळ्यातील गळ्यातील २० हजाराचे मंगळसूत्र तोडून घेतले.भांडण सोडविण्यास आलेल्या त्यांच्या पतीला त्यांनी दगड आणि काठीने मारहाण करून जखमी केले. अशी नोंद पोलिसात झाली. हवालदार भोसले पुढील तपास करीत आहेत.
□ पिंपळखुंटे येथे महिलेस मारहाण
पिंपळखुंटे (ता.माढा) येथे भावकीतील शेत जमिनीच्या वादातून लाथाबुक्याने केलेल्या मारहाणीत सुवर्णा प्रेमचंद आरबाळे (वय ४०) या जखमी झाल्या. ही घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास घडली. त्यांना कुर्डूवाडी येथे उपचार करून सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना विजय आरबाळे, गणेश आरबाळे, वसंत आरबाळे आणि योगेश अरबाळे यांनी मारहाण केली अशी नोंद पोलिसात झाली आहे.
□ पाटील नगरात मारहाण दोघे जखमी
एमआयडीसी परिसरातील पाटील नगरात असलेल्या पटांगणात खेळताना झालेल्या किरकोळ भांडणातून दगड आणि लाथाबुक्क्याने केलेल्या मारहाणीत राहुल नीलकंठ पसलादि (वय१६) आणि विनायक व्यंकटेश कोनगिरी (वय २१ रा. स्वागतनगर) हे जखमी झाले. ही घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. व्यंकटेश पोशम, आकाश यादगिरी, यासिन बागवान, छोटू कौतम आणि अन्य आठ ते दहा जणांनी मारहाण केली अशी नोंद एमआयडीसी पोलिसात झाली आहे.
https://www.facebook.com/109399567404448/posts/588294222848311/