□ विमानतळाबाबत पुढच्या महिन्यात बैठक
पंढरपूर :– तीर्थक्षेत्र पंढरपूरमध्ये विमानतळ उभा करण्याची मागणी पुढे आली आहे. तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपूरचा विकास करायचा असेल तर पंढरपूरमध्ये विमानतळ उभा करा अशी मागणी भाजपचे नेते संतोष पाटील यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून केली आहे. BJP leader demands to build an airport in Pandharpur Boramani Solapur
बोरामणी (सोलापूर) येथील जमीन विमानतळासाठी संपादित झाली आहे. मात्र, विमानतळासाठी उभारणीची कोणतीच कार्यवाही अनेक वर्षापासून झाली नाही. त्यामुळे विमानतळाच्या जागेवर औद्योगिक वसाहत निर्माण करून पंढरपूर येथे विमानतळ उभा करण्याची मागणी भाजपा नेते संतोष पाटील यांनी केली आहे.
10 सप्टेंबर 2022 पर्यंत नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि संतोष पाटील यांची बैठक होणार आहे. सध्या राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी पंढरपूर येथे विमानतळ करण्याच्या मागणीला यश मिळण्याची शक्यता जास्त वाटते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी यांचे पंढरपूरच्या विकासावर विशेष लक्ष आहे. भाजप सरकार तिर्थक्षेत्रांना भरभरूम निधी देत आले आहे. त्यामुळे या मागणीकडे पंढरपूरकरांचे विशेष लक्ष लागले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील कृषी मालाची निर्यात होण्यास चालना मिळेल. पंढरपूर, करमाळा, सांगोला या भागातील द्राक्ष, बेदाणा, डाळिंब, केळी आदि फळांची राज्यात तसेच परराज्यात निर्यात करण्यास मदत होईल.
● पंढरपूरच्या भाजपच्या स्थानिक नेत्यांची भूमिका निर्णायक
पंढरपूरच्या विकासासाठी पंढरपूरला महामार्गाने जोडले आहे. पंढरपूरमध्ये विमानतळ झाल्यास चांगला विकास होईल. मात्र मोहोळ तालुक्यातील नेत्यांनी पंढरपूरच्या विकासासाठी मागणी करतात आणि पंढरपुरातील स्थानिक भाजप नेते यासाठी काही प्रयत्न करताना दिसत नाही. एमआयडीसीला विरोध करणारे नेते विमानतळाबाबत काय भूमिका घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार.
》 मेटेंच्या अपघाताची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल; सीआयडी चौकशीचे आदेश
मुंबई : शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचे दिनांक 14 ऑगस्ट रोजी मुंबई-पुणे महामार्गावर अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. मेटेंचे निधन हे अपघात नसून घातपात आहे, अशी शंका उपस्थित केली जात आहे. यावर आता, शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटेंचा अपघात की घातपात अशी शंका उपस्थित झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. त्यानंतर आता मेटेंच्या अपघाती मृत्यूची सीआयडी चौकशी होणार आहे, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले आहेत.
सीआयडी चौकशी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालकाना दिले आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
मराठा समाजाचे नेते विनायक मेटे यांच्या गाडीला रविवारी (ता. १४) पहाटे पाच वाजता मुंबई- पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात झाला होता. या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्यावेळीच प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी या मृत्यची सखोल चौकशी करण्यात येईल असे जाहीर केले होते.
त्यानुसार आज बुधवारी त्यांनी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना या मृत्यूची सीआयडी चौकशी करून आपला निष्कर्ष सादर करण्याचे आदेश दिले आहेत. मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर अनेक शंका त्यांच्या कुटुंबियांकडून उपस्थीत करण्यात आल्या आहेत. मेटेंच्या समर्थकांनी देखील हा अपघात नाही तर घात असल्याचा आरोप केला होता. या सगळ्या संशयाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी मेटेंच्या अपघाताची सीआयडी चौकशीचे आदेश देत तथ्य समोर आणण्याचे निर्देश दिले आहेत.
विनायक मेटे यांच्या गाडीचा चालक एकनाथ कदम याची कसून चौकशी केली जात आहे. मात्र, त्याच्याकडून पोलिसांना समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे. तो सतत आपला जबाब बदलत आहे. पोलिसांकडून आता विनायक मेटे यांच्या गाडीचा चालक आणि मेटे यांच्या अंगरक्षकाच्या फोन कॉलचा डेटा तपासला जाणार आहे. पोलिसांकडून विनायक मेटे यांच्या अपघातावेळी मुंबई पुणे एक्सप्रेस वे मार्गावरून जाणाऱ्या वाहनांचे सीसीटीव्ही फुटेजही पाहिले जाणार असून यामध्ये एखाद्या गाडीची हालचाल संशयास्पद दिसते का, हे पाहिले जाणार आहे.
दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे म्हणाल्या, अपघात झाल्यानंतर कदम याला सातत्याने माझे एकच म्हणणे होते की, साहेबांशी बोलणे करून दे. साहेबांच्या दोन्ही नंबरवर मी फोन केले, पण फोन उचलत नव्हते. माझे त्यांच्याशी बोलणे झाले तं नाही तर मला वाटत होते किमान सुरक्षारक्षकाशी तरी बोलणे व्हावे, कारण तोपर्यंत मला माहीत नव्हते की सुरक्षारक्षकही जखमी आहे. मात्र एकनाथ हा कोणाशीच बोलणे करून देत नव्हता. तो एकमेव आहे ज्याला हे सगळे कसे झाले हे माहीत आहे. मग साहेबांचा मृत्यू झाला आहे हे त्याला माहीत होते का? किंवा नसेल झाला तर त्याने वैद्यकीय मदत मागितली का? असे सगळे मुद्दे अनुत्तरित आहेत.