□ अपुऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवरच चालतो महापालिकेचा कारभार !
सोलापूर : शासनाने मंजूर केलेल्या आकृती बंधानुसार सोलापूर महापालिकेत एकूण 4 हजार 612 मंजूर पदांपैकी 347 पदे भरण्यात आली आहेत तर 1 हजार 125 पदे अद्यापही रिक्त आहेत. अपुऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर सोलापूर शहराचा कारभार चालत असल्याचे दिसून येते. As many as 1125 posts of employees – officers are vacant in the Municipal Corporation, Solapur
साधारणतः 25 टक्के पदे रिक्त असल्याची माहिती पुढे आली आहे. सहाय्यक आयुक्तांची 12 तर वैद्यकीय अधिकाऱ्यांची 38 पदे रिक्त रिक्त आहेत. अ – वर्गातील 77, ब -177, क – 547 तर ड वर्गातील 310 पदे रिक्त असल्याचे दिसून येते. महाराष्ट्र शासनाने सोलापूर महापालिकेसाठी दिनांक 28 डिसेंबर 2021 रोजी आकृतीबंध मंजूर केला. या आकृती बंधानुसार महापालिकेत 4 हजार 612 पदे मंजूर करण्यात आली. मंजूर आकृतीबंधानुसार आवश्यक ती पदे सोलापूर महापालिका प्रशासनात उपलब्ध नाहीत.
मंजूर पदांपैकी 3 हजार 447 कर्मचारी व अधिकारी कार्यरत आहेत उर्वरित 1हजार 125 म्हणजेच सुमारे 25 टक्के कर्मचारी व अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याची बाब निदर्शनास आली आहे. अ वर्गात 112 पदे मंजूर असून त्यापैकी 35 पदे भरले आहेत तर 77 पदे रिक्त आहेत. ब वर्गातील 263 पदे मंजूर असून 86 पदे भरण्यात आली. यामध्ये 177 रिक्त पदांची संख्या आहे. क वर्गात 1 हजार 342 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 800 पदे भरली असून 547 पदे ही रिक्त आहेत. तसेच ड वर्गात 2 हजार 895 पदे मंजूर करण्यात आली असून 2 हजार 530 पदे भरले आहेत तर 310 पदे रिक्त आहेत.असे असे एकूण अ, ब, क, ड या चारही वर्गातील 1हजार 125 पदे रिक्त आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● अ वर्गातील ही आहे रिक्त पदे
महापालिकेतील वर्गातील मंजूर पदांपैकी अतिरिक्त आयुक्त – एक, उपसंचालक नगर रचना – एक कार्यकारी अभियंता बांधकाम – 2 , तांत्रिक जल अभियंता – एक आणि मुख्य लेखाधिकारी – एक पद , कार्यकारी अभियंता विद्युत एक उपअभियंता पाच प्राणी संग्रहालय संचालक एक पर्यावरण संवर्धन अधिकारी – एक, विशेष कार्यकारी अधिकारी – एक, मूल्य निर्धारक कर संकलन अधिकारी – एक, सहाय्यक आरोग्य अधिकारी -2 , अधीक्षक अग्निशामक दल – एक, पशुवैद्यकीय अधिकारी – एक, वैद्यकीय अधिकारी 38 असे एकूण अ – वर्गातील 112 पैकी 35 पदे भरण्यात आले आहे तर तब्बल 77 पदे ही रिक्त आहेत.
● ब – वर्गातील सहाय्यक आयुक्तांची दहा पदे रिक्त
सोलापूर महापालिकेत ब वर्गातील सहाय्यक आयुक्त/ विभागीय अधिकाऱ्यांची 10 पदे रिक्त आहेत तसेच मुख्याध्यापक 6, सुरक्षा अधिकारी – एक, कामगार कल्याण अधिकारी- एक , उद्यान अधीक्षक – एक, वृक्ष अधिकारी – एक , मुख्य सफाई अधीक्षक – एक, क्रीडा अधिकारी – एक , जीवशास्त्रज्ञ – एक, अंतर्गत लेखापरीक्षक- एक, मुख्य लेखापाल – एक, मुख्य लेखा परीक्षक – 2, नगरसचिव – एक, महिला व बालकल्याण अधिकारी – एक, समाज विकास अधिकारी – एक, सहाय्यक अग्निशामक अधीक्षक- दोन , प्रकल्प अधिकारी युसीडी – एक, सहाय्यक जीवशास्त्रज्ञ – एक, लघुलेखक इंग्रजी – एक, लघुलेखक मराठी – 3, सहाय्यक शिक्षक 16, वीज पर्यवेक्षक – 7, कनिष्ठ अभियंता – 86, कनिष्ठ अभियंता आर्किटेक्चर – एक, कनिष्ठ अभियंता तांत्रिक – 4 , कनिष्ठ अभियंता सहाय्यक ऑटोमोबाईल – एक, कार्यालय अधीक्षक – 15, पर्यवेक्षक – एक, मेट्रन – एक असे एकूण ब वर्गातील 263 पदांपैकी 86 पदे भरण्यात आली असून 177 पदे रिक्त असल्याचे दिसून येते.
दरम्यान, क – वर्गात बिगारी 63, सफाई कामगार 3, फवारणी- 8 ही पदे अद्यापही रिक्त आहेत. तसेच ड वर्गातील 2895 मंजूर पदांपैकी 2 हजार 530 पदे भरण्यात आले असून अद्यापही 310 पदे ही रिक्त आहेत. तुकड्या कर्मचारी व अधिकारी वर्गांवर महापालिकेचा हा कारभार चालला आहे. त्यामुळे तातडीने मंजूर रिक्त पदे भरण्याची आवश्यकता आहे. वास्तविक पाहता हद्दवाढ होऊनही कर्मचारी व अधिकाऱ्यांची संख्या वाढण्याऐवजी आकृतीबंधात ती कमी करण्यात आली आहेत. त्यातही मंजूर आकृतीबंधातील अनेक पदे रिक्त असल्याने महापालिकेचा कारभार कसा चालणार, असा सवाल उपस्थित होत आहे.