Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शरद पवारांची एन्ट्री : कधीही न दिसणारे शहराध्यक्ष पोस्टरवर झळकले
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

शरद पवारांची एन्ट्री : कधीही न दिसणारे शहराध्यक्ष पोस्टरवर झळकले

Surajya Digital
Last updated: 2022/09/18 at 9:05 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)● फक्त बॅनरबाजीपुरते शहराध्यक्ष 

कुर्डूवाडी / हर्षल बागल : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्यातलं कोणतंही आंदोलन असो की कोणताही दिलेला कार्यक्रम असो ते कुर्डूवाडीत नित्यनियमाने कधीच झाले नाही. मात्र आता मोठे साहेब येणार म्हटले की, कधीही न दिसणारे चेहरे आता पोस्टरवर झळकत आहेत. कुर्डूवाडीमध्ये हा चर्चेचा विषय होत आहे. Sharad Pawar’s entry: Kurduvadi appeared on the poster of the never-seen city president Dattaji Kaka

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा कुर्डूवाडीत नावापुरताच … शहरात अनेक अध्यक्ष झाले… नेते झाले… पण कुर्डूवाडीचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही नेता पवारांच्या आदेशावर एकही मोठे आंदोलन करू शकला नाही. सत्ता काळात असताना अनेकांनी तिथे जाऊन लाभ घेतला पण सत्तेबाहेर असताना पवारांच्या सांगण्यावरून राज्यभरात आंदोलन झाली पण कुर्डूवाडी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांना अद्याप आंदोलनाची जागाच मिळाली नाही, असेच म्हटले जात होते.

 

शरद पवार हे स्वर्गीय विठ्ठलराव शिंदे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या उद्घाटनाला उद्या सोलापुरात येत आहेत, असे कळताच कुर्डूवाडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष दत्ताजी काकडे यांनी बॅनर छापून शहरात पक्ष किती मोठा आहे हे दाखवण्याचा केलेला एक केविलवाणा प्रयत्न दिसून येत आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

शहरात दोन-तीन जागी लावलेले डिजिटल खरे पण त्या डिजिटलवर शहराध्यक्ष वगळता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कुर्डूवाडी शहरातील एकाही पदाधिकाऱ्याचा फोटो नाही, एरवी राष्ट्रवादीचा एकही कार्यक्रम न घेणारे दत्ताजी काकडे हे आता मात्र पवारांच्या एन्ट्रीमुळे बॅनरवर झळकू लागले आहेत. कुर्डूवाडीमध्ये हा चर्चेचा विषय होत आहे.

 

 

खरंतर दत्ताजी काकडे यांचा प्रवास माढा तालुका वाहन चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष इथपासून चालू झाला आणि संजय मामांच्या कृपेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राष्ट्रवादीची शहराध्यक्ष पदाची माळ गळ्यात पडली. दुर्दैवाने दत्ताजी काकडे हे मामांच्या या निर्णयाला सार्थकी ठरू शकले नाहीत हेही तितकेच खरे. ‘मै और मेरे ट्रक’ हा एवढाच त्यांचा आता चाललेला प्रवास… फक्त शरद पवारांच्या एन्ट्रीने राष्ट्रवादीचा अस्तित्व शहरात दिसावं मी शहराचा अध्यक्ष आहे हे लोकांना कळावं, म्हणून मुख्य चौकात बॅनरबाजीचा केलेला हा इव्हेंटच म्हणावा लागेल.

 

● फक्त बॅनरबाजीपुरते शहराध्यक्ष 

 

खरंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार बबनदादा शिंदे व पक्षाचे सहयोगी आमदार संजयमामा शिंदे या दोन्ही बंधूंनी राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदावर असलेल्या दत्ताजी काकडे यांना भरभरून दिले पण याची उत्तराई मात्र दत्ताजी काकडे यांच्याकडून अद्याप झालेली दिसून येत नाही.

 

शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कोणत्याही कार्यक्रमात व दादा – मामांच्या ही कोणत्याही नियोजनात म्हणावा असा सक्रिय सहभाग दत्ताजी काकडे यांनी कधीच घेतला नाही. केवळ आपल्याकडे राष्ट्रवादीचे पद आहे हे दाखवण्यासाठी केलेली ही बॅनरबाजी, अशी चर्चा कुर्डूवाडीतल्या चौकात चौकात होत आहे.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #SharadPawar's #entry #Kurduvadi #appeared #poster #never-seen #citypresident #DattajiKaka, #कुर्डूवाडी #शरदपवार #एन्ट्री #दत्ताजीकाकडे #शहराध्यक्ष #पोस्टर #झळकले
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article छापेमारीमुळे मिळाला अभिजित पाटलांना बुस्टर डोस; विस्कटलेला विठ्ठल एकसंघ झाला
Next Article अक्कलकोट । हायकोर्टाचा फडणवीसांना धक्का; आमदार कल्याणशेट्टींच्या प्रस्तावावरील शिफारस केली अमान्य

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?