Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापुरात शासकीय रुग्णालयातील विसावा कक्षात गळफास घेऊन आत्महत्या
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

सोलापुरात शासकीय रुग्णालयातील विसावा कक्षात गळफास घेऊन आत्महत्या

Surajya Digital
Last updated: 2022/08/01 at 1:48 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ हगलूर येथे विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न□ मंगळवेढा परिसरातील तरुणाची विष पिऊन आत्महत्या□ खर्डी येथील मंदिर परिसरातून मंगळसूत्र पळविले□ पांढरेवाडी येथे ८० हजाराचे विद्युत साहित्य पळवले

सोलापूर – छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील बी ब्लॉक जवळ असलेल्या विसावा कक्षात एका ३५ वर्षीय रुग्णाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज रविवारी (ता.31) पहाटेच्या सुमारास घडली. Suicide by hanging in the visawa ward of the government hospital in Solapur

 

विजय पांडुरंग सोनार (वय ३५ रा. भवानी पेठ, हनुमान नगर) असे मयताचे नाव आहे. रविवारी पहाटे ५ वाजण्यापूर्वी त्याचा मृतदेह विसावा कक्षातील छताच्या लोखंडी अँगलला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. तो काही दिवसापासून आजारी होता. शिवाय त्याची ८० वर्षाची आई देखील आजारी होती. त्याला दारूचे व्यसन असल्यामुळे त्याची पत्नी १० वर्षांपूर्वी माहेरी गेली होती.

शिवाय घर विकल्यामुळे राहण्यास जागा नव्हती. त्यामुळे तो आईसोबत कांही दिवसापासुन रुग्णालयातील विसावा कक्षात राहून उपचार घेत होता.मध्यरात्रीनंतर त्याने छताच्या लोखंडी अंगाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतला. अशी नोंद सदर बजार पोलिसात झाली. पुढील तपास हवालदार जमादार करीत आहेत.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

□ हगलूर येथे विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

सोलापूर : हगलूर (ता.तुळजापूर) येथे राहणाऱ्या कांतु निलप्पा राठोड (वय ३५) याने स्वतःच्या शेतात विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. शनिवारी (ता.30) सायंकाळच्या सुमारास हा प्रकार घडला. त्याला अणदूर येथे प्राथमिक उपचार करून संजय पवार (मेहुणा) यांनी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात बेशुद्धावस्थेत दाखल केले. या मागचे कारण समजले नाही.

 

□ मंगळवेढा परिसरातील तरुणाची विष पिऊन आत्महत्या

 

सोलापूर – दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने एका वीस वर्षीय तरुणाने विष घेऊन आत्महत्या केली ही घटना घरनिकी (ता. मंगळवेढा) येथे घडली. प्रतीक प्रकाश भोसले (वय २० रा. घरनिकी) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. शनिवारी (ता.30) सायंकाळच्या सुमारास त्याने हा प्रकार केला होता. त्याला सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तो काल रविवारी सकाळी मरण पावला. या घटनेची प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे.

 

□ खर्डी येथील मंदिर परिसरातून मंगळसूत्र पळविले

खर्डी (ता.पंढरपूर) येथील सिताराम महाराज मंदिर परिसरातून चोरट्याने लता विलास गुरव (वय ६५ रा.कुमठा नाका सोलापूर) या महिलेच्या गळ्यातील १७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र शिताफिने पळविले. त्या शुक्रवारी सकाळी दर्शन घेऊन परिसरातून निघाल्या होत्या. गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ४० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र पळविले. अशी नोंद पंढरपूर शहर पोलिसात झाली आहे.

□ पांढरेवाडी येथे ८० हजाराचे विद्युत साहित्य पळवले

पांढरेवाडी (ता.पंढरपूर) येथील न्यू पॉवर इंटरप्राईजेस कंपनी या दुकानाच्या शटर उचकटून चोरट्याने तांब्याचे रॉड, गमचे बॅरल आणि इतर इलेक्ट्रिकल साहित्य असा एकूण ८० हजार रुपये किमतीचा माल पळविला. ही चोरी शुक्रवारी पहाटेच्या सुमारात झाल्याची नोंद करकंब पोलिसात झाली. हवालदार गोडसे पुढील तपास करीत आहेत.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #Suicide #byhanging #20th #ward #government #hospital #Solapur, #सोलापूर #शासकीय #रुग्णालय #विसावा #कक्ष #गळफास #आत्महत्या
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article संजय राऊत यांच्या घरातून साडेअकरा लाखांची रोख रक्कम जप्त
Next Article सोलापुरात झेडपीच्या 43 शाळा बंद पडण्याच्या मार्गावर

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?