सोलापूर – करमाळ्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखाना बंद असल्याने शेतक-यांचा ऊस घालवणे मुश्कील झाला होता. आता शिखर बँकेने कारखान्याचा ताबा संचालकाकडे दिल्याने तीन वर्षानंतर ‘आदिनाथ’चे धुराडे पेटणार आहे. शेतक-यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. Karmala after three years ‘Adinath sugar factory will burn down; Shikhar Bank handed over Narayan Patil Bagal to the director
करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखाना सलग तीन वर्ष बंद असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून संचालक मंडळ, बारामती अँग्रो व महाराष्ट्र राज्य सहकारी बँक आणि कामगार यांच्यात न्यायालयात लढा सुरू असून अनेक घडामोडी नंतर शिखर बँकेने हा कारखाना संचालक मंडळाच्या ताब्यात दिला आहे. त्यामुळे विजया दशमीच्या शुभमुहूर्तावर कारखान्याचा बाँयलर पेटविण्यासाठी युद्ध पातळीवर तयारी सुरू केली आहे, असे कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक हरिदास डांगे यांनी सांगितले.
ऑक्टोबर २०२० मध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने कारखाना सिल करून ताब्यात घेतला होता. त्यानंतर आता पुन्हा बँकेने संचालक मंडळाच्या ताब्यात दिला आहे. आता तो सुरु करण्यासाठी पैश्याची गरज असून आतापर्यंत डॉ. वसंतराव पुंडे, दत्तात्रय जाधव व प्रा.रामदास झोळ यांनी केलेल्या मदतीतून कारखान्यात कामे केली जात आहेत. आणखी पैश्याची गरज असून आदिनाथ बचाव समितीच्या बैठकीत ज्यांनी घोषणा केल्या होत्या त्यांनी त्वरित मदत जमा करावी, असे आवाहन हरिदास डांगे यांनी केले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
कारखाना चालू गळीत हंगामात चालू करण्यासाठी आपण नेटाने प्रयत्नशील आहोत. दसऱ्याच्या मुहूर्तावर बाँयलर पेटवून दिवाळीत कारखाना सुरू करावयाचा आहे. तर माजी आमदार नारायण पाटील व बागल गट हे मोलाचे सहकार्य करीत आहेत आणि मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी चांगली आर्थिक मदत केली आहे. करमाळा तालुक्यातील इतर राजकीय मंडळी सुद्धा कारखाना सुरू करण्यासाठी मदतच करतील, असा विश्वास हरिदास डांगे यांनी व्यक्त केला आहे.
□ शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार – पाटील
आदिनाथ कारखाना उभारणी स्व.गोविंद बापू पाटील, गरिदास देवी व त्यांच्या अनेक सहकाऱ्यानी मोठ्या कष्टाने उभा केलेला कारखाना गिळंकृत करण्यासाठी बारामती अँग्रो टपली होती. परंतु तो डाव हाणून पाडत कारखाना सहकारीच राहिला पाहिजे या मतावर मी ठाम होतो. आघाडी सरकार पायउतार झाल्यानंतर मंत्री तानाजी सांवत यांनी मोठी आर्थिक मदत केली. आणि यापुढे ही ते मदत करणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी लाख मोलाचे सहकार्य केले आहे. आमच्या लढाईत आ. रणजितसिंह मोहिते पाटील, आ.राम शिंदे सर हे सोबत होते ते वेळोवेळी पाठपुरावा करीत होते. या सर्वांच्या सहकार्यामुळे दिवाळीत कारखाना सुरू करणार आहे. तालुक्यातील सर्व ऊस उत्पादकांनी उस गळीतास देण्याचे अश्वासन दिले आहे. कारखान्यातील कामे सुरू केली आहेत. आतील सर्व कामकाज डांगे साहेब बघत आहेत. या सर्वांच्या सहकार्याने शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील.
नारायण पाटील – माजी आमदार