मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील मिंझरी आणि बामणी या भागात भूगर्भात सोन्याचे 2 ब्लॉक (खाणी) आढळून आले आहेत. केंद्र सरकारच्या खनिकर्म विभागाने अहवाल राज्याच्या खनिकर्म विभागाला दिली आहे. सोने निघाले तर ती खूप मोठी उपलब्धी असेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही भूगर्भात सोने असल्याची शक्यता आहे, त्यादृष्टीने विभागाने चाचणी सुरू केली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. Gold mines in Chandrapur, Sindhudurga, Chief Minister Shinde said in our time…Mining
महाराष्ट्राच्या भूर्गाभात कोळसा, बॉक्साईट, आयर्न यासारख्या खनिजांबरोबरच सोनेही दडले असल्याची माहिती समोर आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील मिंझरी आणि बामणी या भागात भूर्गभात सोन्याचे दोन खाणी आढळून आल्या आहेत.
राज्यात सोन्याचे दोन ब्लॉक असल्याची माहिती केंद्रीय अधिकाऱ्यांनी आपल्याला दिली आहे. आमच्या काळात हे सोने निघाले तर ती राज्यासाठी खूप मोठी उपलब्धी असेल. राज्यात खनिकर्म क्षेत्राला मोठा वाव असून गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात देशातील सर्वात मोठा स्टील प्रकल्प सुरू करू शकतो, असा विश्वासही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय.
या भागात भूर्गाभात तांबेही आहे. या भागातून सोनेही मोठ्या प्रमाणात मिळू शकते, असा केंद्र सरकारच्या खनिकर्म विभागाचा अहवाल असल्याची माहिती राज्याच्या खनिकर्म विभागातील सूत्रांनी दिली आहे. दुसरीकडे कोकणातीलत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येही भूगर्भात सोने असल्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने खनिकर्म विभागाने चाचणी सुरू केली असल्याची माहिती आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
राज्यात सोन्याच्या खाणी असल्याचा ओझरता उल्लेख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील ताज हॉटेलमधील खाण क्षेत्रातील संधी या गुंतवणूकदारांच्या परिषदेत केला होता. राज्यात खनिकर्म संशोधन संस्था सुरू करून या व्यवसायातील अडचणी दूर करून राज्याच्या महसुलासह रोजगारात वाढ झाली पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणाले. आमच्या काळात हे सोने निघाले तर ती राज्यासाठी खूप मोठी उपलब्धी असेल. राज्यात खनिकर्म क्षेत्राला मोठा वाव असून गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात देशातील सर्वात मोठा स्टील प्रकल्प सुरू करू शकतो, असा विश्वासही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
या परिषदेला केंद्रीय खनिकर्म मंत्री प्रल्हाद जोशी, केंद्रीय रेल्वे आणि कोळसा राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, केंद्रीय खनिकर्म मंत्रालयाचे सचिव विवेक भारद्वाज, केंद्रीय कोळसा मंत्रालयाचे सचिव अमृत लाल मीना आदी उपस्थित होते.
भुवैज्ञानिक सर्वेक्षण ऑफ इंडियानं (GSI) विदर्भाच्या जमिनीचा सर्वे केला होता. GSI च्या संशोधकांनी दिलेल्या अहवालात पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा आणि गडचिरोलीच्या भूगर्भात सोन्याचा साठा आढळून आला. त्यानुसार 1984 – 85 मध्ये नागपूर जिल्ह्यातल्या भिवापूरमधील पुल्लर, परसोरी, थूतानबोरी आणि गडचिरोलीत सर्वेक्षणही करण्यात आलं. विदर्भाचा भाग हा आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे अशी ओरड नेहमीच असते. मात्र विदर्भाच्या कुशीत दडलेला सोन्याचा साठा सापडला तर महाराष्ट्रात आणि पर्यायानं पुन्हा एकदा आपल्या देशात सोन्याचा धूर पाहायला मिळेल यात शंका नाही.