□ ड्रंक अॅण्ड ड्राइव्हच्या कारवाईवर भर
सोलापूर : कोरोना संकटाच्या दोन वर्षानंतर आज सरत्या वर्षाला निरोप दिला जाणार आहे. आनंदाच्या काळात सोलापुरात अनुचित प्रकार होऊ नये चोख बंदोबस्त ठेवलाय. आहे. सोलापूर शहरात वरिष्ठ पोलीस अधिकार्यांसह ७२५ पोलिसांचा कडक बंदोबस्त राहणार आहे. After two years of Corona crisis, goodbye to the new year today, drunk and drive in Solapur
शहरात ३४ ठिकाणी पोलिसांचे फिक्स पॉइंट्स तर २० ठिकाणी नाकाबंदी केलीय. सोलापूर शहर व परिसरात कोरोना संकटाच्या दोन वर्षांनंतर आज शनिवारी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी तरुणाई सज्ज झाली आहे. परंतु आनंदाच्या या क्षणाचा बेरंग होऊ नये यासाठी पोलिसांकडून बंदोबस्ताची तयारी करण्यात आली आहे. शहरात वरिष्ठ पोलीस अधिकार्यांसह ७२५ पोलिसांचा कडक बंदोबस्त राहणार आहे.
नवीन वर्षाचे स्वागतासाठी सर्वत्र जय्यत तयारी करण्यात आली आहे. हॉटेल्स, इमारती, ढाबे सजविण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे इमारतींवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. नववर्षाच्या स्वागतावेळी मद्य प्राशन करुन हुल्लडबाजी करणार्यांवर प्रतिबंध घालण्यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्ताची तयारी झाली आहे. शहरात पोलिसांकडून रात्री १२ पर्यंत परवानगी देण्यात आली आहे.त्यासाठी शहरात विविध ३४ ठिकाणी पोलिसांचे फिक्स पॉइंट्स उभारण्यात येत आहेत.
पोलीस अधिकारी आणि कर्मचारी नागरिकांची कसून चौकशी करणार आहेत.शिवाय २० ठिकाणी नाकाबंदी राहणार आहे.शहरात येणार्या चारही बाजूंच्या रस्त्यांवर पोलीस तैनात असणार आहेत. पोलीस ब्रीथ अॅनालायझर मशीनद्वारे नागरिकांची मद्य प्राशन केल्याची तपासणी करणार आहेत.
शहरात पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्ह्यात पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त राहणार आहे.शहरात ३ पोलीस उपायुक्त,३ सहायक पोलीस आयुक्त,१९ पोलीस निरीक्षक,४र फौजदार-सहायक पोलीस निरीक्षक,६५८ पोलीस अंमलदार रस्त्यावर राहणार आहेत.त्याचप्रमाणे वाहतूक नियंत्रण शाखेचाही स्वतंत्र पोलीस बंदोबस्त राहणार आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ राज्य उत्पादन शुल्क विभागाची सहा पथके जिल्हाभरात कार्यरत
आज सरत्या वर्षाला निरोप देण्यात येत असून राज्य उत्पादन शुल्क विभागाची ६ पथके जिल्हाभरात कार्यरत राहणार आहेत. अवैध दारु निर्मिती, विक्री व वाहतुकीवर करडी नजर राहणार असून सर्व हॉटेल ढाब्यांची तपासणी केली जाणार आहे. देशी दारु पिण्यासाठी एक दिवसाच्या परवान्यासाठी दोन तर विदेशी दारुच्या परवान्यासाठी पाच रुपये शुल्क असणार आहे.
सर्व वाईनशॉप,बीअर शॉपीमध्ये हे परवाने देण्यात येत आहेत. शहर व जिल्ह्यासाठी सव्वादोन लाख परवाने वितरित करण्याचे उद्दिष्ट असल्याचे नितिन धार्मिक
(अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर) यांनी सांगितले.
□ फटाके उडविण्यास दोनच तास परवानगी
नववर्षाच्या स्वागतावेळी रात्री दहा ते १२ या वेळेतच फटाके उडविण्यास परवानगी राहील. मद्यपान करून कोणीही वाहन चालवू नये. त्यांच्या तपासणीसाठी •४० ब्रिथ अॅनालायझर मशीन पोलिसांना दिल्या आहेत. सात पोलीस ठाण्यांतर्गत ठिकठिकाणी नाकाबंदी असेल. अवैध व्यवसायांवर गुन्हे शाखेचा वॉच असल्याची माहिती सोलापूर शहर पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी दिली.
□ ड्रंक अॅण्ड ड्राइव्हच्या कारवाईवर भर
३१ डिसेंबर रोजी पहाटेपर्यंत २५ पोलीस ठाण्याअंतर्गत नाकाबंदी राहील. ड्रंक अॅण्ड ड्राइव्हच्या कारवाईवर भर दिला जाईल. २५ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील पोलिसांना ३५ ब्रिथ अॅनालायझर मशीन दिल्या आहेत. मद्यपान करून कोणीही वाहन चालवू नये. नियमांचे पालन करून सर्वांनी नववर्षाचे स्वागत करावे, असे आवाहन सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी केले.
□ मुंबईसह राज्यभर बंदोबस्त
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात आहे. मुंबईसह प्रमुख शहरांमध्ये पोलिस यंत्रणा सतर्क आहे. कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी करडी नजर ठेवली जात आहे. दरम्यान मुंबईतल्या दादर येथील रेल्वे स्टेशनच्या तिकीट काउंटरवर शुक्रवारी एक संशयित बॅग आढळली. त्यानंतर बॉम्बशोधक पथकाने तातडीने घटनास्थळी हजर होत चौकशी केली असता बॅगमध्ये काहीही आढळले नाही.