शिर्डी : शिर्डीजवळील सावळी विहीर येथे साई बाबा पालखी घेऊन येणाऱ्या भाविकांवर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये एकजण जखमी झाला आहे. त्याच्या खांद्याला गोळी लागली आहे. Firing on Sai Palkhi near Shirdi, you will be shocked to read the reason
शिर्डी जवळील सावळीविहीर येथे ही घटना घडली आहे. गोळीबारात एक जण जखमी झाला आहे. जखमी झालेल्या व्यक्तीवर साईबाबा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. साई पालखी ही मुंबईतील गोरेगाव इथून शिर्डीला आली होती. वैयक्तिक किंवा पूर्ववैमनस्यातून अज्ञाताकडून हा गोळीबार करण्यात आला आहे. या प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले.
याच पालखीत संशयित विकी भांगे आणि सुधाकर पवार सहभागी झाले होते. पालखी शिर्डीत पोहोचल्यानंतर आरोपी भांगे याने वैयक्तीक कारणावरुन निलेश पवार याच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात निलेश पवार हे जखमी झाले असून त्यांच्यावर साईबाबा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गोळीबार करणाऱ्या भांगेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
● लग्नाच्या कारणावरून गोळीबार
गोळीबारीच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली वैयक्तिक कारणातून हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. जखमी निलेश याने भांगे याच्या बहिणीसोबत दोन वर्षापूर्वी पळून जाऊन लग्न केले होते. याचाच राग असल्याने गोळीबार केल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे शिर्डीत परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 पीएम मोदींचे सांत्वन करण्यासाठी महाराष्ट्राचे सीएम शिंदे गुजरातला
● दुःखाचा डोंगर कोसळला… पण मोदींनी घेतला मोठा निर्णय
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचे आज निधन झाले आहे. यानंतर मोदी यांचे सांत्वन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुजरातला जाणार आहेत. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. विधीमंडळातील कामकाज संपल्यानंतर शिंदे अहमदाबादला जाणार आहेत. दरम्यान मोदींनी आईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारानंतर आपल्या कामाला सुरुवात केली आहे. ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठका घेत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई हिराबेन मोदी यांचे आज निधन झाले आहे. हिराबेन यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गांधीनगर येथे पोहोचले आहेत. मोदी यांनी आईच्या पार्थिवाला खांदा दिला आहे. त्याआधी गांधीनगर येथील निवासस्थानी पोहोचत मोदींनी आईचे अंत्यदर्शन घेतले. हिराबेन यांनी आज पहाटे साडेतीन वाजता अहमदाबाद येथील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगालमधील नियोजित सर्व कार्यक्रमांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजेरी लावणार आहेत. त्यानंतर ते राष्ट्रीय गंगा परिषदेच्या बैठकीतही सामील होणार आहेत. हे कार्यक्रम रद्द होणार, अशी शक्यता होती. पण मोदींनी आईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केल्यानंतर कर्तव्याला प्राधान्य दिले आहे. ते थेट राजभवनात पोहोचले व कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांचे कौतुकही होत आहे.