पंढरपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून पंढरपूर मध्ये ३००० कोटी रुपयांचा पंढरपूर विकास विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. मात्र मंदिर परिसरातील काही व्यापारी आणि नागरिकांचा त्याला विरोध आहे. यात आता पंढरपूर कॉरिडोरबाबत वारकरी संप्रदायात उभी फूट पडलीय. Warkari sect standing foot Solapur regarding Pandharpur corridor
यामध्ये वारकरी पाईक संघटनेने देखील विरोध दर्शविला आहे. मात्र ह.भ.प. बंडातात्या कराड, माऊली महाराज जोगदंड यांच्यासारख्या मोठ्या व्यक्तीने पंढरपूरच्या विकास आराखड्यासंदर्भात पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये उभी फूट पडल्याचे दिसून येत आहे.
वारकऱ्यांना चांगल्या सुख सुविधा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ३००० कोटी रुपयाचा विकास आराखडा बनवण्याचे काम सुरू आहे. वारकऱ्यांना केंद्रबिंदू मानून हा विकास आराखडा बनवण्यात येत आहे मात्र त्याला विरोध होताना दिसतोय.
■ कबीर महाराज मठातील बैठकीत झाला विरोध
श्री संत कबीर महाराज मठ येथे शनिवारी वारकरी संप्रदायातील जेष्ठ फडकरी, दिंडीप्रमुख, मठाधिपती, संस्थानिक यांची बैठक संपन्न झाली. यात महाराष्ट्र शासनाच्याद्वारे सादर केलेल्या पंढरपूर विकास आराखड्यातील प्रस्तावित ‘कॉरीडॉर’ प्रकल्पाला विरोध करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
■ वारकरी संप्रदाय सरकारच्या बाजूने : माऊली महाराज
महाराष्ट्र शासनाच्या विकास आराखड्याला आमचा पाठिंबा आहे. पंढरपूर मध्ये वारकऱ्यांसाठी हा आराखडा होत आहे मात्र यामध्ये जे बाधित होत आहेत त्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी आम्ही देखील प्रयत्न करणार आहोत. पंढरपूरचा विकास झाला पाहिजे यासाठी वारकरी संप्रदाय महाराष्ट्र सरकारच्या बाजूने आहे, असे मत माऊली महाराज जोगदंड यांनी व्यक्त केले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 संभाजी ब्रिगेडच्या पुण्यात अधिवेशन, चर्चासत्रासह होणार साहित्यिकांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान
सोलापूर : संभाजी ब्रिगेडच्या रौप्य महोत्सवी वर्षांनिमित्त पुण्यामध्ये एक दिवशी अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनामध्ये चर्चासत्र आणि थोर साहित्यिकांचा गौरव केला जाणार आहे. या अधिवेशनासाठी कोल्हापूरचे शाहू महाराज आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार उपस्थित राहून मार्गदर्शन करणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी दिली.
संभाजी ब्रिगेड या सामाजिक संस्थेची १९९७ रोजी स्थापना झाली २०२२ मध्ये २५ वर्षे पूर्ण होत आहेत. या वर्षा निमित्त एक दिवसीय अधिवेशन भरवण्यात येणार आहे. यासाठी प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड हे महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. त्या निमित्ताने सोलापूर दौऱ्यावर आले असता आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सदरचे अधिवेशन बुधवारी (ता. 28 डिसेंबर) सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत पुण्यातील स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे होणार आहे. उद्घाटनाचे सत्र झाल्यानंतर चर्चासत्राचे आयोजन केले आहे. पहिल्या सत्रामध्ये संवाद बहुजन समाजाची या चर्चासत्राचे आयोजन केले आहे. विविध जाती धर्मामध्ये विविध प्रदेश पातळीवर काम करणाऱ्या सर्व नेत्यांना या चर्चासत्रांमध्ये सहभागी होऊन त्यांच्याशी संवाद साधला जाणार आहे.
दुसरे चर्चासत्र सुध्दा ‘आरक्षणातून अर्थकारण’ या विषयावर घेतले जाणार आहे. मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाने मोठी चळवळ उभी केली. मात्र आरक्षण काही गेली ४० वर्षे झाले मिळाले नाही. १०३ वी घटना दुरुस्ती झाली मात्र लागू झालेल्या आरक्षणदेखील मिळालंले न्यालयालाने रद्द केले. त्यामुळे आरक्षणाचा लढा कितपत यशस्वी झाला याचा मागोवा घेऊन आरक्षणातून अर्थकारण या विषयावर चर्चा सत्र होणार आहे.
सध्या जागतीकरण वाढत आहे. सरकारी क्षेत्राचे खाजगीकरण केले जात आहे. त्यामुळे ‘आरक्षण मिळून काय उपयोग’ याबाबत चर्चा केली जाणार आहे. याचा विचार करता जगभर उद्योग आणि शिक्षणासाठी गेले पाहिजे याबाबत प्रबोधन या चर्चासत्रामध्ये केले जाणार आहे. संभाजी ब्रिगेडने शाहु महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा चालवावा. आ. ह. साळुंखे, जयसिंगराव पवार यांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरव केला जाणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.