मुंबई : एका मराठी अभिनेत्रीच्या तथाकथित पतीला निर्दोष सोडण्यास मुंबई हायकोर्टाने नकार दिला आहे. तसेच पहिले लग्न लपवून दुसरे लग्न केले व शरीरसंबंधांसाठी परवानगी मिळवली, हादेखील एक प्रकारचा बलात्कार आहे, असे कोर्टाने स्पष्ट केले. घटस्फोट झाल्याचे खोटे कागदपत्रे दाखवून आरोपीने (सिद्धार्थ) अभिनेत्रीसोबत लग्न केले होते. पण पहिल्या पत्नीपासून 2 मुलं असल्याची बाब समोर आली. त्यामुळे अभिनेत्रीने तक्रार दाखल केली. ‘Concealing the first marriage and taking permission for sexual intercourse for the second marriage is rape’
अभिनेत्रीच्या दाखल याचिकेवर ही सुनावणी झाली आहे. तथाकथित पतीला निर्दोष सोडण्यास न्यायालयाने नकार देताना सदर टिप्पणी केली. एका व्यक्तीने आपण अविवाहित असल्याचा दावा करत घटस्फोटित मराठी अभिनेत्रीसोबत लग्न केलं होतं. मात्र या व्यक्तीची पहिल्या लग्नाची पत्नी तसेच त्याला दोन मुलही आहेत. त्याने पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाल्याचं खोटं सांगितलं होतं. सदर घटस्फोटाचे खोटे कागदपत्रदेखील दाखवले होते. मात्र ते बनावट असल्याचे सिद्ध झाले. आता सिद्धार्थ बंथिया नावाच्या या व्यक्तीवर बलात्काराचा खटला चालला. कोर्टाने त्याच्या दुसऱ्या लग्नालाही मान्यता दिलेली नाही.
एका जवळच्या मित्राने २००८ मध्ये मराठी अभिनेत्री आणि सिद्धार्थ बंथिया यांची भेट घडवून आणली होती. सुरुवातीला त्याने बॅचलर असल्याचं म्हटलं. त्यानंतर 2010 मध्ये अभिनेत्रीला प्रपोज केलं. एक महिन्यानंतर वर्सोवा येथे दोघांनी लग्न केलं. ते सोबत राहू लागले. त्यानंतर जवळपास दोन महिन्यांनतर अभिनेत्रीला एक फोन आला. फोनवरून एक महिला बोलत होती. ती सिद्धार्थ यांची पत्नी असून तिला दोन मुलं असल्याचा दावा सदर महिलेने केला.
https://www.facebook.com/109399567404448/posts/594198605591206/
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
अभिनेत्रीने सिद्धार्थला याचा जाब विचारला असता त्याने आपलं लग्न मोडल्याचं सांगितलं. तसेच घटस्फोटाचे कथित कागदपत्रही दाखवले. त्यानंतर अभिनेत्री आणि सिद्धार्थने एका हॉटेलमध्ये लग्नाचा वाढदिवस साजरा केला. तिचा फोटो वृत्तपत्रात छापल्यानंतर पहिली पत्नी त्याच्या घरी आली आणि तिने गोंधळ घातला. तेव्हा सिद्धार्थने कथित घटस्फोटाचे कागदपत्र बनावट असल्याचं मान्य केलं.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अभिनेत्रीने पोलिसाकडे धाव घेतली. 2013 मध्येच सिद्धार्थविरोधात बलात्कारासह भादवि कलम 420, 406, 467, 471, 474, 376, 323, 504, 506 (i) आणि 494 अंतर्गत पुण्यातील दत्तवाडीत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास पूर्ण करून आरोपपत्र दाखल केलं.
याविरोधात सिद्धार्थने पुणे सेशन कोर्टात निर्दोष सिद्ध करण्याची मागणी करीत याचिका दाखल केली. सुनावणीनंतर सेशन कोर्टाने 3 डिसेंबर 2022 रोजी बलात्काराचा आरोप रद्द करण्यास नकार दिला. ती याचिका फेटाळली. त्यानंतर सिद्धार्थने बॉम्बे हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला
https://www.facebook.com/109399567404448/posts/594114935599573/