सोलापूर : तुळजापूर रस्त्यावर हगलूर गावच्या शिवारातील विनापरवाना ऑर्केस्ट्राबारवर धाड टाकली. यात सहा बारबालासह 28 ग्राहकांवर गुन्हा दाखल केला असून यात साडेचौदा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. Dance bar in Hagalur Shiwar raided, action taken against 28 people including six barbals, valuables worth fourteen lakhs seized
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील सर्व अधिकारी व अंमलदार यांना माहिती काढून अवैध धंद्यावर कारवाई करण्याबाबत सुचना दिल्या होत्या.
स.पो.नि. नागनाथ खुणे व त्यांचे पथक अवैध धंदयावर कारवाई करण्यासाठी तुळजापूर रोडवरील मश्रुम गणपतीजवळ हजर असताना त्यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, उत्तर सोलापूर तालुक्यातील हगलूर गावच्या शिवारात हगलूर ते दहिटणे जाणा-या रस्त्यालगत असलेल्या एम.ए.कॅपीटल रेस्टाॅरंन्ट अन्ड बार” च्या आवारातील हाॅलमध्ये बेकायदा बिनापरवाना डान्सबार चालू आहे.
बारमध्ये काही महिला अंगावर तोकडे कपडे घालून विभित्स हावभाव व अंगविक्षेप करून डि.जे. म्युझिकच्या तालावर अश्लील नृत्य करीत असल्याचीही बातमी मिळाली. त्यावरून स.पो.नि. नागनाथ खुणे यांनी तात्काळ याबाबत वरिष्ठाना कळवून सदर ठिकाणी कारवाई करण्याकरिता अतिरिक्त पोलीस कुमक मागवून घेतली.
स्थानिक गुन्हे शाखेकडील स.पो.नि. नागनाथ खुणे व सपोनि अनिल सनगल्ले व त्यांचे पथक, सोलापूर तालुका पोलीस ठाणेचे पो.स.ई. शिवकुमार जाधव व त्यांचे पथक असे ”एम.ए.कॅपीटल रेस्टाॅरंन्ट ॲन्ड बार” च्या आत जावून पाहणी केली.
https://www.facebook.com/109399567404448/posts/588416736169393/
बारमधील स्टेजवर ६ महिला अंगावर तोकडे कपडे घालून अश्लील हावभाव व अंगविक्षेप करून डि.जे. म्युझिकच्या तालावर अश्लील नृत्य करीत होत्या, समोरील बाजूस सोफ्यावर काही प्रेक्षक ग्राहक म्हणून बसलेले दिसून आलेे. तेंव्हा त्यातील काही प्रेक्षक स्टेजकडील नर्तकीकडे पाहून अश्लील हावभाव करून संगिताच्या तालावर नाचत असताना मिळून आले.
बार मॅनेजरकडे आर्केस्ट्राबार परवानाबाबत विचारपूस केली असता, त्याने परवाना नसल्याचे सांगितले. या बारमधून डी.जे. म्युझिकल साउन्ड सिसस्टिम, दोन कुलर, एक लॅपटाॅप, लाईट सिस्टिम, विदेशी दारूचे क्वार्टर व बिअरचा साठा, तसेच १५ मोटार सायकली असा एकूण १४ लाख ४६ हजार ७२५ रूपये किंमतीचे साहित्य जप्त केली.
सोलापूर तालुका पोलिसात संबंधीतांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, अमोल भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी, सोलापूर विभाग सोलापूर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांचे नेतृत्वाखाली झाली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
यात सोलापूर तालुका पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे, अनिल सनगल्ले, पो.स.ई. शिवकुमार जाधव पोलीस अंमलदार संदीप काशीद, श्रीकांत गायकवाड, बापू शिंदे, प्रकाश कारटकर, धनाजी गाडे, आबासाहेब मुंडे, मोहन मनसावाले, लालसिंग राठोड, अक्षय दळवी, अजय वाघमारे, चालक समीर शेख, प्रमोद माने, महिला अनिसा पटेल, सुनंदा झळके, सोलापूर तालुका पोलीस ठाणेचे हवेल जाधव, शिवाजी मोरे यांनी कामगिरी बजावली.
https://www.facebook.com/109399567404448/posts/588480056163061/