सोलापूर : अक्कलकोट मैंदर्गी मार्गावर एसटी बसला अपघात झाला आहे. सोलापूर ते गाणगापूर एसटी बसला अक्कलकोट मैंदर्गी मार्गावर देशमुख शेतालगत एसटी बस पलटी झाली. आज सकाळी हा अपघात झाला. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी रूग्णालयात जावून माहिती घेतली.
एसटी बसमधील जवळपास 40 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमी प्रवाशांना अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता असून खाजगी डॉक्टर ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले आहेत. काहीना सोलापुरातील शासकीय रूग्णालयात दाखल केलंय.
या अपघाताची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. अपघातातून जखमी प्रवाशांना तातडीने अक्कलकोट किंवा जवळपासच्या रुग्णालयांत हलवून योग्य त्या उपचारांची व्यवस्था करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. हा अपघात झाल्याचे कळताच मुख्यमंत्र्यांनी एसटी महामंडळ व पोलिसांकडून याची माहिती घेतली व जखमी तसेच इतरही प्रवाशांची व्यवस्था करावी अशा सूचना दिल्याची माहिती आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
https://www.facebook.com/109399567404448/posts/588337859510614/
अपघातात जखमी प्रवाशांना तातडीने अक्कलकोट किंवा जवळपासच्या रुग्णालयांत हलवून शासकीय खर्चाने योग्य त्या उपचारांची व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्याचप्रमाणे अपघातात ज्यांना गंभीर दुखापत झाली आहे. अशा ठराविक किंवा मोठा अस्थिभंग झालेल्या प्रवाशांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५० हजार रुपये अधिकची आर्थिक मदत करण्यात यावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
अपघात झाल्याचे कळताच मुख्यमंत्र्यांनी सोलापूर जिल्हाधिकारी तसेच एसटी महामंडळ व पोलिसांकडून याची माहिती घेतली व जखमी तसेच इतरही प्रवाशांची व्यवस्था करावी अशा सूचना दिल्या आहेत. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी शासकीय रूग्णालयात दाखल होऊन माहिती घेतली.
□ जखमींची नावे
मंगला रेशमी,इरणा रेशमी, शशिकला हळमोरे, बाबुराव पाटील, निमा परदेशी, भीमा गायकवाड, महादेवी बिराजदार, आनंदी पटाक, संगीता पाटील, समीना पाटील, देविदास परदेशी, सुजाता पेडगावकर, देविदास पेडगावकर, हेमा पेडगावकर, प्रतीक पेडगावकर, शिवानंद स्वामी, स्नेहा गवंडी, संजू माशाळे, संगमेश्वर हौदे, सिद्धाराम आवटे, खंडू शेंडगे, सिद्धनाथ रुपवरे, नीलम जमादार, श्रेया घाटे, भाग्यश्री माळी, सादिक फुलारी, शिवानंद धनशेट्टी, ईरांना पुजारी, सुयश धायगुडे, गीता सुतार, यल्लप्पा सुतार, चंद्रशेखर पापट, अशोक पाटील, अलका पाटील, रोहित पाटील, श्रुती पवार अशी जखमींची नावे समोर येत आहेत
https://www.facebook.com/109399567404448/posts/588376339506766/