Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: Solapur municipal सोलापूर महापालिका आयुक्तपदासाठी धनराज पांडेंच्या नावाची चर्चा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

Solapur municipal सोलापूर महापालिका आयुक्तपदासाठी धनराज पांडेंच्या नावाची चर्चा

Surajya Digital
Last updated: 2022/07/24 at 2:41 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
□ पण पांडे म्हणतात, त्यात कोणतेही तथ्य नाहीस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ भाटेवाडी येथे पालिका कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

□ पण पांडे म्हणतात, त्यात कोणतेही तथ्य नाही

 

सोलापूर : महापालिका आयुक्तांची बदली होणार असल्याची चर्चा असतानाच आता त्यांच्या जागी माजी उपायुक्त धनराज पांडे यांची नियुक्ती होणार असल्याची चर्चा शनिवारी दिवसभर पालिका वर्तुळात आणि सोशल मिडीयावर होती. मात्र यात काही तथ्य नसल्याचे पांडे यांनी सांगितले. महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी केंद्राकडे आंध्रप्रदेश या मूळ केडरमध्ये बदली मागितली आहे. Discussion of Dhanraj Pandey’s name for the post of Solapur Municipal Commissioner

 

ही प्रक्रिया पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. शिवशंकर यांचा महाराष्ट्रातील दहा वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. त्यामुळे ते केडर बदलास पात्र आहेत. यासंदर्भातील त्यांनी केंद्र सरकारला अॅप्लीकेशन सादर केले आहे. सोलापुरात त्यांचा आयुक्तपदाचा दोन वर्षांचा कालवधीही पूर्ण झाला आहे. अधूनमधून त्यांच्या बदलीची चर्चा पालिका वर्तुळात सुरू असते. ही चर्चा असतानाच आता शनिवारी पालिका वर्तुळात आणि सोशल मिडीयावर होती.

 

महापालिकेचे उपायुक्त म्हणून काम पाहतानाधनराज पांडे यांनी आपल्या कार्यशैलीने सोलापूरकरांवर चांगलीच छाप पाडली होती. राज्य वित्त व लेखा सेवा विभागातील असलेले धनराज पांडे यांची कोविड काळात सोलापूर महानगरपालिके तील उपायुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली होती. महापालिकेत उपायुक्तपद रिक्त असल्याने त्यांच्या नियुक्तीने कोविडच्या कामासाठी त्यांचा चांगला फायदा झाला होता.

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/588308476180219/

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

आयुक्त पी शिवशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी दोन वर्षे या पदावर विविध विभागांची जबाबदारी घेऊन उत्कृष्टरित्या काम पाहिले होते. मात्र त्यानंतर त्यांची मार्च महिन्यात स पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी म्हणून पदोन्नतीने बदली झाली.

 

आता पुन्हा त्यांची सोलापूरच्या पालिका आयुक्तपदी नियुक्ती होणार अशी चर्चा रंगली आहे. मात्र या गोष्टीत काही तथ्य नसल्याचे त्यांनी दें. सुराज्यशी बोलताना सांगितले. आपण सोलापूरच्या आयुक्तपदावर येण्यासाठी कोणतेही प्रयत्न करत नसल्याचे ते म्हणाले.

 

 

□ भाटेवाडी येथे पालिका कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

 

सोलापूर–  भाटेवाडी (ता.उत्तर सोलापूर) येथे राहणाऱ्या एका ४५ वर्षीय पालिका कर्मचार्‍याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज शनिवारी (ता. 23) पहाटेच्या सुमारास घडली.
 लक्ष्मण मच्छिंद्र कचरे (वय ४५ रा. भाटेवाडी) असे मयताचे नाव आहे. शनिवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह घरातील छताच्या लोखंडी अँगलला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
त्याला फासातून सोडवून शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत जाहीर केले. मयत लक्ष्मण कचर हा सोरेगाव येथील जलशुद्धीकरण केंद्रात  कामाला होता. या घटनेची नोंद सलगरवस्ती पोलिसात झाली असून या मागचे कारण मात्र समजले नाही. हवालदार वाघमारे पुढील तपास करीत आहेत.

 

https://www.facebook.com/109399567404448/posts/588294222848311/

 

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Discussion #DhanrajPandey's #name #post #Solapur #Municipal #Commissioner, #सोलापूर #महापालिका #आयुक्तपद #धनराजपांडे #नावाची #चर्चा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अक्कलकोटमध्ये विजेचा शॉक लागून एकाचा मृत्यू तर पालिका कर्मचाऱ्याची आत्महत्या
Next Article कौतुकास्पद..! अभिनेत्री तेजश्री प्रधान मृत्यूनंतर करणार नेत्रदान

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?