● पोलीस प्रशासन प्रयत्न हाणून पाडला; एक जण ताब्यात
सोलापूर : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर दौ-यावर होते. यावेळेस पोलिसाचा चोख बंदोबस्त होता. तरीही ताफा अडवून काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न झाला. Police administration tried to show black flags to Chief Minister – Deputy Chief Minister by stopping the fleet of cars in Solapur
राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे मंत्री तसेच राज्यपालांकडून महापुरुषांबद्दल बदनामीकारक वक्तव्य वारंवार केले जात आहे. दोनच दिवसापूर्वी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करून रोष ओढावून घेतला आहे.
याच्या निषेधार्थ काल पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकली होती. त्या अनुषंगाने सोलापुरात कडक बंदोबस्त असून सुद्धा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या गाडीचा ताफा अडवून काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न युवा पॅंथरचे आतिश बनसोडे यांनी केला.
आज रविवारी सोलापुरात गुरव समाजाचे राज्यस्तरीय महा अधिवेशन आयोजित केले. या कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दुपारी तीन वाजता सोलापुरात आले. चार वाजता सुमारास विजापूर रोडवरील नेहरूनगर येथे मैदानावर आयोजित या कार्यक्रमासाठी त्यांचा ताफा सभास्थळी येत होता.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
थोड्याच काही अंतरावर मुख्यमंत्र्यांच्या गाडीचा ताफा वळणावर हळू होत असताना दबा धरून बसलेल्या भीमसैनिक युवा पॅंथर आतिश बनसोडे यांनी अचानक बॅरीगेटस तोडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो..चंद्रकांत पाटील हाय हाय!! चंद्रकांत पाटलाचा निषेध असो ! अशा घोषणा देत त्यांनी ताफ्याच्या दिशेने आगेकुच केली. परंतु जवळच बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी त्याला पकडून पोलीस ठाण्यात नेलं. युवा पॅंथरच्या अचानक झालेल्या या एन्ट्रीमुळे पोलीस प्रशासन हातबल झाले. एवढा पोलीस बंदोबस्त असून सुद्धा सत्ताधाऱ्यांना झेंडे दाखवून व्यक्त केलेल्या रोषाबद्दल नागरिकात चर्चा होती.
● कडक बंदोबस्तातही झेंडे दाखवून निषेध
काल शनिवारी राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पुण्यात शाई फेकली होती. त्या पार्श्वभूमीवर आज रविवारी सोलापुरात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री गुरव समाजाच्या महाअधिवेशनासाठी येणार असल्याने शहर पोलिसांनी ठिकठिकाणी, चौकात, रेस्ट हाऊस, विमानतळ,सभास्थळ आदी ठिकाणी कडक बंदोबस्त असून सुद्धा भीमसैनिक युवा पॅंथरनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्याचा प्रयत्न केला.